Nachani Satva / Ragi (नाचणीचं सत्व) – Finger Millet Pudding ( No Refined Sugar)

Nachani - Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani - Ragi Satva (नाचणीचं सत्व)

Nachani Satva / Ragi (नाचणीचं सत्व) – Finger Millet Pudding ( No Refined Sugar)

नाचणीचं सत्व मराठी

This is a Goan specialty – Recipe of my Mother-in-law. This pudding is mild sweet and delicious. Like most other Goan sweets this recipe also uses coconut milk and Jaggery. The main ingredient is Nachani / Ragi / Finger Millet which is very nutritious. It’s a healthy sweet / snack without using Refined sugar.

You can also use readymade Finger Millet Extract for this recipe. If you do so, start the recipe from step 5.

Ingredients (1 cup = 250 ml)

Nachani Grains (Finger Millet / Ragi) 1 cup

Fresh Scraped Coconut 1 cup

Jaggery Crushed ½ cup (adjust as per taste)

Cardamom Powder ¼ teaspoon

Cashew Nuts 2 tablespoons chopped

Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Salt ¼ teaspoon

Instructions

1. Wash and Soak Nachani in water for 8 hours.

2. Grind soaked Nachani into a smooth fine paste, add water as required.

3. Strain it using a muslin cloth to remove Nachani shells

4. Transfer strained Nachani paste into a pan. Add water such that it covers the paste and there is a water layer of about 1 cm over the paste. Let it stand for 6 hours.

4. Drain water, the extract is superfine paste of Nachani called “Satva”. Our preparation for the recipe is now complete.

Fine “Satva” below the water (नाचणी सत्व पातेल्याच्या तळाशी)

5. Grind fresh coconut to make coconut milk. Transfer Satva to a thick bottom pan. Add Jaggery, coconut milk and salt.

6. Cook on low flame for 15-20 minutes stirring continuously. Mixture will be glazy.

7. Mix chopped cashew nuts and cardamom powder.

8. Grease a flat plate / tin (about 10 inch diameter) with pure ghee.

9. Add the remaining pure ghee to the mixture and spread the mixture to form a thick layer.

Nachani - Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani – Ragi Satva before refrigeration (नाचणीचं सत्व – फ्रिजमध्ये ठेवण्याआधी )

10. Leave it to cool to room temperature.

11. Refrigerate for 2 hours.

12. Cut into pieces and serve it cold as dessert or as a snack.

13. You can store this in refrigerator for 3-4 days.

Nachani - Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani – Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani - Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani – Ragi Satva (नाचणीचं सत्व)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

नाचणीचं सत्व उन्हाळा स्पेशल

हा गोव्याचा स्पेशल गोड पदार्थ आहे. पण हे पक्वान्न नाही तर मधल्या वेळचं खाणं म्हणून खातातगोव्याकडचा गोड पदार्थ म्हणजे नारळ आणि गूळ आहेच. साखर अजिबात नाही. ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. नाचणी थंड आणि पौष्टिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात हे सत्त्व हमखास करतात. रेसिपी थोडी वेळकाढू आहे पण अतिशय स्वादिष्ट आणि खूप पौष्टिक लागतो हा प्रकार.

बाजारात तयार नाचणीचं सत्त्व मिळतं.ते घातलं तर घरी सत्त्व करण्याचे श्रम वाचतील पण चवीतही थोडा फरक पडेल.

साहित्य (१ कप = २५० मिली )

नाचणी १ कप

ताजा खवलेला नारळ १ कप

बारीक चिरलेला गूळ अर्धा कप (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

वेलची पूड पाव चमचा

काजूचे तुकडे २ मोठे चमचे

तूप १ चमचा

मीठ पाव चमचा

कृती

. नाचणी धुवून ८ तास पाण्यात भिजवून ठेवा

. पाणी काढून टाका आणि नाचणी मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घ्या. छान मऊ पेस्ट झाली पाहिजे. हवं असल्यास वाटताना थोडे पाणी घाला

. नाचणी ची पेस्ट मलमल च्या कापडाने गाळून घ्या म्हणजे नाचणीची सालं वेगळी होतील. ही सालं टाकून द्या .

. नाचणीची पेस्ट एका पातेल्यात घालून त्यात पाणी घाला. पेस्ट च्या वर १ सेमी पाणी येईल एवढं पाणी घाला. पातेल्यावर झाकण ठेवून ६ तास ठेवा.

. आता पातेल्यातलं पाणी ओतून टाका. खाली जो नाचणीचा थर असेल ते नाचणीचं सत्व आपल्याला शिजवायचं आहे.

Fine “Satva” below the water (नाचणी सत्व पातेल्याच्या तळाशी)

. नारळाचं दूध काढून घ्या.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात हे सत्व घाला. त्यात नारळाचं दूध, मीठ  आणि गूळ घाला. मिक्स करून मंद आचेवर शिजवा.

. १५२० मिनिटांनी मिश्रणाला तकाकी यायला लागेल. याचा अर्थ मिश्रण शिजत आलंय.

. मिश्रणात काजूचे तुकडे, वेलची पूड घाला आणि मिक्स करा .

१०. एका सपाट ताटाला तूप लावून घ्या.

११. उरलेलं तूप मिश्रणात घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा

१२. मिश्रण तूप लावलेल्या ताटलीत एकसारखं पसरून घ्या.

Nachani - Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani – Ragi Satva before refrigeration (नाचणीचं सत्व – फ्रिजमध्ये ठेवण्याआधी )

१३. गार झाल्यावर २ तास फ्रिज मध्ये ठेवा

१४. वड्या कापून नाचणीचं गार गार स्वादिष्ट सत्व सर्व्ह करा.

१५. हे सत्व फ्रिज मध्ये ३४ दिवस छान राहते.

टीप

. नाचणीचं तयार सत्त्व वापरलं तर सहाव्या पायरीपासून कृती करा

Nachani - Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani – Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani - Ragi Satva (नाचणीचं सत्व)
Nachani – Ragi Satva (नाचणीचं सत्व)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes