Aluchi Bhaaji (अळूचं फदफदं) – Colocasia or Taro Leaves Subji

Aluchi Bhaaji (अळूचं फदफदं)

Aluchi Bhaaji (अळूचं फदफदं) – Colocasia or Taro Leaves Subji

अळूचं फदफदं मराठी

This is a Maharashtrian Delicacy. It’s very tasty – Sweet and sour taste as Tamarind and Jaggery is used in this preparation. There are 2 types of Alu (Colocasia / Taro) leaves : (1) one with light brown colour stem and (2) one with dark brown colour stem. Use the ones with light brown stem for this recipe. If you can’t recognise the type, ask the subjiwala to give you “Subjiwala Alu Leaves”.

This subji is also known by a funny name ‘Aluche Fadfade (फदफदं)’.

Ingredients (serves 4) (1 cup = 250 ml)

Alu (Colocasia / Taro) leaves 18-20

Raw Peanut ¼ cup

Cashew Nuts ¼ cup

Rice Flour 1 teaspoon

Goda Masala ½- ¾ teaspoon

Jaggery 2 teaspoons

Dried Red Chilies 4 slit

Curry Leaves (Kadipatta) 7-8

Fenugreek (Methi) seeds 4-5

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Tamarind (Chinch) Pulp 1 tablespoon

Salt to taste

For Tempering/ Tadka

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Instructions

1. Soak Peanuts and Cashew Nuts separately for 4-6 hours.

2. Wash Alu leaves and chop fine. Peel off the skin from stems and chop them fine. Generally your palms will get itching sensation after handling Alu. Rub Tamarind or Kokum on your palms and then wash with water. Itching will stop.

Chopped Alu Leaves and Stems (चिरलेली भाजी आणि देठ)

3. Pressure cook chopped Alu leaves and stem together without adding any water. Pressure cook Cashew Nuts along with Alu but put it in a separate bowl. Add ½ cup water to Cashew Nuts while steaming.

4. Pressure cook Peanuts till soft. Add ¾ to 1 cup of water to Peanuts while steaming. It takes long for Peanuts to cook.

5. When Steamed Alu Leaves are warm, mash them with a spoon into a smooth paste.

6. Add rice flour and mix well.

Mash cooked leaves (मिश्रण एकजीव करा)

7. Heat oil in a pan on medium flame.

8. Add mustard seeds , wait till sputter. Add Turmeric Powder and Asafoetida (Hing).

9. Add slit red chilies, curry leaves  and Fenugreek (methi) seeds.

10. Pour in mashed Alu leaves mixture. Add Tamarind pulp. Mix.

11. Add steamed Peanuts and Cashew Nuts.

12. Add water (consistency should be like thick Daal)

13. Add salt, Jaggery, Goda Masala and scraped coconut.

14. Bring the mixture to boil. Cook for 5 minutes.

15. Delicious Alu Bhaji is ready. Serve hot with Roti or Rice.

Aluchi Bhaaji (अळूचं फदफदं)
Aluchi Bhaaji (अळूचं फदफदं)

 

 

 

 

 

 

==================================================================================

अळूचं फदफदं पारंपरिक सात्विक भाजी

भाजीच्या अळूची कोवळी पानं आणि देठ घालून ही पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची सात्विक भाजी कांदा लसूण न घालता केलेली. चिंच, गूळ, गोडा मसाला घालून केलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते. नैवेद्याच्या पानात, लग्न समारंभाच्या भोजनात ही भाजी केली जाते. एवढ्या चविष्ट भाजीला असं विचित्र नाव का दिलंय माहित नाही.

मी ह्यात मुळा, आंबट चुका वगैरे काही घालत नाही. अळू चांगले शिजलं की तांदळाच्या पिठाचं आळण लावून अळू गरम असतानाच मिश्रण घोटून घेते. त्यामुळे भाजी छान मिळून येते. चोथा पाणी होत नाही. पडखळण म्हणून शेंगदाणे आणि काजू घालते. तुम्ही चणा डाळ, पावटे ही घालू शकता

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

अळूची पानं १८२०

कच्चे शेंगदाणे पाव कप

काजूगर पाव कप

तांदुळाचं पीठ १ टीस्पून

गोडा मसाला अर्धा पाऊण टीस्पून

चिरलेला गूळ २ टीस्पून

सुक्या लाल मिरच्या ४ (मधे चीर देऊन)

कढीपत्ता ७८ पानं

मेथीदाणे ४

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिंचेचा कोळ १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग चिमूटभर

कृती

. शेंगदाणे आणि काजूगर वेगवेगळे भांड्यात ५६ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. अळूची पानं नीट धुवून बारीक चिरून घ्या. पानांचे देठ धुवून सोलून घ्या आणि बारीक चिरून घ्या.

Chopped Alu Leaves and Stems (चिरलेली भाजी आणि देठ)

. अळूची पानं आणि देठ एका पातेल्यात घाला; त्यात पाणी घालू नका. भिजवलेले काजू दुसऱ्या पातेल्यात घाला; अर्धा कप पाणी घाला. दोन्ही प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

. भिजवलेले शेंगदाणे १ कप पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. शेंगदाणे शिजायला जास्त वेळ लागतो.

. शिजवलेलं अळू गरम असतानाच त्यात तांदुळाचं पीठ घाला आणि मिश्रण चमच्याने घोटून एकजीव करा.

Mash cooked leaves (मिश्रण एकजीव करा)

. एका कढईत तेल घालून मोहरी, हळद, हिंग, मेथीदाणे, कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालून खमंग फोडणी करा.

. फोडणीत अळू घाला. चिंचेचा कोळ घाला. मिश्रण ढवळून घ्या .

. शिजवलेले शेंगदाणे आणि काजू दोन्ही पाण्यासकट घाला.

. मीठ, गूळ, गोडा मसाला, नारळ घालून मिश्रण ढवळून घ्या. एक उकळी काढा.

१०. मिश्रण फार दाट असेल तर पाणी घालून उकळी काढा. ही भाजी आमटीपेक्षा दाट असते.

११. ५ मिनिटं उकळून गॅस बंद करा.

१२. अळूचं चविष्ट फदफदं तयार आहे. गरमगरम भाजी पोळी / भाताबरोबर सर्व्ह करा.   

Aluchi Bhaaji (अळूचं फदफदं)
Aluchi Bhaaji (अळूचं फदफदं)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes