Kand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं) – Purple Yam Savory Pan Cake / Chilla

Kand Dhirde
Kand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)

Kand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)Purple Yam Savory Pan Cake / Chilla

कंद (कोनफळ / जांभळा कंद) धिरडं मराठी

Kand (Purple Yam) is very tasty and nutritious. It is a good source of Carbs, Vitamins and Antioxidents. This is a quick and easy recipe that makes delicious Chilla / pan cakes. This can be a healthy breakfast / snack dish. Or you can have them for fasting also.

Ingredients (For 3-4 Pan Cakes) (1 cup = 250 ml)

Purple yam (Kand / Konfal) 1 cup Peeled and grated

Green Chili Paste 1 teaspoon

Cumin Seeds (Jeera) ½ teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Dry Mango Powder ¼ teaspoon

Crushed roasted Peanuts 1 tablespoon

Pure Ghee / Clarified Butter for roasting Pan Cake

Salt to taste

Instructions

1. Wash Kand (purple yam) thoroughly and peel the skin.

2. Grate Kand (purple yam). Be careful while grating. Kand may slip from your hand while grating. Grated Kand will be sticky. Do not add water.

3. Add cumin seeds, Crushed peanuts, Mango Powder, Green Chili Paste, Chopped Coriander and salt. Mix well, do not add water. Batter will be very sticky.

Ingredients of Purple Yam Pan Cake – Crushed Peanuts not in the photo (कोनफळाच्या धिरड्याचं साहित्य – शेंगदाण्याचं कूट फोटोत नाहीये)

4. Heat a non stick / Iron griddle and spread little pure Ghee / clarified butter on the Griddle.

5. Place two serving spoonful of batter on heated Griddle and spread it evenly using your fingers. Dip your fingers in water before spreading the batter so that batter will not stick to the fingers.

Spread Pan Cake batter on the Griddle (कीस तव्यावर पसरून घ्या)

6. Cover the Griddle with a lid, cook for 1-2 minutes. Spread a few drops of Ghee on the Chilla.

7. Remove lid, flip the Chilla and cook the other side.

8. Delicious Kand Chilla is ready. Serve hot with coconut or any other chutney.

Note

1. You can add Rajgira (Amaranth) flour or Upwas Bhajani to the batter. But then the taste of Chilla will change.

Kand Dhirde
Kand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)
Kand Dhirde
Kand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

कंद (कोनफळ / जांभळा कंद ) धिरडं हिवाळा स्पेशल

हिवाळ्यात बाजारात कंद / कोनफळ मिळतात. जांभळ्या रंगाचं कोनफळ चवीला खूप छान असतं . गुजराती उंधियो मध्ये हे घालतात. It is a good source of Carbs, Vitamins and Antioxidants.

ह्या कोनफळाची धिरडी खूप चविष्ट आणि खमंग होतात.  घरात नेहमी असणारं साहित्य वापरून झटपट होणारी ही धिरडी ब्रेकफास्ट / नाश्त्याला चांगला पदार्थ आहे. ही धिरडी उपासाला ही चालतात.  

ही धिरडी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

. कंद / कोनफळ स्वच्छ धुवून घ्या. कंदमूळ असल्यामुळे त्याला खूप माती असते.

. कोनफळाची सालं काढून ते किसून घ्या. किसताना जरा लक्ष द्या कारण कोनफळ चिकट असतं; किसताना हातातून सटकतंहात किसला जाण्याची शक्यता असते.

. कीस चांगलाच चिकट असतो. पण किसात अजिबात पाणी घालायचं नाही.

. तुमच्या घरात सर्वांना पुरेल एवढी धिरडी करण्यासाठी किती कंद लागेल ह्याचा अंदाज सुरुवातीला येणार नाही. कारण ह्या धिरड्यात बाकी कसलंही पीठ घातलं नाहीये त्यामुळे कंद कमी पडला तर भरीला घालायला काहीच नाही. आम्हाला ५ जणांना सकाळच्या नाश्त्यासाठी १ किलो कंद लागतो (१०११ धिरडी होतात).

साहित्य ( धिरड्यांसाठी) (१ कप = २५० मिली)

किसलेला कंद / कोनफळ १ कप

ठेचलेली मिरची १ टीस्पून 

जिरं अर्धा  टीस्पून 

चिरलेली कोथिंबीर १  टीस्पून 

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट १ टेबलस्पून

आमचूर पाव टीस्पून

तेल / तूप धिरडी भाजायला

मीठ चवीनुसार

कृती

. कंद धुवून सालं काढून किसून घ्या. कंद खूप चिकट असतो त्यामुळे किसताना हातातून निसटू शकतो ; म्हणून सांभाळून किसा.

. कीस खूप चिकट होईल पण अजिबात पाणी घालू नका.

. किसामध्ये ठेचलेली हिरवी मिरची, मीठ, जिरं, आमचूर, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून एकजीव करा. पाणी घालू नका.

Ingredients of Purple Yam Pan Cake – Crushed Peanuts not in the photo (कोनफळाच्या धिरड्याचं साहित्य – शेंगदाण्याचं कूट फोटोत नाहीये)

. नॉनस्टिक/ लोखंडी  तवा गरम करून घ्या.

. २ डाव कीस तव्यावर घाला आणि हात पाण्यात बुडवून कीस तव्यावर नीट पसरून घ्या.गॅस मध्यम ठेवा

Spread Pan Cake batter on the Griddle (कीस तव्यावर पसरून घ्या)

. झाकण ठेवून २ मिनिटं भाजून घ्या.

. झाकण काढून थोडं तेल / तूप धिरड्यावर पसरा. धिरडं उलटं करून दुसरी बाजूही भाजून घ्या.

. कंदाचं खमंग खुसखुशीत धिरडं तयार आहे. गरमागरम खमंग धिरडं चटणी सोबत खायला द्या.  

टीप

. ह्यात हवं असल्यास राजगिरा पीठ किंवा उपासाची भाजणी घालू  शकता पण मग धिरड्याला कंदाची चव येत नाही.

Kand Dhirde
Kand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)
Kand Dhirde
Kand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)

 

 

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes