Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू) – Coconut Laadoo with Coconut Jaggery

Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)
Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)

Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू) – Coconut Laadoo with Coconut Jaggery

माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू मराठी

These Coconut Laddus are different from the regular ones. I add fresh coconut as well as dry coconut in this. And the most important difference is I use ‘Coconut Jaggery’ instead of regular Jaggery. Coconut Jaggery is dark brown in colour and it has little bitter – caramelized taste that makes the laddus taste delicious. Coconut Jaggery has more nutrients than regular Jaggery. It also has some medicinal properties.

Someone from Goa had given us Coconut Laddus that were black in colour but the taste was awesome. I did not know the recipe. But in our next trip to Goa when I happened to see and tasted ‘Coconut Jaggery’, I realized what resulted in the caramelized taste of Laddus. I tried a couple of times and then was able to replicate the taste and the texture of the Laddus we had tasted.

Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 14-15 bite size laddus)

Coconut Jaggery (माडाचा गूळ)
Coconut Jaggery (माडाचा गूळ)

Fresh scraped coconut ¾ cup

Grated Dry Coconut ¾ cup

Crushed Coconut Jaggery 1 cup

Crushed Regular Jaggery ¼ cup

Sesame Seeds 1 teaspoon

Coconut Oil / Pure Ghee to grease the plate

Instructions

1. Dry roast Sesame Seeds till they splutter. Take out in a plate.

2. Dry roast grated Dry Coconut till light brown. Take out in a plate.

3. In a heavy bottom pan, add Fresh Scraped coconut, Coconut Jaggery and Regular Jaggery. Keep cooking on medium flame stirring all the time.

4. When Jaggery melts, add dry coconut. Keep cooking till the mixture starts coming together.

5. Add Sesame Seeds and Mix.

6. Grease a plate with Coconut Oil / Ghee. Transfer the mixture to the greased plate, do not spread it.

7. When mixture is warm, make bite size balls. Delicious Coconut Laddus with Coconut Jaggery are ready. These Laddus are soft. If you want them little hard, cook the mixture for some more time.

8. Relish these Laddus as any time snack. Laddus can be stored for 8-10 days without refrigeration.

Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)
Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)
Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)
Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू

हे लाडू नेहमीच्या नारळाच्या लाडवांपेक्षा वेगळे आहेत. ह्यात ताजा नारळ आणि सुकं खोबरं घालतंय. आणि दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे साध्या गुळाऐवजी माडाचा गूळ घातलाय. माडाचा गूळ गोवा, केरळ मध्ये मिळतो. आणि हल्ली ऑनलाईन सुद्धा मिळतो. हा गूळ गडद तपकिरी रंगाचा (काळपट) असतो आणि चवीला थोडासा कडवट, कॅरॅमल सारखा लागतो. माडाचा गूळ नेहमीच्या गुळापेक्षा जास्त पौष्टिक आणि औषधी असतो. ह्या गुळामुळेच लाडवांना एक वेगळी चव येते. ज्यांना कडवट कॅरॅमलची चव आवडते त्यांना हे लाडू खूप आवडतील.

गोव्यात एकदा आम्हाला हे लाडू एका परिचिताने दिले होते. त्याची चव फार छान होती. मला लाडवाची रेसिपी माहित नव्हती. पण नंतर गोव्याच्या बाजारात जेव्हा मला माडाचा गूळ दिसला तेव्हा ह्या लाडवांना ही कॅरॅमलची चव कशी आली असेल त्याचा अंदाज आला. दोन वेळा प्रयोग करून लाडवांची हवी तशी चव आणि टेक्सचर मिळालं.

साहित्य (१ कप = २५० मिली ) (लहान आकाराचे १४१५ लाडू होतात)

Coconut Jaggery (माडाचा गूळ)
Coconut Jaggery (माडाचा गूळ)

ताजा खवलेला नारळ पाऊण कप

किसलेलं खोबरं पाऊण कप

चिरलेला माडाचा गूळ १ कप

चिरलेला साधा गूळ पाव कप

तीळ १ टीस्पून

खोबरेल तेल / साजूक तूप ताटलीला लावायला

कृती

. तीळ सुकेच खमंग भाजून घ्या आणि एका ताटलीत काढून ठेवा.

. किसलेलं सुकं खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. एका ताटलीत काढून ठेवा.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात खवलेला नारळ, माडाचा गूळ आणि साधा गूळ घाला. मध्यम आचेवर ढवळत राहून मिश्रण शिजवा.

. गूळ वितळला की त्यात सुकं खोबरं घाला. मिश्रण एकत्र यायला लागेपर्यंत शिजवत रहा.

. तीळ घालून मिश्रण ढवळून घ्या.

. तेल / तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण काढा.

. मिश्रण कोमट झाल्यावर त्याचे छोट्या आकाराचे लाडू वळा. माडाच्या गुळाचे नारळाचे स्वादिष्ट लाडू तयार आहेत. हे लाडू जरा मऊ असतात. तुम्हाला घट्ट लाडू हवे असतील तर मिश्रण आणखी थोडा वेळ शिजवा.

. हे लाडू कधीही खायला छान लागतात. लाडू ८१० दिवस फ्रिजबाहेर चांगले राहतात.

Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)
Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)
Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)
Madachya Gulache Naralache Laadoo (माडाच्या गुळाचे नारळाचे लाडू)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes