Masala Aamboli (मसाला आंबोळी) – Spicy Pan Cake
Masala Aamboli is a specialty from Southern Konkan / Coastal India. Aamboli is like Uttapam (South Indian Pan Cake). Instead of adding raw Onions and Tomatoes, a spicy subji is cooked and added to Aamboli batter. Hence it is tastier than Masala Uttapam.
Ingredients (Serves 4 as meal) (1 cup = 250 ml)
Urad Dal (Split Black Gram ) 1 cup
Raw Rice 3 cups
Fenugreek (Methi) seeds 2 tablespoons
Poha (Flattened rice) 2 tablespoons
Salt to taste
Oil / Ghee / Clarified Butter for roasting Aamboli
For Masala / Spicy Mixture
Onions 4 medium
Tomatoes 4 medium
Fresh Scraped Coconut 2 tablespoon
Red Chilly Powder ¾ to 1 teaspoon (adjust as per taste)
Garam Masala ½ to ¾ teaspoon
Aamchoor (Mango Powder) ½ teaspoon
Chopped coriander 1 teaspoon
Salt to taste
Oil 1 teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida (Hing) a pinch
Curry Leaves 7-8 chopped in fine pieces
Instructions
Prepare “Aamboli Batter”
1. Wash split black gram (urad dal) and rice separately.
2. Add Fenugreek (methi) seeds and Poha (flattened rice) to rice.
3. Soak both split black gram (urad dal) and rice + Fenugreek (methi) seeds + poha separately in water for 8 hours.
4. Grind separately to form coarse batter – consistency of dosa /pan cake batter
5. Mix both batter and keep covered for 8 hours.
6. Add salt and mix well, the batter consistency should be like pan cake batter.
Prepare “Masala / Spicy Mixture”
1. In a pan, heat oil. Add cumin seeds; wait till splutter; add turmeric powder, Asafoetida and curry leaves.
2. Add chopped onions and a pinch of salt; sauté on low flame for 3-4 minutes
3. Add scraped coconut; sauté on low flame till onions are translucent
4. Add tomatoes. Mix. Cook covered on low flame till tomatoes are soft.
5. Add chilly powder, garam masala, mango powder, Salt, chopped coriander and mix.
6. This Masala should be spicy as we are going to add it to Aamboli batter. Adjust spices according to your taste.
Prepare “Aamboli”
1. Take out 5-6 ladle full of Aamboli batter and Add the Masala / Spicy Mixture to it. The amount of Masala to be added depends on your taste. More the Masala; Ammboli will be more tasty.
2. Heat a flat non stick griddle on low flame.
3. Sprinkle water on the heated griddle, wipe with cotton cloth before spreading the batter.
4. pour 2 ladle of batter on griddle; spread the batter (Aamboli) like a thick pan cake (uttapam)
5. Cover the Aamboli with a lid.
6. Sprinkle a few drops of oil / ghee on Aamboli
7. Flip Aamboli and let it cook on the other side. Cooked Aamboli will be reddish brown in colour.
8. Serve hot Masala Aamboli with your choice of chutney or tomato sauce.
===================================================================================
मसाला आंबोळी
मसाला आंबोळी ही तळकोकणाची स्पेशालिटी आहे. नारळाच्या रसाबरोबर खाल्ली जाणारी आंबोळी हे पक्वान्न म्हणून खातात. हा आंबोळीचा प्रकार नाश्त्याला खातात. सावंतवाडी जवळ आंबोली हे एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. तिथल्या होमस्टे मध्ये फक्त स्थानिक पदार्थ दिले जातात. मसाला आंबोळी हा पदार्थ तिथे पहिल्यांदा खाल्ला होता. खूप छान होता. कांदा, टोमॅटोची मसालेदार भाजी करून आंबोळीच्या पिठात मिक्स करून त्याच्या आंबोळ्या बनवतात. त्यामुळे हा प्रकार अतिशय चविष्ट लागतो (मसाला उत्तप्यापेक्षा चविष्ट!!). नक्की करून बघा.
मासे खात असाल तर ह्या मसाल्यात कोळंबीचे बारीक तुकडे करून घाला. फारच चविष्ट लागतं (माझा नवरा सांगतो – त्याला करून दिली आहे).
