Adai (अडई) – Protein Rich Mixed Lentil Savory Pan Cake – No Fermentation required
Adai is a type of South Indian thick Dosa made using different types of Lentils and Rice. This protein rich snack is very good for Breakfast as well as evening Snack. This recipe does not require any fermentation. There are some variations in the recipe. Some recipes add Onions to the batter; some others add Ginger, some add both whereas some others skip both. You can decide to add whatever you like. But Red Chilies and Curry Leaves are a MUST. Unlike regular dosa, Adai batter has more of Chana Dal and Tur Dal but less of Udid Dal. This gives a different yet nice taste and texture to Adai.
Ingredients (1 cup = 250 ml)
Split Chickpeas (Chana Dal) 1 cup
Split Pigeon Peas (Tur Dal) 1 cup
Split Black Gram (Udid Dal) ¼ cup
Split Petite yellow Lentil (Moong Dal) ¼ cup
Raw Rice 1 cup
Flattened Rice (Poha) ¼ cup
Fenugreek Seeds 1 teaspoon
Red Chilies 4-5
Curry Leaves 7-8
Cumin Seeds 1 teaspoon
Crushed Ginger 1 teaspoon
Salt to taste
Ghee / Oil for Pan frying dosas
Instructions
1. Wash and Soak all grains together for 6-8 hours. Add Flattened Rice, Fenugreek Seeds while soaking.
2. Drain the water and grind Soaked grains along with Green chilies and Curry leaves into a coarse paste. Consistency of the batter should be like Idli batter (Pan cake patter).
3. Add Crushed Ginger, cumin seeds and salt to the batter.
4. Mix well to get a thick but spreadable batter – thicker than dosa batter; add water if required.
5. Heat an Iron or a non stick Griddle.
6. Sprinkle water and Grease it with oil with the help of cut Onion (like we do for dosa). Pour a ladle full of batter on the Griddle and spread it evenly to make little thick dosa (thinner than pan cake/ Uttapa).
7. Cover and cook for 2-3 minutes on medium flame.
8. Remove the lid; put a few drops of ghee / oil; spread it on Adai.
9. Now flip the Adai and roast the other side. Put a few drops of ghee / oil.
10. When the other side is light brown, Adai is ready.
11. Serve hot Adai with Chutney and Sambar.
==================================================================================
अडई – दक्षिण भारतीय डोसा – No fermentation डोसा
अडई हा एक दक्षिण भारतीय डोश्याचा एक वेगळा प्रकार आहे. ह्यात मिश्र डाळी आणि तांदूळ घालतात पण पीठ आंबवत नाहीत. हा प्रोटीन रिच नाश्त्याचा प्रकार कधीही खायला छान पर्याय आहे. अडई करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काहीजण ह्यात कांदा घालतात, काही आलं घालतात, काही दोन्ही घालतात तर काही दोन्ही घालत नाहीत. तुम्हाला आवडेल तसं करू शकता पण लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालणं मस्ट आहे. नेहमीच्या डोश्यापेक्षा वेगळं म्हणजे ह्यात चणा डाळ आणि तूर डाळ जास्त असते आणि उडीद डाळ अगदी कमी. त्यामुळे अडईची चव आणि टेक्सचर डोश्यापेक्षा वेगळं पण छान असतं.
साहित्य (१ कप = २५० मिली )
चणा डाळ १ कप
तूर डाळ १ कप
उडीद डाळ पाव कप
मूग डाळ पाव कप
तांदूळ १ कप
पोहा पाव कप
मेथी १ टीस्पून
लाल मिरच्या ४–५
कढीपत्ता ७–८
जिरं १ टीस्पून
ठेचलेलं आलं १ टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल / तूप डोसे भाजायला
कृती
१. सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून ६–८ तास पाण्यात एकत्र भिजवून ठेवा.भिजवताना पोहे आणि मेथी घाला.
२. पाणी काढून टाका. भिजवलेलं धान्य, लाल मिरच्या आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. पीठ इडलीच्या पिठाएवढं दाट हवं.
३. पिठात जिरं,आलं आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करा.
४. थोडं पाणी घालून डोश्याच्या पिठापेक्षा दाट पण पसरता येईल असं पीठ बनवा.
५. एक लोखंडी /नॉन स्टिक तवा गरम करून घ्या.
६. तव्यावर थोडं पाणी, तेल शिंपडून कापलेल्या कांद्याने पसरून घ्या (डोश्यांसारखं). एक मोठा डाव पीठ तव्यावर घालून डावाने जाडसर पसरवा – (उत्तपा पेक्षा पातळ).
७. झाकण ठेवून २–३ मिनिटं अडई भाजून घ्या.
८. झाकण काढून अडईवर थोडं तेल / तूप घाला.
९. अडई पलटून दुसरी बाजू भाजून घ्या.
१०. अडई दोन्ही बाजूंनी छान भाजलं की खायला तयार आहे.
११. गरम गरम अडई चटणी आणि सांबार सोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes