Lemon Coriander Soup (लेमन कॉरीएंडर सूप)

Lemon Coriander Soup (लेमन कॉरीएंडर सूप)

Lemon Coriander Soup (लेमन कॉरीएंडर सूप कोथिंबिरीचं सूप)

लेमन कॉरीएंडर सूप – कोथिंबिरीचं सूप मराठी 

This healthy and tasty soup is very easy to cook. Relish this in any season. It requires ingredients that are available in the kitchen.

Ingredients (Serves 5) (1 cup = 250 ml)

Finely Chopped coriander 1 cup

Lemon juice 1 tablespoon

Carrots 2 medium size

Sweet corn ½ cup

Garlic cloves 6-7

Ghee  / (Clarified butter) / butter ½ teaspoon

Black Pepper Powder to taste

Salt to taste

Instructions

1. Wash, Peel and cut carrots in small cubes.

2. Peel Garlic cloves and make small pieces.

Chopped carrots and Garlic

3. Cook sweet corn in microwave for 4 minutes with little water. Or cook it using Gas.

4. Add carrot pieces and half of garlic pieces to 4 cups of water; cook covered till carrots are soft

5. Using a strainer, separate out carrots and water. We will be using this water as stock for the soup.

Steamed Carrots and Sweet Corn

6. In a pan, heat ghee/butter/clarified butter. Add remaining garlic pieces and fry till brown.

7. Add all chopped coriander except 1 tablespoon (we’ll use this for garnish).

8. Sauté for 2-3 minutes.

Cook chopped coriander

9. Add the stock prepared in step 5; keep boiling the mixture for 7-8 minutes

10. Add carrots, sweet corn, lemon juice, salt and black pepper. Boil for 2 minutes.

11. Delicious soup is ready. Serve with chopped coriander sprinkled on it.

Note

  1. You can add any other veggies of your choice. Onion can also be added if you like. Use all these veggies to make stock. Then separate the stock. And add these veggies in the soup as mentioned in step 10.
Lemon Coriander Soup

2. There is another way of making this soup. Make a paste of coriander. Grate carrots. Boil sweet corn. Fry garlic pieces in butter. Add grated carrot. Sauté for 3-4 minutes. Add coriander paste. Boil it. Add sweet corn, lemon juice, salt and black pepper. Add water as required. Boil the soup for 3-4 minutes and serve hot. This also tastes delicious but the one in the main recipe has vibrant colours and looks very appetizing. 

========================================================================

लेमन कॉरीएंडर सूप कोथिंबिरीचं सूप

कोथिंबीर आणि लिंबाचं हे सूप मी पहिल्यांदा चेन्नई विमानतळाच्या उपाहारगृहात खाल्लं होतं होहे सूप प्यायचं नसतं हे खावं लागतं!! मी बरेचदा ऑफिस च्या कामासाठी सकाळी लवकर चेन्नई ला जाऊन रात्री परत येत असे. हा एक दिवसाचा प्रवास अतिशय तापदायक असतो. भल्या पहाटे उठून विमानतळावर जावं लागतं आणि दिवसभर मिटींग्स मध्ये लक्ष देऊन बोलावं / ऐकावं लागतं. संध्याकाळी उशिरा परतीच्या विमानासाठी चेन्नई विमानतळावर येईपर्यंत सगळी शक्ती संपलेली असते शारीरिक आणि मानसिक सुद्धा. अशा वेळी हे गरमागरम सूप म्हणजे अगदी एनर्जी बूस्टर वाटायचं!!

