Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji – No Onion Garlic Recipe

Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji

Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji – No Onion Garlic Recipe

ओल्या काजूची उसळ मराठी

In February – March months, Fresh Cashews are available in the market. In Konkan, we either eat these Cashews raw or Make a subji of these. There are different ways to make this subji – we call it Usal. One with Onion, Garlic, Spices and other without Onion Garlic. My mother used to make it without Onion Garlic. This simple Usal without any spices tastes super tasty. This is the recipe of the same.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Fresh Cashew 40-45

Scraped coconut ½ cup

Green Chilies 3-4 Slit lengthwise

Chopped coriander 2 teaspoon

Kokam 2 or Amchur ¼ teaspoon

Sugar to taste

Cumin Powder ¼ teaspoon

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida 2 pinch

Curry Leaves 4-5

Salt to taste

Milk ¼ cup

Instructions

1. Soak Fresh Cashews in water for 8 hours. Peel them.

Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Peeled Fresh Cashew (सोललेले ओले काजू)

2. In a pan add 2 cups of water, ¼ cup of milk and bring to boil. When mixture starts boiling, add cashews and cook on low flame till cashews are little soft. Do not overcook. Drain water and keep Cashews aside.

3. Save 2 teaspoon of coconut for later use and grind the remaining coconut into a coarse paste. Add little water if required.

4. In a pan, heat Oil. Add Mustard Seeds, wait for splutter; add Cumin Seeds, wait for splutter. Add Turmeric Powder, Asafoetida, Curry leaves and Green Chilies.

5. Add cooked cashews and saute for 2 minutes.

6. Add coconut paste, ¼ cup water and bring the mixture to boil.

7. Add Salt, Sugar, Cumin Powder and Kokam / Amchur. Boil the mixture to adjust the consistency. This subji has thick gravy.

8. Add coconut and coriander. Mix together and switch off the gas.

9. Tasty Fresh Cashew Usal is ready. Serve hot with Roti, Chapati or Relish it by itself.

Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji

==================================================================================

ओल्या काजूची उसळ कोकणी स्पेशालिटी कांदा लसूण विरहित

फेब्रुवारी मार्च महिन्यात ओले काजू मिळायला लागले की ते आणून असेच खाणं आणि त्याची उसळ करणं हे शास्त्र असतं. ही उसळ वेगवेगळ्या प्रकारे करतात. कांदा लसूण, मसाले घालून किंवा कांदा लसूण न घालता. माझी आई कांदा लसूण न घालता उसळ करायची. तशी काहीही मसाले न घातलेली साधी उसळ फार चविष्ट लागते. ही रेसिपी तशा उसळीची.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

ओले काजू ४०४५

ताजा खवलेला नारळ अर्धा कप

हिरवी मिरची ३४ मधे उभी चीर देऊन

चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून

आमसूल २ किंवा आमचूर पाव टीस्पून

साखर चवीनुसार

जिरेपूड पाव टीस्पून

तेल १ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

कढीपत्ता ४५ पानं

हळद अर्धा टीस्पून

हिंग २ चिमूट

मीठ चवीनुसार

दूध पाव कप

कृती

. ओले काजू ८ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. काजू सोलून घ्या.

Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Peeled Fresh Cashew (सोललेले ओले काजू)

. एका पातेल्यात दीड कप पाणी आणि पाव कप दूध घालून गरम करा. पाण्याला उकळी आली की त्यात सोललेले काजू घाला. मंद आचेवर काजू थोडे नरम होईपर्यंत शिजवा. शिजलेले काजू गाळून घ्या. पाणी आणि दुधाचं मिश्रण टाकून द्या.

. २ टीस्पून खवलेला नारळ काढून ठेवा आणि बाकीचा नारळ मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून जाडसर वाटून घ्या.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंगाची खमंग फोडणी करा. त्यात कढीपत्ता घाला. हिरव्या मिरच्या घाला.

. शिजलेले काजू घालून २ मिनिटं परतून घ्या. वाटलेला नारळ घाला. पाव कप पाणी घाला.

. मिश्रणाला उकळी आली की त्यात मीठ, साखर, आमसूल / आमचूर, जिरे पूड घाला. रस जेव्हढा दाट / पातळ हवा असेल तसं मिश्रण उकळून घ्या. ह्या उसळीचा रस दाटसर असतो.

. शेवटी बाजूला काढलेला नारळ, कोथिंबीर घालून उसळ ढवळून घ्या. गॅस बंद करा.

. ओल्या काजूची चविष्ट उसळ तयार आहे. गरम गरम उसळ पोळीसोबत किंवा अशीच खायला द्या.

Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji
Olya Kajuchi Usal (ओल्या काजूची उसळ) – Fresh Cashew Subji

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes