Roasted Tomato Soup (भाजलेल्या टोमॅटोचं सूप)

Roasted Tomato Soup (भाजलेल्या टोमॅटोचं सूप)

Roasted Tomato Soup (भाजलेल्या टोमॅटोचं सूप) – No Onion Garlic Recipe

भाजलेल्या टोमॅटोचं सूप मराठी

Thick and nutritious Tomato soup without using corn flour. There is an important step in this recipe to roast the tomatoes that makes this soup very different than soup made with boiled tomatoes. This is No Onion, No Garlic soup.

Ingredients (Serves 4)

Medium Size Tomatoes 7

Sugar 1 teaspoon or as per taste

Salt to taste

Black Pepper Powder ¼ teaspoon

Instructions

1. Wash and roast tomatoes on a Griddle on low flame. Roast tomatoes from all sides. As you roast them, the peel will start separating.

 

Roast tomatoes on Griddle

2. Let tomatoes cool.

3. Peel tomatoes and blend them into puree. This puree will be pretty thick. Strain it to remove seeds and transfer it to a pan.

Thick tomato puree

4. Add salt, sugar and black pepper powder as per your taste and boil for 5 minutes. Add water if required if it’s too thick.

5. Delicious and nutritious Thick tomato soup is ready. Garish it with cream or cheese and serve hot.

Roasted Tomato Soup

6. If you want to make bread croutons, cut bread slices into medium size pieces. Spread them on a paper plate and roast in Microwave for 2.5 to 3 minutes on high. Crispy bread croutons are ready without using a drop of oil.

==================================================================================

भाजलेल्या टोमॅटोचं सूप कांदा लसूण विरहित

कॉर्न फ्लोअर न घालता दाट टोमॅटो सूप बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. ह्यामध्ये मुख्य कृती आहे ती टोमॅटो भाजायची. टोमॅटो तव्यावर भाजून घेतले की सुपाचा रंग, चव छान येते आणि सूप मस्त दाट होतं. ह्या सुपाची चव शिजवलेल्या टोमॅटो सुपापेक्षा खूपच वेगळी लागते. आणि ह्यात कांदा, लसूण ही घातलेली नाहीथंडीत/पावसात गरमागरम सूप प्यायला खूपच छान लागतं. 

साहित्य (४ जणांसाठी)

मध्यम आकाराचे टोमॅटो ७

साखर १ टीस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

मिरी पावडर पाव टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. टोमॅटो धुवून घ्या आणि तव्यावर सर्व बाजूनी भाजून घ्या. गॅस मंद ठेवा. टोमॅटोची एक बाजू भाजून झाली की तो फिरवा आणि दुसऱ्या बाजू भाजा. भाजलेल्या बाजूची साल सुटायला लागेल.

Roast tomatoes on Griddle (टोमॅटो तव्यावर भाजून घ्या )

. भाजलेले टोमॅटो ताटलीत काढून गार करा.

. टोमॅटो ची सालं काढा. सालीचं काळं टोमॅटो ला लागलं असेल तर टोमॅटो पाण्यात बुडवून काढा.

. टोमॅटो चे तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. टोमॅटो चा दाट रस होईल.

Thick Tomato Puree (टोमॅटोचा दाट रस)

. एका पातेल्यात टोमॅटोचा रस गाळून (बियांचे तुकडे वेगळे  होतील) गरम करायला ठेवा.

. त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि मिरपूड घाला. ५ मिनिटं उकळा. सूप फार दाट असेल तर उकळताना थोडं पाणी घाला.

. स्वादिष्ट, पौष्टिक, दाट टोमॅटो सूप तयार आहे. Soup bowl मध्ये सूप घालून वर क्रिम/ चीज घालून गरमागरम सूप प्यायला द्या.

Roasted Tomato Soup (भाजलेल्या टोमॅटोचं सूप)

. ब्रेड कृटॉन्स करायचे असतील तर ब्रेड च्या स्लाइस चे छोटे तुकडे करून एका कागदाच्या प्लेट मध्ये पसरून मायक्रोवेव्ह मध्ये अडीच ते तीन मिनिटं हाय पॉवर वर भाजून घ्या. कुरकुरीत ब्रेड कृटॉन्स तयार होतील तेल न घालता.

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes