Ratalyache Dhirde (रताळ्याचे धिरडं / धिरडे ) – Sweet Potato Chilla – Sweet Potato Savory Pan Cake – My Innovative Vrat Recipe
Sweet Potato is a popular root that has a good taste and is healthier than Potato. In India, Sweet Potato is generally used for making tasty food for Fasting Days. I created this recipe, where I use Sweet Potato along with Sama (Varai / Mordhan) flour to make healthy and tasty savory pan cakes. It’s a quick and easy recipe using ingredients available in Indian Kitchen.
Ingredients (Makes 5-6 Dhirde) (1 cup = 250 ml)
Sweet Potatoes ¼ kg
Sama Flour (Varai / Mordhan flour) 1 cup
Green Chili paste ½ teaspoon
Buttermilk ¼ cup or Curd 2 tablespoon
Crushed Roasted Groundnuts 2-3 tablespoon
Sugar 1 teaspoon
Chopped Coriander 2 teaspoon
Salt to taste
Oil / Ghee / Butter for roasting
Instructions
1. Wash Sweet Potatoes properly and grate them. I don’t peel Sweet Potatoes but if you like Peel and then grate.
2. In a bowl, add all the ingredients and mix. Add little water, if required and make a thick batter. Batter should not be watery. We have to spread the batter on the Griddle.
3. Heat a flat non stick / Iron Griddle. Grease the Griddle with Oil / Ghee / Butter. Pour ¼ cup of batter on the Griddle, and spread it evenly. Thickness should be <that of a Paratha (Pan Cake). Be careful not to touch the hot Griddle.
4. Cover it with a lid and cook on medium flame. After 2-3 minutes, remove the lid, put a few drops of oil/ghee on Dhirde and flip it over.
5. Cook the other side of Dhirde.
6. Serve hot with Ghee / Butter and / or any Chutney / Sauce. It’s very yummy.
Note
1. Instead of Sama Flour, you can use Upasachi Bhajani or Rajgira (Amaranth) flour. But the texture of Dhirde is the best when you use Sama Flour.
==================================================================================
रताळ्याचे धिरडं – स्वादिष्ट आणि पौष्टिक – उपासासाठी माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी
रताळं हे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट कंदमूळ आहे. भारतात सगळीकडे रताळी मिळतात. साधारणपणे आपण रताळी उपासाला खातो. पण उपास नसतानाही रताळी खायला चांगली. बटाट्यापेक्षा हा चांगला पर्याय आहे. उपासाचं थालीपीठ तुम्ही नेहमी करत असाल. मी रताळी आणि वरी तांदुळाचं (भगर / मोरधन) पीठ घालून रताळ्याची धिरडी करते. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. नेहमी उपलब्ध असणारे जिन्नस वापरून केलेली ही धिरडी अगदी स्वादिष्ट लागतात. रेसिपी सोपी आणि पटकन होणारी आहे. पुढच्या उपासाला नक्की करून बघा.
साहित्य (५–६ धिरड्यांसाठी) (१ कप = २५० मिली)
रताळी पाव किलो
वरी तांदूळ / भगर / मोरधन पीठ १ कप
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून
ताक पाव कप किंवा दही २ टेबलस्पून
भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट २–३ टेबलस्पून
साखर १ टीस्पून
चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल / तूप धिरडी भाजण्यासाठी
कृती
१. रताळी स्वच्छ धुवून किसून घ्या. मी रताळी सोलत नाही. तुम्हाला हवं असेल तर रताळी सोलून नंतर किसून घ्या.
२. एका वाडग्यात सर्व जिन्नस घालून एकत्र करा. जरूर पडल्यास थोडं पाणी घालून सरसरीत पीठ भिजवा. फार पातळ नको. पीठ तव्यावर पसरता यायला हवं.
३. एक नॉन स्टीक/ लोखंडी तवा गरम करा.
४. तव्यावर पाव कप पीठ घाला आणि पातळ पसरा.
५. झाकण ठेऊन २–३ मिनिटे भाजा. नंतर थोडे तेल/तूप घाला व धिरडं परता.
६. दुसरी बाजूही भाजून घ्या.
७. रताळ्याचे स्वादिष्ट आणि पौष्टिक धिरडं तयार आहे. लोणी आणि चटणीसोबत खायला द्या.
टीप
१. वरी तांदूळ पिठाऐवजी तुम्ही उपासाची भाजणी / राजगिरा पीठ घालू शकता. पण वरी तांदूळ पीठ घालून धिरड्याचं टेक्सचर अगदी परफेक्ट येतं.
Your comments / feedback will help improve the recipes