Tomato Sweet Sour Chutney (टोमॅटोची आंबट गोड चटणी) – Tomato Chutney with No Onion Garlic
This Tomato Chutney is so yummy that sometimes we have this chutney in place of subji. It’s a quick and easy recipe that requires ingredients that are generally available in Indian kitchen. This is a no Onion Garlic Recipe.
Ingredients (Serves 2)
Tomatoes 3 big
Salt to taste
Jaggery Crushed 1-2 tablespoon
Green chilly chopped 1
Coriander Powder 1 teaspoon
Red chili Powder ½ teaspoon
Garam Masala Powder ½ teaspoon
Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon
Fennel Seeds (Saunf) ¼ teaspoon
Oil 1 tablespoon
Asafoetida (Hing) a pinch
Cashew nuts 10-15 chopped in bigger pieces
Raisins (Kishmish) 1 tablespoon
Instructions
1. Wash and chop Tomatoes in small pieces.
2. Heat oil in a pan ,fry Cashew and Raisins separately and keep aside.
3. Add Asafoetida (hing), Cumin Seeds (Jeera) and Fennel Seeds (Saunf), when they start to crackle add chopped green chilies, sauté for few seconds and then add chopped Tomatoes, Coriander powder, Salt , Red chilly powder, Garam Masala , Jaggery, fried Cashew and Raisins. Adjust Jaggery according to your taste depending on sourness of Tomatoes.
3. Cook it covered, stir in between. When Tomatoes are cooked and soft, mash them with a spoon, cook for one min more. Yummy chutney is ready.
4. Serve with Roti, Theplas, Parathas, or Rice / Pulav..
5. This Chutney can be stored in fridge for one week.
===================================================================================
टोमॅटोची आंबट गोड चटणी – कांदा लसूण न घालता
एका उत्तर भारतीय मैत्रिणीनी ही रेसिपी दिली होती. अतिशय सोपी, पटकन होणारी आणि आपल्या घरात नेहमी असणारे साहित्य वापरून बनवलेली ही आंबटगोड चटणी एवढी स्वादिष्ट असते की आम्ही ही भाजी ऐवजी खातो. ह्यात कांदा, लसूण घालत नाहीत. नक्की करून बघा.
साहित्य (२ जणांसाठी )
टोमॅटो ३ मोठे
चिरलेला गूळ १–२ टेबलस्पून
हिरवी मिरची १ बारीक चिरून
धने पावडर १ टीस्पून
लाल तिखट अर्धा टीस्पून
गरम मसाला अर्धा टीस्पून
जिरं पाव टीस्पून
बडीशेप पाव टीस्पून
तेल १ टेबलस्पून
हिंग १ चिमूट
काजू १०–१५ मोठे तुकडे
बेदाणे १ टीस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. टोमॅटो धुवून बारीक चिरून घ्या.
२. एका कढईत तेल गरम करून काजू आणि बेदाणे वेगवेगळे तळून ताटलीत काढून घ्या.
३. त्याच तेलात जिरं, बडीशेप घाला. तडतडू लागलं की हिंग घाला. हिरवी मिरची घालून जरा परता.
४. आता टोमॅटो, गूळ, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, काजू, बेदाणे घालून झाकण ठेवून शिजवून घ्या.
५. टोमॅटो छान मऊ झाले की चमच्याने थोडे मॅश करा. चव बघून हवं असेल तर आणखी गूळ घाला. टोमॅटो आंबट असतील तर गूळ थोडा जास्त लागेल.
६. २ मिनिटं शिजवा. टोमॅटोची स्वादिष्ट चटणी तयार आहे. कशाबरोबर ही खाऊ शकता.
७. फ्रिज मध्ये ही चटणी एक आठवडा टिकते.
Your comments / feedback will help improve the recipes