Muligatawny Soup (मलिगटानी सूप) – Lentil Soup
This is the popular Lentil soup. I recently came to know that it is the National Soup of India. Not sure if this is true. But it’s a delicious healthy soup. When I was searching for the recipe, I found 20-25 different recipes for Muligatawny soup. But I thought none of them would make the soup with the taste I was looking for. So I designed my own recipe and made this soup. It turned out to be awesome; just the way I wanted the taste and the texture. This soup is served with a spoon of cooked rice. Whenever I have this in restaurant, my husband teases me for having Dal Rice and he never had this soup. But now, he likes this homemade soup so much that he goes for second helping. So, try this out.
Ingredients (for 6 bowls)
Masoor Dal (split red lentil) ½ cup
Onion 1 medium
Tomato 1 medium
Peppercorns 10-12
Cumin Seeds ½ teaspoon
Coriander seeds ½ teaspoon
Curry leaves 8-10
Garlic cloves 3-4
Salt to taste
Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon
Cooked rice 6 teaspoon for serving
Lemon pieces for serving
Instructions
1. Wash Masoor dal and soak in water for 2 hours
2. Dry roast Peppercorn, Cumin seeds, Coriander seeds together on low heat till you get aroma of spices. Leave it to cool
3. Roughly chop onion and tomato. Peel garlic cloves
4. In a pan, heat ghee (clarified butter). Add garlic. Sauté till light brown. Add curry leaves. Add chopped onion. Sauté till translucent.
5. Add soaked Masoor dal after draining water and sauté for 2 minutes
6. Add chopped tomatoes and sauté for 2 minutes
7. Add 3 cups of water or vegetable stock . Bring the mixture to boil.
8. Crush the roasted spices and add to mixture. Add salt.
9. Keep cooking on low flame till Masoor dal is properly cooked.
10. Allow the mixture to cool
11. Using a blender, blend the mixture into a smooth paste.
12. Transfer it to the pan and bring to boil. Adjust consistency by adding water as required. This is a thick soup.
13. While serving, add a teaspoon of cooked rice in soup bowl, pour soup and serve hot with a piece of fresh lemon.
14. Enjoy this delicious soup.
===================================================================================
मलिगटानी सूप – पौष्टिक आणि चविष्ट पोटभरीचं सूप
हे मसूर डाळीचे सूप मूळचे दक्षिण भारतातलं पण भारताचे राष्ट्रीय सूप (National Soup of India) म्हणून ओळखलं जातं.
हे सूप मी पहिल्यांदा लंडनला एका रेस्टॉरंट मध्ये चाखलं होतं. खूप आवडलं होतं तेव्हा. काही वर्षांपूर्वी सूप करण्यासाठी मी खूप रेसिपीज पाहिल्या होत्या. पण मला हवी तशी चव येईल अशी कुठलीच रेसिपी दिसली नाही. मग माझ्या मनानेच रेसिपी बनवली आणि जशी हवी तशी चव मिळाली. हे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट सूप आहे.
हे सूप सर्व्ह करताना त्यात थोडा शिजलेला भात घालतात. पूर्वी जेव्हा जेव्हा मी हे सूप रेस्टॉरंट मध्ये मागवायचे तेव्हा माझा नवरा मला ‘डाळ भात‘ खातेस म्हणून चिडवायचा आणि तो कधीच हे सूप खात नसे. आता मात्र घरी केलेलं सूप त्याला आवडतं. दोनदोनदा घेऊन खातो.
साहित्य (६ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
मसूर डाळ अर्धा कप
कांदा १ मध्यम
टोमॅटो १ मध्यम
काळी मिरी १०–१२
जिरं अर्धा टीस्पून
धने अर्धा टीस्पून
कढीपत्ता ८–१० पानं
लसूण ३–४ पाकळ्या
मीठ चवीनुसार
तूप १ टीस्पून
सर्व्ह करण्यासाठी –
शिजलेला भात ६ टीस्पून
लिंबाच्या चकत्या ६
कृती
१. मसूर डाळ धुवून २ तास पाण्यात भिजवून ठेवा
२. काळी मिरी, धने आणि जिरं एकत्र भाजून घ्या. आणि गार करायला ठेवा
३. कांदा आणि टोमॅटो चिरून घ्या. लसूण सोलून तुकडे करून घ्या.
४. एका पातेल्यात तूप गरम करून त्यात लसूण घालून लालसर होईपर्यंत परता . कढीपत्ता घाला. कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्या.
५. भिजलेली मसूर डाळ घालून २ मिनिटे परतून घ्या
६. टोमॅटो घालून २ मिनिटे परतून घ्या
७. ३ कप पाणी घालून उकळी आणा.
८. भाजलेले मसाले कुटून घ्या. आणि पातेल्यात घाला.
९. मंद आचेवर मसूर शिजेपर्यंत शिजवा.
१०. गार झाल्यावर मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या.
११. परत पातेल्यात घालून जरुरीप्रमाणे पाणी घालून एक उकळी आणा. हे सूप दाट असते .
१२. सर्व्ह करताना सुपाच्या वाडग्यात मध्ये एक चमचा शिजलेला भात घाला, त्यावर सूप घाला आणि एक लिंबाची चकती ठेऊन गरम सूप सर्व्ह करा.
Your comments / feedback will help improve the recipes