हे पौष्टिक आणि चविष्ट सूप बनवायला अगदी सोपं आहे. घरात नेहमी असणारं साहित्य वापरलेलं आहेह्यात मी कोथिंबीरीसोबत, गाजर आणि मक्याचे दाणे घालतेहिरव्यागार कोथिंबिरीने सुपाला छान रंग आणि स्वाद येतो. घरी केलेलं सूप हे रेस्टोरंन्टपेक्षा जास्त चविष्ट लागतं

साहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

बारीक चिरलेली कोथिंबीर १ कप

लिंबाचा रस १ टेबलस्पून

गाजर २ मध्यम

मक्याचे दाणे अर्धा कप (Sweet corn)

लसूण ६७ पाकळ्या

तूप / बटर / लोणी  अर्धा टीस्पून

मिरपूड चवीनुसार

मीठ चवीनुसार

कृती

. गाजर धुवून बारीक चौकोनी तुकडे करून घ्या.

. लसूण सोलून बारीक चिरुन घ्या.

Chopped Carrots and Garlic (चिरलेलं गाजर आणि लसूण)

. मक्याचे दाणे पाणी घालून मायक्रोवेव्ह मध्ये (हाय पॉवर वर ४ मिनिटं) किंवा गॅसवर शिजवून घ्या

. गाजर पाणी घालून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवून घ्या (हाय पॉवर वर २३ मिनिटं) किंवा  एका पातेल्यात गाजराचे तुकडे घालून ४ कप पाणी घाला. मंद आचेवर गाजर थोडं मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.

. गाजर आणि मक्याचे दाणे वेगळे काढून घ्या. पाणी टाकून देऊ नका. आपण ते सुपात घालणार आहोत.

Steamed Carrots and Sweet Corn (वाफवलेले गाजर आणि मक्याचे दाणे)

. एका पातेल्यात तूप / बटर गरम करून लसणीचे तुकडे लाल होईपर्यंत परता. त्यात चिरलेली कोथिंबीर घाला. १ चमचा कोथिंबीर सजावटीसाठी काढून ठेवा.

. ३ मिनिटं पाणी न घालता परता.

Cook chopped coriander (कोथिंबीर परतून घ्या )

. आता वर ५व्या स्टेप मध्ये वेगळं काढलेलं पाणी कोथिंबिरीच्या पातेल्यात घाला. ८ मिनिटं उकळा.

. गाजर, मक्याचे दाणे, लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड घाला. २ मिनिटं उकळा.

१०. चविष्ट आणि पौष्टिक सूप तयार आहे. सुपावर कोथिंबिर पेरून गरमागरम सूप सर्व्ह करा

टिप्स

. तुम्ही ह्या सुपात तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. कांदा ही घालू शकताभाज्या पाण्यात शिजवून घ्या. भाज्या वेगळ्या काढून पाणी सुपात वापरा. आणि भाज्या स्टेप ९ मध्ये लिहिल्याप्रमाणे सुपात घाला.

. हे सूप आणखी एका प्रकारे बनवतात. कोथिंबीर मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट करा. गाजर किसून घ्या. मक्याचे दाणे वाफवून घ्या. तुपात लसूण परतून गाजराचा कीस घालून ३४ मिनिटं परता. कोथिंबिरीची पेस्ट घाला. पाणी घालून उकळा. आता बाकी सगळं साहित्य घाला. हे सूप ही चवीला छान लागते. पण वरच्या रेसिपीप्रमाणे बनवलेलं सूप दिसायला जास्त छान दिसतं

Lemon Coriander Soup (लेमन कॉरीएंडर सूप)

 

 

6 Comments

  1. हॅलो सुधा मॅडम, मी तुमच्या रेसिपी नेहमीच रेफर करते आणि त्या छान होतात. मला तुमची दुधी भोपळ्याचे सूप ची रेसिपी हवी आहे.खूप खूप धन्यवाद तुम्ही सोप्या शब्दांत सगळ्या रेसिपीज लिहिता.

    • खूप खूप आभार; दुधी भोपळ्याच्या सुपाची रेसिपी पोस्ट करेन लवकरच;; ब्लॉगवर लाल भोपळ्याच्या सुपाची रेसिपी आहे. ती पण एकदा करून बघा. खूप छान होतं सूप. \nSudha

Leave a Reply to sudha Cancel reply