Tikhshe Fov Laadoo – Fovache Tikhat Laadoo (तिखशे फोव लाडू – पोह्याचे तिखट लाडू )

Tikhshe Fov
Tikhshe Fov Laadoo (तिखशे फोव लाडू - पोह्याचे तिखट लाडू )

Tikhshe Fov Laadoo – Fovache Tikhat Laadoo (तिखशे फोव लाडू पोह्याचे तिखट लाडू ) – Goan Specialty Sweet and Savory Laddus using Flattened Rice – No Ghee Laddus

तिखशे फोव लाडू पोह्याचे तिखट लाडू मराठी 

Goan Diwali goodies are different than we generally make in Maharashtra. Have you heard of Sweet and Savory Laddus? This is a Goan specialty where laddus are make using roasted Flattened Rice. Surprisingly unlike all other Laddus there is no Ghee added while making these Laddus. That makes it a light snack. Along with Jaggery, Chili Powder and Ginger is added to give it a spicy taste. These laddus are very tasty. This Diwali, try this recipe to give to different taste to your Diwali Faral.

Although this recipe requires Jaggery Syrup, in case you are not able to make the syrup of right consistency, you can still make another snack. Please read the recipe for details. So don’t worry about the syrup. Just try the recipe.

Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 20-22 Laddus)

Roasted Thick Poha (Flattened Rice) 4 cups

Chopped Jaggery 2 cups

Roasted and Peeled Peanuts ½ cup

Roasted Bengal Gram ¼ cup

Roasted Sesame Seeds 2 teaspoon

Chili Powder ½ teaspoon

Grated Ginger 1 teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Salt 2-3 Pinch

Water ½ cup

Desi Ghee for Greasing

Instructions

1. In a thick bottom pan, add Jaggery and water. Cook on low flame stirring continuously. When the syrup starts thickening, add chili powder, turmeric powder and salt. Keep cooking. We have to make Hard Ball consistency syrup. When you see froth in the syrup, drop a drop of syrup in cold water. If it does not spread and forms a hard ball then syrup is ready. Else keep cooking further.

2. Switch off the gas. Take the pan away from the gas. Add Flattened rice, Ginger, Peanuts, Bengal Gram, Sesame Seeds and quickly mix together.

3. Take out the mixture in a greased plate. While the mixture is warm, roll the laddus of desired size.

4. Fovache tasty Tikhat Laadoo are ready. Store in an air tight container after the laddus come to room temperature.

5. These laddus last for 2 weeks.

Note

1. In case you are not able to make the syrup properly of right consistency, you can spread the mixture in a plate and make small lumps of it. It is served as Tikhshe Fov (Sweet and Savory Flattened Rice) in Goa. So don’t be worried about the syrup. Just Try it.

Tikhshe Fov
Tikhshe Fov Laadoo (तिखशे फोव लाडू – पोह्याचे तिखट लाडू )
Tikhshe Fov
Tikhshe Fov Laadoo (तिखशे फोव लाडू – पोह्याचे तिखट लाडू )

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

तिखशे फोव लाडू पोह्याचे तिखट लाडू

तिखट लाडू हे ऐकायला वेगळंच वाटतंय ना? गोव्यात दिवाळीला केला जाणारा हा पारंपरिक पदार्थ आहे. माझ्या सासूबाई हे लाडू भाजके पोहे घालून करतात. ह्यात तूप अजिबात घालत नाहीत. फक्त लाडू वळताना हाताला लागेल तेवढंच तूप असतं. त्यामुळे हा अगदी पौष्टिक पदार्थ आहे. लाडवात गुळासोबत लाल तिखट आणि आलं घालतात ज्यामुळे लाडू तिखट आणि स्वादिष्ट होतात. दिवाळीला किंवा कधीही मधल्या वेळेला खायला हा छान प्रकार आहे.

ह्यात जरी गुळाचा पाक करायचा असला तरी काही कारणाने पाक चुकला तरी एक वेगळा स्वादिष्ट पदार्थ करता येतो. माहितीसाठी पूर्ण रेसिपी वाचा. त्यामुळे गुळाच्या पाकाचं टेन्शन न घेता रेसिपी करून बघा.

साहित्य (१ कप = २५० मिली) (२०२२ लाडवांसाठी)

भाजके जाड पोहे ४ कप

चिरलेला गूळ २ कप

भाजून सोललेले शेंगदाणे अर्धा कप

पंढरपुरी डाळं (चिवड्यात घालतो ते) पाव कप

भाजलेले तीळ २ टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

किसलेलं आलं १ टीस्पून

हळद पाव टीस्पून

मीठ २ चिमूट

पाणी अर्धा कप

साजूक तूप लाडू वळताना हाताला लावायला

कृती

. एका जाड बुडाच्या पातेल्यात गूळ आणि पाणी घालून मंद आचेवर शिजवा. सतत ढवळत रहा. मिश्रण दाट व्हायला लागलं की हळद, लाल तिखट आणि मीठ घाला. मिश्रण ढवळत रहा. आपल्याला गुळाचा पक्का पाक करायचा आहे. पाकावर फेस दिसायला लागला की एका वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचा एक थेम्ब टाका. पाक न पसरता घट्ट गोळी झाली की पाक तयार झाला. नाहीतर पाक अजून शिजवा.

. गॅस बंद करून पातेलं खाली उतरवा. लगेच पाकात पोहे, आलं, शेंगदाणे, डाळं आणि तीळ घालून मिश्रण ढवळून घ्या.

. एका तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण काढून घ्या आणि हाताला तूप लावून मिश्रणाचे लाडू वळा. मिश्रण फार गरम असताना लाडू वळले जात नाहीत. २ मिनिटं थांबून लाडू छान वळले जातात. पण मिश्रण गार झालं तरी चालणार नाही.

. तिखशे फोवाचे स्वादिष्ट लाडू तयार आहेत. थंड झाल्यावर लाडवांचा आस्वाद घ्या आणि उरलेले लाडू हवाबंद डब्यात भरून ठेवा.

. हे लाडू २ आठवडे टिकतात.

टीप

. जर पाक करताना चूक झाली आणि लाडू वळले गेले नाहीत तर मिश्रणाचे तुकडे करून डब्यात भरून ठेवा. गोव्यात असे तुकडे तिखशे फोव ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पाकाचं टेन्शन घेऊ नका. हे लाडू नक्की करून बघा.

Tikhshe Fov
Tikhshe Fov Laadoo (तिखशे फोव लाडू – पोह्याचे तिखट लाडू )
Tikhshe Fov
Tikhshe Fov Laadoo (तिखशे फोव लाडू – पोह्याचे तिखट लाडू )

Your comments / feedback will help improve the recipes