छान जाळीदार आंबोळ्यांसाठी काही टिप्स :
१. उडीद डाळ जुनी नसावी. जुनी असेल तर पीठ आंबत नाही.
२. पीठ वाटताना फार पातळ करू नका कारण आंबल्यावर पीठ थोडं पातळ होतं.
साहित्य (४ जणांसाठी जेवण म्हणून) (१ कप = २५० मिली )
उडीद डाळ १ कप
तांदूळ ३ कप
मेथी दाणे २ मोठे चमचे
पोहे २ मोठे चमचे
तेल आंबोळ्या बनवताना तव्यावर लावण्यासाठी
मीठ चवीनुसार
मसाल्यासाठी
कांदे ४ मध्यम बारीक चिरून
टोमॅटो ४ मध्यम बारीक चिरून
ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून
लाल तिखट पाऊण – एक टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
गरम मसाला अर्धा – पाऊण टीस्पून
आमचूर अर्धा टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल १ टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग चिमुटभर
कढीपत्ता ७–८ पानं बारीक चिरून
कृती
१. आंबोळीचं पीठ बनवण्यासाठी उडीद डाळ धुवून पाणी घालून भिजत ठेवा. दुसऱ्या पातेल्यात तांदूळ धुवून त्यात पाणी घाला. तांदुळाच्या पातेल्यात मेथी दाणे आणि पोहे घाला. डाळ व तांदूळ ८ तास भिजवा. उडीद डाळ जुनी नसावी. जुनी असेल तर पीठ आंबत नाही.
२. ८ तासानंतर डाळ आणि तांदुळाचं पाणी उसपून घ्या.
३. मिक्सर मध्ये डाळ वेगळी वाटा.
४. तांदूळ, मेथी, पोहे एकत्र वाटून घ्या. ह्यात साधं पाणी घाला. पीठ फार पातळ करू नका कारण आंबल्यावर पीठ थोडं पातळ होतं.
५. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करून जड झाकण ठेवून झाकून ठेवा. थंड हवामानात बंद कपाटात / ओव्हन मध्ये – ओव्हन चालू न करताना ठेवा. ८ तासात पीठ छान आंबेल.
६. पीठ मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करा.
मसाला बनवण्यासाठी
१. एका कढईत तेल गरम करून जिरं, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा.
२. फोडणीत कांदा आणि चिमूटभर मीठ घाला. ३–४ मिनिटं मंद आचेवर परता.
३. आता नारळ घाला आणि मिक्स करा. कांदा पारदर्शक होईपर्यंत परता.
४. टोमॅटो घाला आणि मिक्स करून झाकण ठेवून टोमॅटो शिजेपर्यंत शिजवा. मधे मधे मिश्रण ढवळा.
५. लाल तिखट, गरम मसाला, आमचूर, मीठ, कोथींबीर घालून नीट ढवळून घ्या.
६. हा मसाला झणझणीत व्हायला हवा कारण आपण तो आंबोळीच्या पिठात मिक्स करणार आहोत. चवीनुसार लाल तिखट, गरम मसाला घाला.
७. २ मिनिटांनी गॅस बंद करा. मसाला तयार आहे.
आंबोळी बनवण्यासाठी
१. मसाला आंबोळीच्या पिठात मिक्स करा. तुम्हाला सगळं पीठ एकदम वापरायचं नसेल तर हवं तेवढं पीठ काढून घेऊन त्यात लागेल तसा मसाला घाला. मसाला जास्त घालून चव मस्त येते.
२. आंबोळीसाठी तवा गरम करून घ्या. गॅस बारीक करून तव्यावर पाणी शिंपडून कपड्याने पुसून घ्या. दीड मोठा चमचा पीठ तव्यावर घालून नीट पसरा. उत्तप्प्यापेक्षा पातळ पसरा.
३. झाकण ठेवून एक – दीड मिनिटं भाजा. आता आंबोळी परतून घ्या. आंबोळीवर थोडं तेल सोडा. दोन्ही बाजू छान भाजल्या की गरमागरम सर्व्ह करा.खरपूस भाजलेली आंबोळी लालसर रंगाची दिसते.
४. गरमागरम आंबोळीचा चटणी / सॉस बरोबर आस्वाद घ्या.
Your comments / feedback will help improve the recipes