Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा) – Lentil Stuffed Paratha – No Onion Garlic recipe

Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)

Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा) – Lentil Stuffed Paratha – No Onion Garlic recipe

मूग डाळ स्टफ्ड पराठा मराठी

This recipe was told to me by my house help. I modified the recipe to match our palate. This is a stuffed Paratha with a filling of Moong Dal (Petite Yellow lentil). Paratha is very tasty, healthy and quite filling. Making the filling is not much time consuming. Paratha can be relished with Pickle or Curd or by itself. This can be a good breakfast or meal option.

Stuffing of this Paratha can be stored in refrigerator for a week.

Ingredients (Makes 14-15 Parathas) (1 cup = 250 ml)

For Filling

Moong Dal (Petite yellow Lentil) 1 cup

Besan (Gram Flour) 1 tablespoon

Crushed / Finely chopped Green Chilies 3-4

Chili Powder ½ teaspoon

Fennel Seeds (Saunf) 1 teaspoon

Carom Seeds (Ajwain) 1 teaspoon

Mango Powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Cumin Powder ½ teaspoon

Chopped Coriander 2 tablespoon

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to Taste

Sugar ½ teaspoon (optional)

Oil 1 tablespoon

For Cover

Wheat Flour 3-3.5 cups

Salt ¼ teaspoon

Oil 2 teaspoon

Wheat flour for dusting while rolling Parathas

Oil/ Ghee (Clarified Butter) for roasting Parathas

Instructions

1. Wash and Soak Moong Dal in water for 4 hours.

2. Cook Moong Dal on medium flame till Dal is soft. Don’t overcook.

3. Add salt and 2 teaspoon oil to wheat flour. Add water gradually and bind a medium consistency dough. Knead for 5 minutes and keep it covered for 30 minutes.

4. Add 1 tablespoon of oil in a pan and heat it. Add Besan and roast on low flame till you get nice aroma of roasted besan.

5. Add Cooked Moong Dal. Mix.

6. Add chopped green Chilies, Chili Powder, Turmeric powder, Coriander Powder, Cumin Powder, Mango Powder, roughly crushed Fennel seeds, Carom seeds, sugar and salt. Mix well.

7. Keep cooking on low flame stirring continuously. The mixture should be little spicy. If required, add more spices as per your taste. The consistency of the mixture should be same as that of the dough. Keep stirring till you get the right consistency.

8. The filling is ready. Switch off the gas, spread the mixture in a plate, add chopped coriander, mix and leave it to cool.

Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Stuffing for Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा- सारण)

For Rolling Parathas

1. Knead the dough for 3-4 minutes. Make big lemon size balls of the dough. Make filling balls bigger than dough balls.

2. Roll the dough ball into 4-5 inches diameter circle.

3. Take similar size filling ball. Place it on the dough circle.

4. Gather the dough to make pleats, gently pull them together and seal the edges.

5. Dust the filled dough ball with dry wheat flour, gently pat it to make a circle 4-5 inches in diameter.

6. Now with the help of rolling pin, gently roll the dough ball into a medium thick circle (Paratha). Keep the sealed side facing the rolling board. Use dry wheat flour for dusting.

7. Heat a non stick/ Iron Griddle. Transfer the Paratha onto hot Griddle.

8. Roast it on medium flame for 2-3 minutes.

9. Flip the Paratha and drop some oil / ghee on the Paratha; spread it. Roast for 2-3 minutes.

10. Flip the Paratha and drop some oil / ghee on the Paratha; spread it. Roast till Paratha is nicely roasted and gets light brown colour on both sides.

Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)

11. Serve Hot Paratha with Chutney / Pickle / Butter / Curd / Yogurt.

Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मूग डाळ स्टफ्ड पराठा कांदा लसूण विरहित चविष्ट, पौष्टिक पराठा

ही माझ्या मदतनीस बाईंनी सांगितलेली रेसिपी आहे. आमच्या चवीप्रमाणे मी त्यात थोडे बदल केले आहेत. हे मूगडाळीचं सारण घालून केलेले पराठे आहेत. सारण थोडं कचोरीच्या सारणासारखं लागतं. पराठे छान चविष्ट, पौष्टिक आणि पोटभरीचे होतात. सारण करणं तसं सोपं आहे आणि फार वेळकाढूही नाही. हे पराठे चटणी / लोणचं / दह्यासोबत खाऊ शकता किंवा असेच खायला ही छान लागतात. हा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणात खाण्यासाठी चांगला पर्याय आहे. पराठ्याचं सारण फ्रिजमध्ये आठवडाभर चांगलं राहतं.

साहित्य ( १४१५ पराठ्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

सारणासाठी

मूग डाळ १ कप

बेसन १ टेबलस्पून

ठेचलेली / बारीक चिरलेली हिरवी मिरची

लाल तिखट अर्धा टीस्पून

बडीशेप १ टीस्पून

ओवा १ टीस्पून

आमचूर अर्धा टीस्पून

धने पावडर अर्धा टीस्पून

जिरे पावडर अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

हळद अर्धा टीस्पून

साखर अर्धा टीस्पून (ऐच्छिक)

मीठ चवीनुसार

तेल १ टेबलस्पून

आवरणासाठी

कणिक . कप

मीठ पाव टीस्पून

तेल २ टीस्पून

कणिक पराठे लाटताना लावण्यासाठी

तेल / तूप पराठे भाजताना लावण्यासाठी

कृती

. मूग डाळ धुवून ४ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. मध्यम आचेवर मूग डाळ नरम होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.

. कणकेत मीठ आणि २ टीस्पून तेल घालून मध्यम सैल भिजवून घ्या. ५ मिनिटं मळून अर्धा तास झाकून ठेवा.

. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात बेसन घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

. कढईत शिजलेली मूग डाळ घालून एकजीव करा.

. कढईत हिरव्या मिरच्या, लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, आमचूर, जाडसर कुटलेली बडीशेप, ओवा, साखर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा.

. मिश्रण (सारण) सतत ढवळून सुकवा. सारण नेहमीपेक्षा मसालेदार हवं. चव बघून जरुरीप्रमाणे तिखट, मीठ, मसाले घाला. कणिक आणि सारण एकसारखं सैल/ घट्ट असावं (same consistency).

. सारण तयार झालं की चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करा आणि एका ताटलीत पसरून सारण गार करा.

Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Stuffing for Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा – सारण)

पराठे बनवण्यासाठी

. भिजवलेली कणिक छान मळून घ्या आणि त्याचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा.

. पिठाची पुरी लाटून त्यावर कणकेच्या गोळ्यापेक्षा मोठा सारणाचा गोळा ठेवा.

. सारण पुरीवर ठेवून पिठाच्या चुण्या घालत गोळा बंद करा. गोळ्याच्या वरचं जास्तीचं पीठ गोळ्यावर दाबून टाका.

. भरलेल्या गोळ्याला दोन्ही बाजूनी थोडं सुकं पीठ लावून हाताने थापून पुरी करा म्हणजे सारण नीट पसरलं जाईल.

. आता गोळ्याची बंद केलेली बाजू पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने जरा जाडसर पराठा लाटून घ्या. हवे असेल तर लाटताना सुकं पीठ लावा.

. नॉन स्टिक/ लोखंडी तवा गरम करून त्यावर पराठा घाला. मध्यम गॅस वर मिनिटं भाजून पराठा पलटून घ्या. पराठ्यावर थोडं तेल / तूप घाला आणि पसरून घ्या.

. मिनिटांनी परत एकदा पलटून दुसऱ्या बाजूवर तेल / तूप घाला.

Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)

. पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजला की गरमागरम पराठा लोणचं / चटणी / लोणी /दह्यासोबत खायला द्या.

Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)
Mug Dal Stuffed Paratha (मूग डाळ स्टफ्ड पराठा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes