Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे) – Pan Fried Millets Croquette – Without Baking Soda / Fruit Salt

Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)
Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)

Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे) – Pan Fried Millets Croquette – Without Baking Soda / Fruit Salt

मिश्र मिलेट्सचे आप्पे मराठी

Appe Pan is very useful when you want to cook healthy, less oily food. 2023 being declared as Millets year, there is more focus on using Millets in the dishes I make. This Mixed Millets Appe is made using 3 types of Millets (Sorghum, Finger Millet and Barnyard Millet). Without using Baking Soda or Fruit Salt, Appe are nice and fluffy with crisp outer cover and soft from inside. Since it has Millets it’s healthy and tasty too. This can be a good breakfast / snack option.

Ingredients (Serves 8) (1 cup = 250 ml)

Urad Dal (Split Black Gram) ½ cup

Sorghum Rava (Coarse ground Sorghum) 1 cup (or Sorghum ¾ cup)

Finger Millet Rava (Coarse ground Ragi) 1 cup (or Ragi 1 cup)

Barnyard Millet (Sama Rice / Vari Rice) 1 cup

Fenugreek Seeds 1 tablespoon

Crushed Green Chilies 1 teaspoon

Crushed Ginger 1 teaspoon

Onion 1 medium (finely chopped)

Mustard Seeds ½ teaspoon

Oil / Ghee (Clarified butter) 1 teaspoon + for pan frying

Curry Leaves 8-10

Asafoetida 1 pinch

Salt to taste

Instructions

1. Wash Urad Dal and Soak in water for 6-8 hours. Add Fenugreek seeds while soaking. Soak Sorghum Rava (or Sorghum) and Ragi Rava (or Ragi) separately for 6-8 hours.

2. Drain away water from Dal and Millets.

3. Grind Dal and Millets separately into little coarse paste. Add very little water while grinding.

4. Wash Sama Rice and grind it into a coarse paste with very little water.

5. Mix together all ground paste in a Pan. This batter should be of dropping consistency. Add some water if required. Cover the pan and keep it in a warm place for 8-10 hours for fermentation. Batter will double after fermentation.

6. Mix the Batter with a spoon to remove the air. Add Onion, Ginger, Chili, Salt and mix well.

7. Heat 1 teaspoon oil in a ladle. Add Mustard seeds, wait for splutter. Add Asafoetida and curry leaves. Switch off the gas. Pour this tempering into the batter and mix. Batter should be of dropping consistency. If required, add little water.

8. Heat Appe Pan. Grease the Grooves with some oil.

9. Fill each groove with the batter. Drop some oil in each groove.

10. Cook covered for 2-3 minutes on medium flame.

11. When the top of Appe is dry, Flip over each Appe. Drop some oil and cook for 2-3 minutes.

12. Yummy Millets Appe are ready. Serve hot with chutney of your choice.

Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)
Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)
Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)
Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मिश्र मिलेट्सचे आप्पे बेकिंग सोडा किंवा इनो न वापरता चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

आप्पे पॅन ही अतिशय उपयुक्त वस्तू आहे. ह्यात कमी तेलात चविष्ट पदार्थ होतात आणि चव व टेक्सचर पण छान येतं.२०२३ हे मिलेट्स वर्ष आहे त्यामुळे नेहमीच्या स्वयंपाकात मिलेट्स कसे वापरता येतील त्याचा विचार चालू असतो. त्या विचारातूनच ही रेसिपी तयार झाली. ह्यात ३ प्रकारची मिलेट्स वापरली आहेत. त्यामुळे हे अप्पे खूप पौष्टिक होतात आणि चवही छान येते. बेकिंग सोडा किंवा इनो न वापरता बाहेरून छान crispy आणि आतून नरम असे आप्पे होतात. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक छान आणि सोपा पदार्थ आहे.

साहित्य (८ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

उडीद डाळ अर्धा कप

ज्वारीचा रवा १ कप किंवा ज्वारी पाऊण कप

नाचणीचा रवा १ कप किंवा नाचणी १ कप

वरी तांदूळ / भगर १ कप

मेथी दाणे १ टेबलस्पून

१ मध्यम कांदा बारीक चिरून

ठेचलेलं आलं १ टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

मोहरी अर्धा टीस्पून

हिंग १ चिमूट

कढीपत्ता ८१० पानं

तेल / तूप आप्पे१ टीस्पून+ पॅन मध्ये घालायला

मीठ चवीनुसार

कृती

. उडीद डाळ धुवून ६८ तास पाण्यात भिजवून ठेवा. भिजवताना डाळीत मेथी घाला. ज्वारीचा रवा (किंवा ज्वारी) आणि नाचणीचा रवा (किंवा नाचणी) धुवून ६८ तास वेगवेगळी पाण्यात भिजवून ठेवा.

. डाळ, ज्वारी, नाचणीतलं पाणी काढून टाका. मिक्सरमध्ये सर्व धान्य कमीत कमी पाणी घालून वेगवेगळी किंचित जाडसर वाटून घ्या.

. वरी तांदूळ धुवून मिक्सरमध्ये कमीत कमी पाणी घालून जाडसर वाटून घ्या.

. वाटलेली धान्य एका मोठ्या पातेल्यात घालून नीट एकजीव करा. पातेलं झाकून ८१० तास पीठ आंबण्यासाठी उबदार जागी ठेवा. पीठ आंबलं की दुप्पट होईल.

. पीठ डावाने मिसळून त्यातली हवा काढून टाका. पिठात कांदा, आलं, मिरची आणि मीठ घालून मिश्रण नीट एकजीव करा.

. एका लहान कढल्यात १ टीस्पून तेल गरम करून मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करून घ्या. फोडणी जरा गार करून पिठात घालून मिश्रण एकजीव करा.

. आप्पेपात्र गरम करून घ्या. प्रत्येक खाचीत २ थेम्ब तेल / तूप घाला. प्रत्येक खाचीत पीठ घालून वरून २ थेम्ब तेल / तूप घाला.

. झाकण ठेवून मध्यम आचेवर २३ मिनिटं भाजा. आता आप्पे परतून दुसरी बाजूही छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.

. चविष्ट fluffy आप्पे तयार आहेत. गरमगरम आप्पे आवडीच्या चटणी सोबत खायला द्या.

Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)
Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)
Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)
Mixed Millets Appe (मिश्र मिलेट्सचे आप्पे)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes