Albukhar Kandyachi Chutney (अलबुखार (प्लम) कांद्याची चटणी ) – Plum Onion Chutney – My innovative recipe
अलबुखार (प्लम) कांद्याची चटणी मराठी
I’ve designed this recipe myself. Sometimes you land up with sour Plums. But you don’t want to throw them away. I make 2 different types of Chutney to meaningfully utilize sour plums. This recipe is one of them. It’s a very easy recipe with minimal ingredients. This can be a good accompaniment with practically everything – Thepla, Roti, Dhokla, Indian Crepe, Indian Pan Cake or Bread. Try it out. Tempering for the Chutney is optional. I sometimes add it; sometimes I don’t.
Ingredients
Plums 3
Onions 2 medium
Jaggery about 1-2 tablespoon (adjust as per taste)
Red Chili Powder 1-1.5 teaspoon (adjust as per taste)
Salt to taste
For Tempering (optional)
Oil 1 teaspoon
Mustard seeds ¼ teaspoon
Cumin seeds ¼ teaspoon (optional)
Asafoetida (Hing) 1 pinch
Instructions
1. Peel Onions and chop into medium size pieces. Chop Plums into medium size pieces; remove the seed.
2. Transfer the pieces to a Grinder. Add Red Chili Powder, Jaggery and Salt.
3. Grind into a smooth paste. Since Plums has a good amount of water content, you don’t need to add water. Transfer it to a bowl.
4. If you want to add tempering – heat oil in a ladle. Add mustard seeds; wait till crackles. Add cumin seeds; wait till crackles. Add Asafoetida. Pour this tempering onto the Chutney.
5. Yummy Chutney is ready. Serve it with Thepla, Roti, Dhokla, Indian Crepe, Indian Pan Cake or Bread.
==================================================================================
अलबुखार (प्लम) कांद्याची चटणी – Plum Onion Chutney – माझी नाविन्यपूर्ण रेसिपी
ही माझी स्वतःची रेसिपी आहे. अगदी कौतुकाने आणलेले अलबुखार कधी कधी अतिशय आंबट निघतात. अशा वेळी त्या अलबुखारचा सदुपयोग करण्यासाठी मी दोन प्रकारच्या चटण्या करते. त्यातली ही एक चविष्ट चटणी. रेसिपी अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारी आहे. नक्की करून बघा.
ही चटणी कशाही सोबत खाऊ शकता.
ह्या चटणीला मी कधी कधी फोडणी देते; कधी देत नाही. दोन्ही प्रकारे केलेली चटणी छान लागते.
साहित्य
अलबुखार (प्लम) ३
कांदे २ मध्यम
लाल तिखट एक – दीड टीस्पून (चवीप्रमाणे कमी जास्त करा)
चिरलेला गूळ अंदाजे १ – २ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी जास्त करा)
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी (ऐच्छिक)
तेल १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून (ऐच्छिक)
हिंग चिमूटभर
कृती
१. कांदे सोलून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. अलबुखार च्या बिया काढून टाका आणि मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.
२. मिक्सरच्या भांड्यात अलबुखार, कांदे, गूळ, लाल तिखट, आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या. ह्यात पाणी घालावं लागत नाही.
३. चटणी एका वाडग्यात काढून घ्या.
४. एका कढल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून ती चटणीवर ओता.
५. चविष्ट चटणी तयार आहे. पोळी, भाकरी, ठेपला, घावन, धिरडं, ढोकळा कशाही सोबत छान लागते.
Your comments / feedback will help improve the recipes