Rava Dhokla (इन्स्टंट रवा ढोकळा) – Semolina Dhokla (No Fermentation Required)

Rawa Dhokla (इन्स्टंट रवा ढोकळा)

Rava Dhokla (इन्स्टंट रवा ढोकळा) – Semolina Dhokla (No Fermentation Required)

इन्स्टंट रवा ढोकळा मराठी

Dhokla is a popular snack from Gujarat. There are different types of Dhokla. This is instant Dhokla using Rava (Semolina). No fermentation is required. Very easy and quick recipe that requires very few ingredients and makes soft, fluffy and tasty Dhokla.

Ingredients (serves 4) (1 cup = 250 ml)

Barik Rava (Semolina fine) 1 cup

Buttermilk 1 cup

Chili Ginger paste ½ teaspoon

Salt to taste

Fruit Salt 1 sachet (or 1 teaspoon)

Oil 1 tablespoon

For Tempering / Tadka

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

White Sesame Seeds (Til) 1 teaspoon

Curry leaves 8-10

Instructions

1. In a bowl, add Rava, Buttermilk, Chili Ginger Paste and Salt and mix it. Consistency should be like Idli batter / Thicker than Pan Cake batter. Add water if required.

2. Leave the batter to rest for 5 minutes. If you rest the batter for longer, then Dhokla will not be fluffy.

3. Grease Dhokla plates with oil.

4. Put water in Dhokla steamer and heat water on high flame.

5. Add Fruit Salt to the batter, add a spoonful of water and mix it in one direction. Do not over-mix.

6. Quickly Pour the batter on greased plate and spread it evenly.

7. Place the plate in hot Dhokla steamer and steam for 20-25 minutes.

8. When Dhokla is cool, cut it into pieces using a knife.

9. In a ladle, heat oil for Tempering.

10. Add Mustard seeds, wait till splutter; Add cumin seeds, wait till splutter; add Asafoetida.

11. Add While sesame seeds and cover the ladle. When splutter stops, switch off the gas and add curry leaves.

11. Pour tempering on Dhokla and enjoy this delicious Dhokla with your choice of chutney / sauce.

Note

1. After mixing in Fruit salt, if there is delay in placing the Dhokla plates in hot steamer, Dhokla will not be fluffy and soft.

2. If your Dhokla plate is not big enough for the batter, take out required quantify of batter in another bowl, mix eno, pour it in a greased plate and steam Dhokla. Repeat the process for the remaining batter.

Rawa Dhokla
      ===================================================================================

इन्स्टंट रवा ढोकळा

गुजराती ढोकळा हा एक चविष्ट प्रकार आहे. ढोकळ्याचे वेगवेगळे प्रकार असतात. ही रेसिपी इन्स्टंट रवा ढोकळ्याची आहे. अगदी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. छान चविष्ट, मऊ आणि लुसलुशीत ढोकळा बनतोफक्त या गोष्टींकडे लक्ष द्यायचे :

. रवा फक्त ५ मिनिटं भिजवून ठेवायचा. जास्त वेळ भिजवला तर ढोकळा लुसलुशीत होणार नाही.

. इनो घातल्यावर पीठ मिक्स करून लगेच ताटलीत घालून उकळत्या पाण्यात ताटली ठेवायची. यात वेळ गेला किंवा पाणी उकळतं नसेल तर ढोकळा दडदडीत होतो.

. तुमच्या ढोकळा प्लेट मध्ये सगळं पीठ एका वेळी मावत नसेल तर हवं तेवढं पीठ एका बाउल मध्ये काढून त्यात इनो घालून वाफवून घ्या. ते झाल्यावर उरलेल्या पिठात इनो घालून वाफवा.

. इनो हवा न गेलेला असावा. इनोची बाटली वापरल्यावर लगेच नीट बंद करून फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे इनो चांगला राहतो. किंवा इनोचं छोटं पाकीट (sachet) वापरा.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

बारीक रवा १ कप

आंबट ताक १ कप

मिरची आलं पेस्ट अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

तेल १ टेबलस्पून

इनो फ्रुट सॉल्ट १ चमचा

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी अर्धा चमचा

जिरं अर्धा चमचा

हिंग चिमूटभर

तीळ १ टेबलस्पून

कढीपत्ता ८१० पानं

कृती

. एका वाडग्यामध्ये रवा, ताक, मिरची आलं पेस्ट, मीठ आणि तेल घालून मिक्स करा. इडली च्या पिठासारखं पीठ भिजवा. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.

. पीठ ५ मिनिटं झाकून ठेवा.

. इडली पात्रात / मोठ्या पातेल्यात पाणी भरून गरम करायला ठेवा. ढोकळ्याच्या ताटलीला थोडं तेल लावून घ्या.

. इडली पात्रातलं पाणी उकळू लागलं की गॅस बारीक करा. पिठाच्या बाउल मध्ये इनो घालून, चमचाभर पाणी घाला आणि एका दिशेने फिरवून पीठ मिक्स कराजास्त वेळ मिक्स करू नका.

. लगेच पीठ तेल लावलेल्या ताटलीत घाला आणि ताटली हलकेच आपटून पीठ समतल करा.

. लगेच ताटली इडली पात्रात ठेवा आणि झाकण लावून मोठ्या गॅसवर ५ मिनिटं शिजवा. नंतर गॅस मध्यम करून आणखी १५२० मिनिटं शिजवा.

. ढोकळा जरा गार झाला की सुरीने तुकडे करा.

. एका लहान कढईत तेल घालून मोहरी, जिरं, हिंग, तीळ आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. ही फोडणी तयार ढोकळ्यावर पसरा. तीळ फोडणीत घातल्यावर झाकण ठेवा; नाहीतर तीळ तडतडून कढईबाहेर पडतात

. चविष्ट, मऊ, लुसलुशीत रवा ढोकळा तयार आहे. चटणी / टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या.

टीप

 १. रवा फक्त ५ मिनिटं भिजवून ठेवायचा. जास्त वेळ भिजवला तर ढोकळा लुसलुशीत होणार नाही.

. इनो घातल्यावर लगेच पीठ वाफवायला ठेवलं पाहिजे. नाहीतर ढोकळा मऊ, लुसलुशीत होणार नाही.

. तुमच्या ढोकळा प्लेट मध्ये सगळं पीठ एका वेळी मावत नसेल तर हवं तेवढं पीठ एका बाउल मध्ये काढून त्यात इनो घालून वाफवून घ्या. ते झाल्यावर उरलेल्या पिठात इनो घालून वाफवा.

. इनो हवा न गेलेला असावा. इनोची बाटली वापरल्यावर लगेच नीट बंद करून फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे इनो चांगला राहतो. किंवा इनोचं छोटं पाकीट (sachet) वापरा.

Rawa Dhokla (इन्स्टंट रवा ढोकळा)
Rawa Dhokla (इन्स्टंट रवा ढोकळा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes