Tandalachi Ukad / Takatali Ukad (तांदळाची उकड / ताकातली उकड) – Rice Flour Savory Porridge

Tandalachi Ukad / Takatali Ukad (तांदळाची उकड / ताकातली उकड)

Tandalachi Ukad / Takatali Ukad (तांदळाची उकड / ताकातली उकड) – Rice Flour Savory Porridge

तांदळाची उकड – ताकातली उकड मराठी

This is a traditional Maharashtrian snack made from rice flour. It uses very few ingredients and is easy to cook and very tasty snack. Tandhul is Rice and Ukad is something that is Steamed. Since this recipe uses Buttermilk (Tak in Marathi), it is also called Takatali Ukad.

There are similar snacks in other parts of India – Gujrat and Tamilnadu / Kerala. Process may be little different but all are tasty.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Rice Flour ½ cup

Buttermilk 2 cups

Salt to taste

Chopped Coriander 1 tablespoon

For Tempering/ Tadka

Oil 1 tablespoon

Green Chilly Paste ½ teaspoon

Mustard seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) ¼ teaspoon

Optional Ingredients

Ginger crushed ½ teaspoon

Garlic crushed ½ teaspoon

Instructions

1. In a bowl mix rice flour and buttermilk. Add salt and mix well to ensure there are no lumps. Consistency should be like Bhajia / Pan Cake batter. If required add water to batter.

2. Keep the batter for 15 minutes

3. In a pan, heat oil. Add mustard seeds; Wait till splutter. Add Cumin Seeds; wait till splutter. Add Turmeric Powder, Asafoetida (Hing) and Green Chilly Paste.

4. If you decide to add ginger and garlic, add it now.

5. Pour the batter in the pan.

6. Cook on low flame stirring all the time, till mixture thickens (about 2 minutes).

7. Add ½ cup water, keep stirring.

8. Repeat steps 7 and 8, three to four times. Stop this when the mixture does not thicken further.

9. Cover the pan with lid and cook the batter.

10. Keep stirring every 2-3 minutes.

11. Cooked batter will have a nice glaze.

12. Add chopped coriander.

13. Serve hot.

14. Ukad tastes awesome if you add ½ spoon of oil while eating. As per nutritionists, eating raw filtered oil is good for health; so enjoy Ukad with oil.

Tandalachi Ukad / Takatali Ukad

===================================================================================

तांदळाची उकड / ताकातली उकड

हा एक पारंपारीक चविष्ट पदार्थ आहे. आमच्या घरी वडिलांना उकड आवडायची नाही त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्याला जेव्हा वडील घरी नसायचे तेव्हा आई उकड बनवायची . उकड करण्याची कृती सोपी आहेतांदुळाचं पीठ ताकात भिजवून खमंग फोडणीत घालून  शिजवायचं. उकड दोन प्रकारे बनवतात. घट्ट गोळा उकड आणि थोडी पातळ पिठल्यासारखी उकड. घट्ट गोळा उकड कमी पाणी घालून शिजवतात आणि कोमट असताना तेल लावून मळून मग खायला देतात. ती खात असताना तेलात बुडवून खातात पापडाच्या लाटीसारखीपातळ उकडीवर कच्चे गोडं तेल घालून खातातआमच्या घरी सर्वांना पातळ उकड आवडायची. आता नवरा आणि मुलाला उकड आवडत नाही. पण सासूबाईंना आवडते. मग लोण्याचं ताक केलं की दुपारच्या जेवणाला मी उकड बनवते आणि आम्ही दोघी मस्त ताव मारतो.

साहित्य (3 जणांसाठी(१ कप = २५० मिली )

तांदुळाचं पीठ अर्धा कप

ताक २ कप (जरासं आंबट)

मीठ चवीनुसार

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग पाव चमचा

ठेचलेली मिरची अर्धा चमचा

ठेचलेलं आलं अर्धा चमचा (ऐच्छिक )

ठेचलेली लसूण अर्धा चमचा (ऐच्छिक)

कृती

. तांदुळाच्या पिठात मीठ आणि ताक घालून एकजीव करा. गुठळी होऊ देऊ नका. भज्यांच्या पिठाएवढं पातळ पीठ करा. जरूर पडल्यास पाणी घाला१५ मिनिटं पीठ झाकून ठेवा.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात ठेचलेली मिरची घाला. आलं/ लसूण घालायची असेल तर फोडणीत घाला.

. भिजवलेलं तांदुळाचं पीठ फोडणीत घाला. एकसारखं ढवळत राहा.

. मिश्रणाला उकळी आली की मिश्रण घट्ट व्हायला लागेल. गॅस बारीक करा

. अर्धा कप पाणी घालून ढवळत राहा. मिश्रण पुन्हा घट्ट होईल.

. अर्धा कप पाणी घालून ढवळत राहा. ही स्टेप परत परत करा. थोड्या वेळानं मिश्रण घट्ट व्हायचं थांबेल. तेव्हा आणखी पाणी घालू नका.

. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. मध्ये मध्ये ढवळत राहा.

. मिश्रण शिजल्यावर तुकतुकीत दिसेल. तेव्हा कोथिंबीर घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.

. गरमागरम चविष्ट उकड वरती कच्चे गोडं तेल घालून खायला द्या

Tandalachi Ukad / Takatali Ukad (तांदळाची उकड / ताकातली उकड)

 

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes