Tomato Saar (टोमॅटोचं सार) – Maharashtrian Style Tomato Soup – No Onion, Garlic recipe
This is a Maharashtrian recipe. It is different from Tomato Soup. This is generally served along with Rice or Pulav or Masale Bhaat or Khichadi. But you can serve this as an appetizer also. It requires very few ingredients. It’s very tasty. Some use Pressure cooked tomatoes for this Saar. But I use Blanched Tomatoes. Saar made with Blanched Tomatoes tastes better.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Tomatoes 4 medium size
Fresh Scraped Coconut ¾ cup
Green Chilies 2
Sugar ½ to 1 teaspoon
Salt to taste
For Tempering (Tadka)
Pure Ghee / Clarified Butter 1 teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Asafoetida (Hing) a pinch
Curry Leaves 4-5
Instructions
1. Cook tomatoes in boiling water for 3 minutes or till the skin starts separating out.
2. Drain out the hot water and pour in cold water.
3. On cooling peel the tomatoes to get blanched tomatoes. Alternatively you can cook tomatoes in Pressure cooker also. But the taste of Blanched tomatoes is better.
4. Grind fresh scraped coconut along with 1 cup of water.
5. Squeeze ground coconut to get coconut milk. Transfer coconut milk into a pan. You can again grind the squeezed coconut with little water to get some more coconut milk.
6. Blend blanched tomatoes and green chilies in a blender. Strain blended tomatoes into coconut milk pan.
7. Add salt, sugar and bring to boil; cook for 5 minutes.
8. For Tempering, heat pure ghee in a ladle on medium flame. Add cumin seeds; wait for sputter. Add Asafoetida and curry leaves. Switch off the gas.
9. Pour this tempering into the pan and mix well. Delicious Tomato Saar is ready. Serve Hot.
Note
1. You may add Ginger or Ginger/Garlic paste to this Saar. If you want, add it in step 7. Alternatively Blend Ginger and Garlic pieces along with blanched tomatoes.
==================================================================================
टोमॅटोचं सार – महाराष्ट्रीयन पद्धतीचं चविष्ट आणि पौष्टिक सूप – कांदा लसूण विरहित
पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये सूप नसतं त्याऐवजी सार केलं जातं. टोमॅटोचं सार साधारणपणे भात / पुलाव / मसाले भात / खिचडी सोबत करतात. हल्ली हे सार सूप म्हणून ही दिलं जातं. ह्या सारात नारळाचं दूध घालतात. बाकी नेहमी घरात असणारं साहित्य घातलं जातं. कांदा लसूण न घालता ही होणारं अतिशय चविष्ट असं हे सार सगळ्यांना आवडतं.
काही जणी सार करताना टोमॅटो प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेतात. मी टोमॅटो ब्लांच करून सार करते. असं केलेलं सार जास्त चवदार लागतं.
साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
टोमॅटो ४ मध्यम आकाराचे
ताजा खवलेला नारळ पाऊण कप
हिरव्या मिरच्या २
साखर अर्धा – १ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
साजूक तूप १ टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हिंग चिमूटभर
कढीपत्ता ४–५ पानं
कृती
१. टोमॅटो धुवून उकळत्या पाण्यात ३ मिनिटं शिजवा. लगेच गार पाण्यात बुडवून ठेवा. नाहीतर टोमॅटो प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. टोमॅटो गार झाल्यावर त्याची सालं काढून टाका.
२. नारळामध्ये १ कप पाणी घालून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या आणि गाळून नारळाचं दूध काढून घ्या.नारळाच्या चोथ्यात थोडं पाणी घालून परत एकदा मिक्सरमध्ये वाटून त्याचं दूध काढून घ्या. नारळाचं दूध एका पातेल्यात घाला.
३. सोललेल्या टोमॅटोचे तुकडे, मिरच्या मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
४. टोमॅटोचं मिश्रण गाळून घ्या आणि नारळाच्या रसात घाला.
५. मिश्रणात मीठ, साखर घालून ते गरम करायला ठेवा. उकळी आली की ५ मिनिटं मध्यम आचेवर शिजवा. सार जेवढं दाट / पातळ हवं असेल त्याप्रमाणे पाणी घाला.
६. एका कढल्यात साजूक तूप घालून जिरं, हिंगाची खमंग फोडणी करा. फोडणीत कढीपत्ता घाला. ही फोडणी टोमॅटोच्या मिश्रणात ओता आणि नीट ढवळून घ्या.
८. चविष्ट आणि पौष्टिक टोमॅटोचं सार तयार आहे. गरमगरम सार भा / पुलाव / मसाले भात / खिचडीसोबत सर्व्ह करा किंवा सूप म्हणून सर्व्ह करा.
टीप
१. ह्या सारात तुम्ही आलं / आलं लसूण पेस्ट घालू शकता. स्टेप ५ मध्ये मिश्रणात घाला. किंवा आलं लसणीचे तुकडे टोमॅटो वाटताना मिक्सर मध्ये घाला.
मस्त
Thank you Jayshree.