Steamed Nachani Kachori (नाचणीची वाफवलेली कचोरी) – Steamed Finger Millet Croquette – Healthy and Tasty Snack
This recipe won a prize in the prestigious contest – Paknirnay 2024 organised by popular publication Kalnirnay.
Kachori is a popular snack in India. Generally Kachori is made with some savory filling stuffed in Potato or all purpose flour outer cover and it’s deep fried. This is a healthy version of traditional Kachori where Kachori is Steamed and not deep fried. Also the Outer cover is made of Finger Millet. It’s a healthy and tasty any time snack.
This is my Innovative Recipe to celebrate International Millet Year 2023.
Ingredients (makes 15-16 Kachori) (1 cup = 250 ml)
Finger Millet Flour 1 cup
Finger Millet Rava (coarse flour) 2 tablespoon (It’s easily available in the market)
Fresh scraped coconut 1.5 cup
Green Chilies finely chopped 3-4
Cashew Nuts finely chopped 6-7
Sugar about 1 teaspoon
Amchoor / Mango Powder ½ teaspoon
Chat Masala ½ teaspoon
Oil about ½ teaspoon
Salt to taste
Instructions
1. Soak Finger Millet Rava in water for 15 minutes.
2. In a pan take 1 cup water, add salt and chat masala, Bring the water to boil. Add Finger Millet flour, stir it, switch off the gas and keep it covered for 15-20 minutes.
3. For the stuffing, take fresh scraped coconut in a bowl.
4. Add Cashew Nuts, Green Chilies, Mango Powder, Salt and Sugar. Mix together. Stuffing is ready.
5. Take out the steamed flour in a plate and knead it to form a smooth dough. Apply water and little oil while kneading.
6. Apply little oil or water to your palms and make small lemon size balls of the dough.
7. Using your fingers, make a hollow cup of the dough ball. Stuff a spoonful of stuffing and seal the edges properly. Stuff all the dough balls this way.
8. Drain water from soaked Finger Millet Rava.
9. Heat water in a Steamer. Place muslin cloth on the plate in the Steamer.
10. Roll each Kachori in Finger Millet Rava and Place it on the cloth in the plate.
11. When the water in the Steamer started boiling, place the plate with Kachoris in the Steamer, close the Steamer with the lid. Steam the Kachoris on medium flame for 15 minutes.
12. Steamed Nachani Kachori is ready. Serve hot with choice of chutney and / or Tomato Sauce.
Note
1. These Kachoris don’t become hard even after cooling. So if you want to serve these as starter, Steam all Kachoris upfront and steam them once again before serving.
==================================================================================
नाचणीची वाफवलेली कचोरी – पौष्टिक आणि चवदार
#international_millet_year #millet_year_2023
माझ्या ह्या रेसिपीला पाकनिर्णय २०२४ मध्ये ‘वाफवलेले पदार्थ‘ ह्या विभागात पारितोषिक मिळालं.
कचोरी हा आपल्याकडचा लोकप्रिय प्रकार आहे. पारंपरिक कचोरीत बटाट्याच्या / मैद्याच्या पारीत सारण भरून ती तेलात / तुपात तळतात. ही माझी रेसिपी पारंपरिक कचोरीचं हेल्दी रूप आहे. ह्यात कचोरी तळलेली नसून वाफवलेली आहे. आणि बाहेरचं आवरण सुद्धा मैदा / बटाट्याचं नसून नाचणीचं आहे. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरं होतंय. त्याप्रित्यर्थ ही माझी नाविन्यपूर्ण मिलेट रेसिपी.
साहित्य (१ कप = २५० मिली) (१५–१६ कचोरीसाठी)
नाचणी पीठ १ कप
नाचणी रवा २ टेबलस्पून (हा रवा बाजारात सहज मिळतो)
ताजा खवलेला नारळ दीड कप
हिरव्या मिरच्या ३–४ बारीक चिरून
काजूगर ६–७ बारीक तुकडे करून
साखर १ टीस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)
आमचूर अर्धा टीस्पून
चाट मसाला अर्धा टीस्पून
तेल अंदाजे अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. नाचणीचा रवा १५ मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा.
२. एका पातेल्यात १ कप पाणी घेऊन त्यात मीठ आणि चाट मसाला घालून पाणी गरम करा. पाण्याला उकळी आली की त्यात नाचणीचं पीठ घालून ढवळून घ्या आणि गॅस बंद करा. ही नाचणीच्या पिठाची उकड आहे. पातेलं १५–२० मिनिटं झाकून ठेवा.
३. सारणासाठी एका वाडग्यात खवलेला नारळ घेऊन त्यात काजू, मिरच्या, आमचूर, मीठ आणि साखर घालून ढवळून घ्या. सारण नेहमीपेक्षा थोडं तिखट करा म्हणजे कचोरी छान चवदार लागेल.
४. नाचणीच्या पिठाची उकड एका परातीत घ्या. पाणी आणि थोडं तेल लावून उकड छान मऊसर मळून घ्या.
५. पाणी किंवा तेलाचा हात घेऊन उकडीचे छोट्या लिंबाएवढे गोळे करा.
६. प्रत्येक गोळ्याची पारी करून त्यात १ टीस्पून सारण घाला आणि गोळा नीट बंद करून घ्या. असं सारण भरून सगळ्या कचोऱ्या करून घ्या.
६. नाचणीच्या भिजवलेल्या रव्यातलं पाणी काढून टाका.
७. इडलीपात्रात किंवा मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा. त्यात नीट बसेल अशी ताटली घेऊन ताटलीत एक पातळ कापड पसरा.
८. तयार कचोऱ्या नाचणीच्या रव्यात घोळवून घ्या आणि ताटलीतल्या कपड्यावर ठेवा.
९. इडलीपात्रातलं / पातेल्यातलं पाणी उकळू लागलं की कचोऱ्यांची ताटली त्यात ठेवा. झाकण लावून मध्यम आचेवर १५ मिनिटं वाफवून घ्या.
१०. नाचणीची वाफवलेली कचोरी तयार आहे. गरम गरम कचोरी चटणी / टोमॅटो सॉस सोबत खायला द्या.
टीप
१. ह्या कचोऱ्या गार झाल्या तरी दडदडीत होत नाहीत. पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून करायच्या असतील तर आधी कचोऱ्या वाफवून ठेवा आणि खायला द्यायच्या वेळी परत एकदा वाफ काढा.
Your comments / feedback will help improve the recipes