Lemon Rice – Chitranna (लेमन राईस – चित्रान्न ) – Yummy South Indian Rice – No Onion Garlic Recipe

Lemon Rice – Chitraana (लेमन राईस - चित्रान्न)
Lemon Rice – Chitraana (लेमन राईस - चित्रान्न)

Lemon RiceChitranna (लेमन राईस चित्रान्न ) – Yummy South Indian Rice – No Onion Garlic Recipe

लेमन राईस – चित्रान्न मराठी

Lemon Rice – Chitranna – is a popular South Indian Rice. It’s an easy recipe to make this tasty rice. This rice can be relished with Sambar, Rasam, Curd or by itself. You can use Regular Rice (You can use leftover Rice for this) for this or Rice Vermicelli. We like it with Rice Vermicelli. Try it out.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Cooked Rice or Cooked Rice Vermicelli 2.5 cups

Chana Dal (Split Bengal Gram) 2 tablespoon

Urad Dal (Split Black Gram) 1 teaspoon

Fresh Scraped coconut ½ cup

Chopped Coriander 2 tablespoon

Oil 2 tablespoon +

1 teaspoon (to be used while cooking Vermicelli)

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) 2 pinch

Curry Leaves 8-10

Cashew Nuts 10-12

Green Chilies 4-5 (slit lengthwise)

Sugar 1 teaspoon (optional – adjust as per taste)

Lemon Juice 1.5-2 teaspoon

Pure Ghee 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Soak Chana Dal (Split Bengal Gram) in water for 4 hours.

2. Cook Rice; Spread it in a plate and let it cool.

3. If you are using Rice Vermicelli, Boil about 1 liter of water. Add 1 teaspoon oil in it. Add Raw Rice Vermicelli and cook on medium flame till Vermicelli is soft. Pour cooked Vermicelli into a strainer to drain excess water. Pour room temperature water over it so that Vermicelli does not overcook. Leave it to cool.

4. In a thick bottom pan, add 2 tablespoon of Oil.

5. Add Mustard Seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter. Turn the flame to low.

6. Add soaked Chana Dal (after draining water). Keep Sauteing on low flame till Dal turns light brown. Add Urad Dal (Split Black Gram). Keep Sauteing on low flame till Dal turns light brown.

7. Add Slit Green Chilies, Curry Leaves, Turmeric Powder and Asafoetida. Mix well.

8. Add Cooked Rice / Vermicelli and Mix.

9. Add Lemon Juice, Salt, Sugar, Scraped Coconut and mix well. Cook covered on low flame for 5 minutes.

10. Add chopped coriander, Pure Ghee and Mix.

11. Yummy Lemon Rice – Chitranna – is ready. Relish Lemon Rice with anything you like or by itself. You can serve it hot or at room temperature. Both taste nice.

Lemon Rice – Chitraana (लेमन राईस - चित्रान्न)
Lemon Rice – Chitraana (लेमन राईस – चित्रान्न)
Lemon Rice – Chitraana (लेमन राईस - चित्रान्न)
Lemon Rice – Chitraana (लेमन राईस – चित्रान्न)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

लेमन राईस चित्रान्न चविष्ट दक्षिण भारतीय पदार्थ कांदा लसूण विरहित

लेमन राईस चित्रान्न हा भाताचा दक्षिण भारतीय लोकप्रिय प्रकार आहे. रेसिपी अगदी सोपी आहे आणि भात फार चविष्ट लागतो. हा भात कशाही सोबत खाऊ शकता किंवा असाच खायला ही छान लागतो. ह्या भातासाठी तुम्ही नेहमीचा भात (शिळा असेल तरी चालतो) किंवा तांदुळाच्या शेवया वापरू शकता. ह्या कच्च्या शेवया बाजारात मिळतात – MTR ब्रॅण्डच्या शेवया लोकप्रिय आहेत. आमच्या घरी तांदुळाच्या शेवयांचा लेमन राईस जास्त आवडतो.

साहित्य ( जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

शिजवलेला भात / तांदुळाच्या शिजवलेल्या शेवया अडीच कप

चणा डाळ २ टेबलस्पून

उडीद डाळ १ टीस्पून

ताजा खवलेला नारळ अर्धा कप

चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

तेल २ टेबलस्पून +

१ टीस्पून (शेवया शिजवताना घालण्यासाठी)

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग २ चिमूट

कढीपत्ता ८१० पाने

काजू १०१२

हिरव्या मिरच्या ४(उभी चीर देऊन)

साखर १ टीस्पून (ऐच्छिक)

लिंबाचा रस दीड ते २ टीस्पून

साजूक तूप १ टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. चणा डाळ धुवून ४ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. भात शिजवून घ्या आणि एका ताटलीत पसरून गार करत ठेवा.

. तांदुळाच्या शेवया वापरणार असाल तर एका पातेल्यात १ लिटर पाणी गरम करा. त्यात १ टीस्पून तेल घाला. पाणी उकळलं की त्यात शेवया घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या. शिजलेल्या शेवया एका चाळणीत घालून पाणी निथळून घ्या. लगेच शेवयांवर साधं पाणी घाला म्हणजे शेवया जास्त शिजणार नाहीत. पाणी निथळून शेवया गार करायला ठेवा.

. एका कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम करा.

. त्यात मोहरी घालून तडतडू द्या. मग जिरं घालून तडतडू द्या. आता गॅस बारीक करा.

. भिजलेली चणा डाळ घाला (पाणी घालू नका). मंद आचेवर ढवळत राहा. चणा डाळ किंचित लालसर झाली की उडीद डाळ घालून रंग बदलेपर्यंत ढवळत राहा.

. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हळद आणि हिंग घालून ढवळून घ्या.

. शिजलेला भात / शेवया घालून नीट ढवळून घ्या.

. आता लिंबाचा रस, मीठ, साखर, नारळ घालून ढवळून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा.

१०. चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप घालून ढवळून घ्या.

११. चविष्ट लेमन राईस चित्रान्न तयार आहे. कशाहीसोबत किंवा असाच आस्वाद घ्या. हा गरम किंवा गार कसाही छान लागतो.

Lemon Rice – Chitraana (लेमन राईस - चित्रान्न)
Lemon Rice – Chitraana (लेमन राईस – चित्रान्न)
Lemon Rice – Chitraana (लेमन राईस - चित्रान्न)
Lemon Rice – Chitraana (लेमन राईस – चित्रान्न)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes