How to Sprout Pulses? (कडधान्यांना कसे मोड काढावे?)
कडधान्यांना कसे मोड काढावे? मराठी
In India, we use a variety of pulses. Pulses are a good source of Protein and Fibre. Nutrition value of Pulses increases when they are sprouted. Traditional method of sprouting is to soak Pulses and then tie them in a thin cotton cloth. But sometimes the pulses sprouted this way become sticky and develop unpleasant odour. So I use a different method to sprout pulses.
1. Wash Pulses 2-3 times.
2. Transfer pulses to a big bowl. Add water such that the water level is at least 2-3 inches above the pulses. Cover the bowl and keep it for 10-12 hours.
3. Drain water. Wash pulses with fresh water 2-3 times.
4. Transfer Pulses to a Colander or a big Strainer. Drain out excess water.
5. Cover the Colander / Strainer with a perforated plate. Keep the Colander on a stand / coaster and Keep it in a warm place for 10-12 hours. Pulses will be sprouted nicely with no unpleasant odour and no stickiness.
Note
1. Different Pulses take different time to sprout. Moong (Green Gram) sprouts faster than other pulses. Kulith (Horse Gram) and Val (Field Beans) take much longer to sprout.
2. In cold weather, it takes longer to sprout. If the sprouts are not long enough, you can cover the Colander / Strainer again and keep it in a warm place. Alternatively, you can place the covered colander / strainer in an Oven / Microwave (Don’t switch it on) and close the lid.
==================================================================================
कडधान्यांना कसे मोड काढावे?
भारतात आपण बऱ्याच प्रकारची कडधान्यं वापरतो. कडधान्यांमुळे आपल्याला प्रथिने मिळतात. सालासकट खाल्ल्यामुळे चोथाही (fibre) मिळतो जो अन्नपचनासाठी आवश्यक असतो. कडधान्यांना मोड काढल्यामुळे ती आणखी पौष्टिक होतात. मोड काढण्याच्या पारंपरिक पद्धतीत भिजवलेली धान्यं पातळ सुती कपड्यात बांधून ठेवतात. पण असे केलं तर कधी कधी मोड आलेली धान्यं चिकट होतात आणि त्यांना एक प्रकारचा वास येतो. त्यामुळे मी काही वर्षांपासून मोड काढायला वेगळी पद्धत वापरते.
१. धान्य २–३ वेळा धुवून घ्या.
२. धान्य एका मोठ्या भांड्यात घ्या. धान्यांच्या पातळीच्या २–३ इंच वर येईल एवढं पाणी घाला आणि १०–१२ तास झाकून ठेवा.
३. भिजलेलं धान्य एका परडीत / चाळणीत घालून जास्तीचं पाणी काढून टाका आणि स्वच्छ पाण्याने २ वेळा धान्य धवून घ्या.
४. धान्यातलं पाणी निथळून घ्या. परडी/ चाळणी वर एक भोकाची ताटली झाकण म्हणून ठेवा आणि परडी / चाळणी एका स्टॅन्ड (जाळी) वर ठेवा म्हणजे सर्व बाजूनी हवा लागेल. परडी / चाळणी उबदार जागी १०–१२ तास ठेवा. धान्याला छान मोड आलेले असतील आणि अजिबात चिकटपणा / वास नसेल.
टीप
१. वेगवेगळ्या कडधान्याला मोड यायला वेगवेगळा वेळ लागतो. मुगाला सर्वात लवकर मोड येतात तर कुळीथ / वालाला जास्त वेळ लागतो.
२. हवा गार असली तर कडधान्याला मोड यायला जास्त वेळ लागतो. अशा वेळी परडी / चाळणी झाकण ठेवून बंद ओव्हन / मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा. म्हणजे लवकर मोड येतील.
३. परडी / चाळणी चं झाकण उघडून पहा. जर मोड नीट आले नसतील तर परत झाकून ठेवा.
Your comments / feedback will help improve the recipes