Nachani and Rajgira Thalipeeth (नाचणी आणि राजगिऱ्याचं थालीपीठ ) – Finger Millet and Amaranth Pan Cake
नाचणी आणि राजगिऱ्याचं थालीपीठ मराठी
Nachani (Ragi/ Finger Millet) and Rajgira (Amaranth) are very nutritious. So I created a pan cake recipe using these two ingredients. You can either use Rajgira Flour or Puffed Rajgira. Both taste good. This is an easy recipe to make savory pan cakes. To make it more nutritious I added crushed peanuts. For binding I added steamed Potato. Alternatively, You can add boiled Arbi / Alkudi / Colocasia roots / suran (yam) / Kand (purple yam). Thalipeeth turned out to be very tasty. It did not become hard / dry even after 3-4 hours. This can be a nutritious and tasty breakfast option. This can be a good Tiffin option also.
Ingredients (for 8-9 Thalipeeth) (1 cup = 250 ml)
Nachani (Ragi / Finger Millet) Flour 1 cup
Rajgira Flour ¾ cup OR Rajgira Lahi / Puffed Amaranth 1.5 cup
Steamed Potatoes 3-4 medium size
Crushed roasted peanuts 2 tablespoon
Chili powder ½ teaspoon
Sugar ½ teaspoon
Salt to taste
Buttermilk / Curd 2-3 tablespoon
Ghee/Butter/clarified butter / oil for roasting Thalipeeth
Instructions
1. Peel and mash Steamed Potatoes.
2. Mix all ingredients except ghee / clarified butter. Bind a medium consistency dough. Add water if necessary.
3. Take a plastic sheet or butter paper. Apply some ghee / oil.
4. Make round balls of dough bigger than a lemon.
5. Place a dough ball on the sheet, dip fingers in water and pat dough to make a round shaped Thalipeeth thinner than a Paratha / Pan cake.
6. Transfer Thalipeeth to hot non stick / iron griddle. Put few drops of ghee around Thalipeeth.
7. Cover the griddle and cook for 2 minutes.
8. Flip the Thalipeeth.
9. Add few drops of ghee and cook the other side.
10. Serve hot with Home made butter. Tastes awesome.
Note
1. You can use Jowar Lahi (Dhani / Puffed Sorghum) instead of Rajgira. Grind Jowar Dhani in grinder and use 1 cup of flour in the above recipe.
==================================================================================
नाचणी आणि राजगिऱ्याचं थालीपीठ – माझी नाविन्यपूर्ण पाककृती
रोज पौष्टीक, पोटभरीचा आणि चवदार नाश्ता करण्याच्या माझ्या प्रयत्नात नवनवीन पदार्थांचा शोध लागतो. ही त्यातलीच एक माझी स्वतःची रेसिपी. नाचणी आणि राजगिरा दोन्ही पौष्टिक आहेत. राजगिऱ्यामुळे थालीपीठ सुके आणि कडक होत नाही. ह्यात मी कधी राजगिऱ्याचं पीठ घालते तर कधी राजगिऱ्याच्या लाह्या. दोन्ही प्रकार छान लागतात.
साहित्य (७–८ थालिपीठांसाठी) (१ कप = २५० मिली)
नाचणी पीठ १ कप
राजगिरा पीठ पाऊण कप किंवा राजगिरा लाह्या दीड कप
शिजवलेले बटाटे ३–४
शेंगदाणा कूट २ टेबलस्पून
लाल तिखट टीस्पून
साखर अर्धा टीस्पून
दही / ताक २–३ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
तेल / तूप भाजण्यासाठी
कृती
१. बटाटे सोलून कुस्करून घ्या.
२. वरील सर्व साहित्य एका परातीत घाला (तेल / तूप वगळून ). थोडेसे पाणी घालून पीठ भिजवा. फार सैल नको आणि घट्ट ही नको.
३. एका प्लास्टिकच्या कागदाला तूप लावून छोटा पिठाचा गोळा त्यावर जाडसर थापा.
४. नॉन स्टिक / लोखंडी तव्यावर थालीपीठ घालून थोडे तेल / तूप घाला व झाकण ठेवून २–३ मिनिटे भाजा.
५. थालीपीठ परतून दुसरी बाजू ही तेल / तूप घालून भाजा.
६. नाचणी आणि राजगिऱ्याचं खुसखुशीत, पौष्टिक थालीपीठ तयार आहे. लोण्यासोबत खायला द्या.
टीप
१. बटाट्याऐवजी तुम्ही रताळे (कच्चे किसून / शिजवून) किंवा सुरण (शिजवून) किंवा कंद (कच्चा किसून) किंवा कच्ची पपई किसून घालू शकता.
२. राजगिऱ्याऐवजी तुम्ही ज्वारीच्या लाह्याचं पीठ घालू शकता. लाह्या मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. वरील रेसिपी साठी १ कप ज्वारीच्या लाह्यांचं पीठ लागेल.
Your comments / feedback will help improve the recipes