Rajgira Pithache Laadoo (राजगिरा पिठाचे लाडू) – Amaranth Flour Laddu

Rajgira Pithache Laadoo (राजगिरा पिठाचे लाडू) – Amaranth Flour Laddu

Rajgira Pithache Laadoo (राजगिरा पिठाचे लाडू) – Amaranth Flour Laddu

राजगिरा पिठाचे लाडू मराठी

Rajgira Laahi (Puffed Amaranth) Laddus are very common in India. But these laddus are made using Rajgira (Amaranth) Flour. It’s an easy recipe to make very delicious laddus with nice grainy texture. It does not require sugar / jaggery syrup that is sometimes problematic. You can have these laddus on Fasting days also.

Ingredients (Makes 15-16 Laddus) (1 cup = 250 ml)

Rajgira Flour (Amaranth Flour) 2 cups

Pure Ghee (Clarified Butter) ¾ cup

Crushed Roasted Peanuts ¼ cup

Crushed Jaggery 1 cup

Powdered Sugar ½ cup

Dry fruit Powder 2 tablespoon (or Dryfruit pieces)

Cardamom Powder ¼ teaspoon

Instructions

1. In a thick bottom pan, add Ghee and Rajgira Flour. Roast on medium flame till light brown in colour. Switch off the gas.

2. Add crushed Jaggery, crushed roasted peanuts and mix. Leave the mixture to cool.

3. When mixture is warm, add powdered sugar, dry fruit powder, cardamom powder and mix.

4. Roll laddus of desired size.

5. Enjoy these delicious laddus.

6. These can be stored at room temperature for 3 weeks.

Note

You can use only Jaggery while making these Laddus. But sometimes if Jaggery is sticky, Laddus may be hard. By adding sugar, laddus are not hard.

Rajgira Pithache Laadoo (राजगिरा पिठाचे लाडू) – Amaranth Flour Laddu
Rajgira Pithache Laadoo (राजगिरा पिठाचे लाडू) – Amaranth Flour Laddu

===================================================================================

राजगिरा पिठाचे लाडू

राजगिरा लाह्यांचे लाडू तुम्ही नेहमी खात असाल. हे लाडू राजगिऱ्याचे पीठ वापरून केले आहेत. स्वादिष्ट दळदार लाडू बनवण्याची अगदी सोपी पाककृती आहे. साखरेचा / गुळाचा पाक करायचं झंझट नाही. हे लाडू उपासाला ही चालतातनक्की करून बघा.

साहित्य (१५१६ लाडवांसाठी ) (१ कप = २५० मिली )

राजगिरा पीठ २ कप

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पाव कप

तूप पाऊण कप

बारीक चिरलेला गूळ १ कप

पिठीसाखर अर्धा कप

सुक्या मेव्याची पावडर (किंवा तुकडे ) २ टेबलस्पून

वेलची पावडर पाव चमचा

कृती

. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप आणि राजगिरा पीठ घाला. मध्यम आंचेवर तपकिरी रंगावर भाजून घ्या.

. गरम असतानाच चिरलेला गूळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून एकत्र करा. मिश्रण थंड होऊ द्या.

. मिश्रण कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर, सुक्या मेव्याची पावडर, वेलची पावडर घाला आणि एकत्र करा .

. कोमट असतानाच लाडू वळून घ्या.

. राजगिऱ्याच्या पिठाचे स्वादिष्ट लाडू तयार आहेत.

. हे लाडू फ्रिज मध्ये न ठेवता ३ आठवडे चांगले राहतील.

टीप

हे लाडू फक्त गुळाचे ही करू शकता. पण कधी कधी गूळ कडक निघाला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते. थोडी साखर घातल्याने लाडू कडक होत नाहीत .

Rajgira Pithache Laadoo (राजगिरा पिठाचे लाडू) – Amaranth Flour Laddu
Rajgira Pithache Laadoo (राजगिरा पिठाचे लाडू) – Amaranth Flour Laddu