Albukhar Chutney (अलबुखार (प्लम) चटणी ) – Plum Chutney – My innovative recipe – No Onion Garlic Recipe
I’ve designed this recipe myself. Sometimes you land up with sour Plums. But you don’t want to throw them away. I make 2 different types of Chutney to meaningfully utilize sour plums. I’d already shared a recipe of Plum Onion Chutney – (Link https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2023/08/albukhar-kandyachi-chutney/); this is the second one without Onion, Garlic. It’s a very easy recipe with ingredients generally available in Indian kitchen. This can be a good accompaniment with practically everything – Thepla, Roti, Dhokla, Indian Crepe, Indian Pan Cake or Bread. Try it out.
Ingredients (1 cup = 250 ml)
Plums 2
Fresh Scraped Coconut ½ cup
Chutney Daal / Roasted Bengal Gram ½ cup
Sugar / Jaggery about ½ to 1 teaspoon (adjust as per taste)
Red Chili Powder 1-1.5 teaspoon (adjust as per taste) Or Dry Red Chilies 4-5
Salt to taste
Instructions
1. Chop Plums into medium size pieces; remove the seed.
2. Transfer the pieces to a Grinder. Add all the ingredients.
3. Grind into a smooth paste. If required, add some water while grinding. Transfer it to a bowl.
4. Yummy Plum Chutney is ready. Serve it with Thepla, Roti, Dhokla, Indian Crepe, Indian Pan Cake or Bread.
Note
1. If you want to add tempering – heat ½ teaspoon of oil in a ladle. Add mustard seeds; wait till crackles. Add cumin seeds; wait till crackles. Add Asafoetida and 3-4 curry leaves. Pour this tempering onto the Chutney.
==================================================================================
अलबुखार (प्लम) चटणी – Plum Chutney – माझी नाविन्यपूर्ण रेसिपी – कांदा लसूण विरहित
ही माझी स्वतःची रेसिपी आहे. अगदी कौतुकाने आणलेले अलबुखार कधी कधी अतिशय आंबट निघतात. अशा वेळी त्या अलबुखारचा सदुपयोग करण्यासाठी मी दोन प्रकारच्या चटण्या करते. अलबुखार आणि कांद्याच्या चटणीची रेसिपी मी आधी पोस्ट केली होती – (लिंक https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2023/08/albukhar-kandyachi-chutney/)
ही दुसऱ्या प्रकारची कांदा लसूण विरहित चविष्ट चटणी. रेसिपी अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारी आहे. नक्की करून बघा. ही चटणी कशाही सोबत खाऊ शकता.
साहित्य (१ कप = २५० मिली)
अलबुखार (प्लम) २
ताजा खवलेला नारळ अर्धा कप
चटणी डाळ / डाळं अर्धा कप
लाल तिखट एक – दीड टीस्पून (चवीप्रमाणे कमी जास्त करा) किंवा
सुक्या लाल मिरच्या ४-५
साखर /चिरलेला गूळ अंदाजे अर्धा ते १ टीस्पून (चवीप्रमाणे कमी जास्त करा)
मीठ चवीनुसार
कृती
१. अलबुखारच्या बिया काढून टाका आणि मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.
२. मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घालून बारीक वाटून घ्या. जरूर असेल तर वाटताना थोडं पाणी घाला.
३. चटणी एका वाडग्यात काढून घ्या.
५. चविष्ट चटणी तयार आहे. पोळी, भाकरी, ठेपला, घावन, धिरडं, ढोकळा कशाही सोबत छान लागते.
टीप
१. हवी असेल तर ह्या चटणीला फोडणी देऊ शकता. एका कढल्यात अर्धा टीस्पून तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करून ती चटणीवर ओता.
Your comments / feedback will help improve the recipes