Vatli Dal (वाटली डाळ) – Tasty Maharashtrian Snack using Split Bengal Gram

Vatli Dal (वाटली डाळ)
Vatli Dal (वाटली डाळ)

Vatli Dal (वाटली डाळ) – Tasty Maharashtrian Snack using Split Bengal Gram

वाटली डाळ मराठी

This is a Maharashtrian snack made of Split Bengal Gram (Chana Daal). It is somewhat like Gujarati Snack Amiri Khaman but this one does not use Baking Soda and Curd. Vatli Dal is very healthy, protein rich and tasty. Traditional way of making this is to grind soaked Chana Dal and then cook it in a wok. But in this method, you need more oil and also you need to stir it regularly to avoid it sticking to the pan. I use an easier method which reduces the oil requirement as well as the effort of stirring the mixture. Please read the full recipe for details.

Ingredients (1 cup = 250 ml) (Serves 4-5)

Split Bengal Gram (Chana Dal) 1 cup

Green Chili Paste 1 teaspoon

Sugar 1 teaspoon

Lemon Juice 1 teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Coriander leaves chopped 1 tablespoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash and Soak Chana dal in water for 6 hours.

2. Drain water and Coarse Grind Chana dal with very little water.

3. Pressure Cook ground Chana Dal. After 1 whistle, cook on simmer for 5 minutes.

4. When the Cooked Dal comes to room temperature, grind it in a grinder on pulse mode just for a few seconds. We just have to loosen the Dal; not to grind it fine.

5. Heat oil in a pan. Add Mustard Seeds, wait for splutter; Add Cumin Seeds, wait for splutter; Add Turmeric Powder, Asafoetida and Green Chili Paste.

6. Add Chana Dal. Mix.

7. Sprinkle ¼ cup water over the mixture. Cook covered on low flame for 3 minutes.

8. Add sugar, salt, lemon juice, scraped coconut, chopped coriander leaves and mix well.

9. Sprinkle ¼ cup water over the mixture.

10. Cook covered on low flame for 3 minutes. If the mixture is dry, add some more water and cook covered for a few minutes.

11. Yummy Vaatli Daal is ready to serve. Garnish with Coconut, Coriander and Server Hot.

Vatli Dal (वाटली डाळ)
Vatli Dal (वाटली डाळ)
Vatli Dal (वाटली डाळ)
Vatli Dal (वाटली डाळ)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

वाटली डाळ महाराष्ट्रीयन पारंपरिक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

वाटली डाळ हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल. खेदाची गोष्ट अशी आहे की त्यांना आमिरी खमण माहित असतो पण वाटली डाळ माहित नसते. आपण महाराष्ट्रीयन लोक आपले पदार्थ लोकांपर्यंत पोहोचविण्यात फार कमी पडतो. असो

तर वाटली डाळ हा पदार्थ थोडा आमिरी खमण सारखा असतो पण ह्यात बेकिंग सोडा, दही घालत नाहीत. ह्याला आपण चणा डाळीचा तिखटमिठाचा शिरा म्हणू शकतो. अतिशय चविष्ट आणि प्रोटीन रीच अशी ही वाटली डाळ काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रसाद म्हणून करतात.

पारंपरिक पद्धतीत वाटली डाळ करताना चणा डाळ भिजवून जाडसर वाटून घेतात आणि ती फोडणीत घालून थोडं पाणी शिंपडून शिजवतात. पण असं करताना तेल जास्त घालावं लागतं आणि डाळ सतत ढवळावी लागते नाहीतर ती कढईला चिकटते. मी एका वेगळ्या पद्धतीने वाटली डाळ करते त्यात तेलही कमी लागतं आणि डाळ सतत ढवळावी लागत नाही. डाळीच्या चवीत काही फरक पडत नाही. ती पद्धत कोणती हे जाणून घेण्यासाठी पूर्ण रेसिपी वाचा.

साहित्य (१ कप = २५० मिली) (५ जणांसाठी)

चणा डाळ १ कप

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

साखर १ टीस्पून

लिंबाचा रस १ टीस्पून

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग १ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. चणा डाळ धुवून ६ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. पाणी निथळून डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. डाळ वाटताना जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.

. वाटलेली डाळ प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. कुकरची एक शिटी झाल्यावर गॅस बारीक करून ५ मिनिटं शिजवा.

. शिजलेली डाळ थंड झाली की मिक्सरमध्ये पल्स मोड वर ३४ सेकंद फिरवून घ्या. आपल्याला डाळ फक्त मोकळी करून घ्यायची आहे; बारीक वाटायची नाही.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून खमंग फोडणी करून घ्या. फोडणीत हिरवी मिरची घाला.

. कढईत डाळ घालून ढवळून घ्या. पाव कप पाणी शिंपडा आणि झाकण ठेवून ३ मिनिटं मंद आचेवर वाफ काढा.

. आता डाळीत मीठ, साखर, लिंबाचा रस, नारळ, कोथिंबीर घालून ढवळून घ्या.

. परत पाव कप पाणी शिंपडून ढवळून घ्या आणि झाकण ठेवून ३ मिनिटं मंद आचेवर वाफ काढा. डाळ सुकी असेल तर आणखी पाणी शिंपडून वाफ काढा.

. चविष्ट आणि पौष्टिक वाटली डाळ तयार आहे. गरम गरम डाळ वर नारळ, कोथिंबीर भुरभुरवून खायला द्या.

Vatli Dal (वाटली डाळ)
Vatli Dal (वाटली डाळ)
Vatli Dal (वाटली डाळ)
Vatli Dal (वाटली डाळ)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes