Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार) – A Healthy and Tasty Any time Snack

Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)
Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)

Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार) A Healthy and Tasty Any time Snack

ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार मराठी

Now-a-days there is a craze for Nutribar in young generation. It’s very easy to make these at home. Nutribars are generally made using Oats, dates, nuts and raisins. Nut you can any nutritious ingredient as per your choice. I add Salichya Lahya – साळीच्या लाह्या (Popped Rice) in Nutribar that gives it a nice texture. Also I add dried Cranberries that gives little sour taste to the Nutribar. These Nutribars are good for people of all age groups.

Ingredients (1 cup = 250 ml)

Oats 1.5 cups

Popped Rice (Salichya Lahya- साळीच्या लाह्या ) 1 cup

Chopped Dates ½ cup

Cranberries ½ cup

Pumpkin Seeds ¼ cup (or any other seeds / Nuts)

Crushed Jaggery ½ cup (adjust as per the required sweetness)

Desi Ghee (Clarified Butter) 2-3 tablespoon

Instructions

1. De-seed Dates and chop into small pieces.

2. Dry Roast Oats till it changes colour. Transfer it to a bowl.

3. If Popped Rice is not crispy, heat it in a pan for 3-4 minutes (Or heat it in Microwave for 2 minutes) and leave it to cool.

4. Grind Popped Rice into a coarse powder. Transfer it to the bowl.

5. Add Dates and 1 tablespoon of oats to the grinder and grind it till dates are soft. Transfer the mixture to the bowl.

6. Add Cranberries and 1 tablespoon of oats to the grinder and grind it to get a coarse mixture. Transfer the mixture to the bowl.

7. Add Pumpkin Seeds to the bowl and mix together all the ingredients.

8. If Jaggery is soft, you can add it as it is. If not, heat Jaggery just enough to melt it and add to the mixture. Mix together all the ingredients.

9. Transfer the mixture to the grinder, add 1 tablespoon of Ghee and use the grinder on Pulse mode for 1 minute. We just need to bind the mixture together. Take it out in a bowl. Check if you are able to make a firm ball of the mixture. If not, add some more Ghee and mix.

10. Grease a baking tray with Ghee or place a butter paper in the tray. Transfer the mixture to the baking tray and pack it firmly. If the mixture is not packed firmly, the pieces will crumble.

11. Place the baking tray in Pre-heated oven and bake on 180 degrees for 10 minutes.

12. While the mixture is warm, make marks for desired size pieces.

13. Enjoy these healthy and yummy Nutribars any time of the day.

Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)
Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)
Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)
Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार Oats and Popped Rice Nutribar

हल्ली किशोरवयीन आणि तरुण मुलांना न्यूट्रीबार खायचं वेड असतं. हे न्यूट्रीबार घरी करायला अगदी सोपे आहेत. साधारणपणे ह्यात ओट्स, खजूर , कोणत्याही बिया आणि बेदाणे / मनुका घालतात. पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जिन्नस घालू शकता. मी ह्यात साळीच्या लाह्या आणि क्रॅनबेरी घालते. लाह्यांमुळे टेक्सचर छान येतं आणि क्रॅनबेरी मुळे आंबटगोड चव येते. हे न्यूट्रीबार नरम असतात त्यामुळे सर्व वयोगटाच्या लोकांना खाता येतात.

साहित्य ( कप = २५० मिली)

ओट्स दीड कप

साळीच्या लाह्या १ कप

खजुराचे तुकडे अर्धा कप

सुकी क्रॅनबेरी अर्धा कप

भोपळ्याच्या बिया पाव कप (किंवा दुसऱ्या कोणत्याही बिया)

चिरलेला गूळ अर्धा कप (चवीनुसार कमी / जास्त करा)

साजूक तूप २३ टेबलस्पून

कृती

. खजुराच्या बिया काढून बारीक तुकडे करून घ्या.

. ओट्स सुकेच रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. एका परातीत काढून घ्या.

. साळीच्या लाह्या मऊ असतील तर कढईत २३ मिनिटं भाजून घ्या (किंवा मायक्रोवेव्ह मध्ये २ मिनिटं भाजा) आणि गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. लाह्यांचं पीठ परातीत काढा.

. खजुराचे तुकडे आणि १ टेबलस्पून ओट्स मिक्सरमध्ये घालून खजूर नरम होईपर्यंत वाटून घ्या. मिश्रण परातीत काढा.

. क्रॅनबेरी आणि १ टेबलस्पून ओट्स मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. मिश्रण परातीत काढा.

. भोपळ्याच्या बिया परातीत घाला आणि सर्व जिन्नस एकत्र करून घ्या.

. गूळ नरम असेल तर तसाच परातीत घाला. नरम नसेल तर एका कढईत गूळ फक्त वितळेपर्यंत गरम करा आणि कढईत घाला. सर्व जिन्नस एकत्र मिसळून घ्या.

. मिश्रण आणि १ टेबलस्पून साजूक तूप मिक्सरमध्ये घालून पल्स मोड वर १ मिनिट फिरवून घ्या. आपल्याला मिश्रण फक्त एकजीव करायचं आहे. मिश्रण परातीत काढून घ्या. मिश्रणाचा घट्ट गोळा होतो का ते पहा नाहीतर थोडं साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करा.

. एका बेकिंग ट्रे ला तूप लावून घ्या किंवा ट्रे मध्ये बटर पेपर घाला. मिश्रण ट्रे मध्ये घालून हाताने दाबून समतल करा. मिश्रण घट्ट थापले नाही तर वड्या नीट पडणार नाहीत.

१०. मिश्रण प्री हीट केलेल्या ओव्हन मध्ये १८० डिग्री वर १० मिनिटं भाजून घ्या. मिश्रण कोमट असतानाच सुरीने वड्या पाडून घ्या.

११. थंड झाल्यावर वड्या डब्यात काढून ठेवा. पौष्टिक आणि स्वादिष्ट न्यूट्रीबार तयार आहे. कोणालाही कधीही खायला छान आहे.

Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)
Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)
Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)
Oats and Popped Rice Nutribar (ओट्स आणि साळीच्या लाह्यांचे न्यूट्रीबार)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes