Roasted Butternut Squash Soup (रोस्टेड बटरनट स्क्वॉश सूप) / Roasted Pumpkin Soup (भाजलेल्या भोपळ्याचं सूप)
रोस्टेड बटरनट स्क्वॉश सूप मराठी
The name Butternut Squash soup sounds so exotic, right. Butternut Squash is a kind of Red Pumpkin / Lal Bhopla / Kadu. Pumpkin is very nutritious rich in Vitamins and antioxidants. However, not many people like Pumpkin. Roasted Pumpkin tastes delicious. Try this recipe. This soup has nice earthy taste and is quite filling.
Ingredients
Red Pumpkin (Lal Bhopala / Kadu) ¼ kilogram
Onions 2 small
Garlic cloves 4-5
Ghee / Butter / Clarified Butter ½ teaspoon
Black pepper powder to taste
Salt to taste
Instructions
1. Wash and peel Pumpkin
2. Cut thin slices of pumpkin – about 2 * 1 inch long.
3. Give a small slit to onions using a knife and cook onions and garlic cloves in microwave oven for 30 seconds. Stop the microwave and cook it again for 30 seconds. Onions and garlic will now be soft. Roasted onions are little sweet. We need this taste for soup.
4. Peel onions and cut into 4 pieces each. Peel garlic. In a pan, heat ghee / butter / clarified butter.
5. Add pumpkin slices, onions and garlic.
6. Sauté on medium flame till you see brown spots on Pumpkin slices.
7. Turn off the flame and let ingredients cool
8. Blend all ingredients in a blender to get smooth paste; add water if required while blending
9. Transfer the paste to a pan; add water to get soup consistency. This soup is quite thick. Let the mixture cook for 10-15 minutes
10. Add Salt, black pepper powder and serve hot.
Note: ¼ kilogram Pumpkin is enough to make soup for 4 people.
Colour of the soup depends on the colour of Pumpkin. If Pumpkin is Orange, you will get nice vibrant colour soup as you can see in photos. If Pumpkin is pale yellow, soup will not look that attractive.
===================================================================================
रोस्टेड बटरनट स्क्वॉश सूप (भाजलेल्या लाल भोपळ्याचं सूप )
नावावरून खूप exotic सूप वाटतंय ना? पण करायला सोपं आहे. आणि चवीला अफाट आहे.
बटरनट स्क्वॉश हा एक प्रकारचा लाल भोपळा असतो. मी नेहमी मिळणारा लाल भोपळा घालते. हे लाल भोपळा भाजून केलेलं सूप आहे. रिच, क्रिमी, पौष्टिक, चविष्ट आणि पोटभरीचं. पावसाच्या/थंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायची मजा काही औरच असते.
साहित्य (४ जणांसाठी)
लाल भोपळा पाव किलो
छोटे कांदे २
लसूण ५–६ पाकळ्या
मीठ, मिरपूड चवीनुसार
साजूक तूप / बटर अर्धा टीस्पून
कृती
१. भोपळा धुवून, सालं काढून टाका. भोपळ्याच्या २ इंच X १ इंच आकाराच्या काचऱ्या करा.
२. कांद्याला वरून उभा आणि आडवा छेद द्या. एका पेपर प्लेट मध्ये कांदे, लसूण (न सोलता) ठेवा आणि मायक्रोवेव्ह मध्ये १ मिनिट भाजा. भाजलेल्या कांद्याची किंचित गोडसर चव आपल्याला ह्या सूप मध्ये हवी आहे. मायक्रोवेव्ह नसेल तर तव्यावर थोडे तूप घालून भाजा.
३. एका फ्राईंग पॅन मध्ये तूप घाला. मंद आचेवर गरम करा. त्यात भोपळ्याचे तुकडे, सोललेले कांद्याचे तुकडे (एका कांद्याचे ४ तुकडे केले तरी पुरे) आणि सोललेली लसूण घाला.
४. मध्यम आचेवर परता. पाणी घालू नका. भोपळ्यावर तपकिरी रंगाचे ठिपके आले की गॅस बंद करा. मिश्रण गार करून घ्या.
५. मिक्सर मध्ये मिश्रण घालून बारीक पेस्ट वाटून घ्या. जरूर पडल्यास पाणी घाला.
६. वाटलेली पेस्ट एका पातेल्यात घाला. पाणी घालून हवं तेवढं पातळ करा. हे सूप जाडसर असतं.
७. १०–१२ मिनिटे उकळा.
८. मीठ, मिरपूड घाला. मिक्स करून गरमागरम सूप सर्व्ह करा.
टीप
सुपाचा रंग भोपळ्याच्या रंगावर अवलंबून आहे. केशरी भोपळा असेल तर सुपाला छान रंग येतो.
Your comments / feedback will help improve the recipes