Broccoli Soup (ब्रोकोली सूप) – Healthy and Creamy Soup without Corn Flour

Broccoli Soup (ब्रोकोली सूप)

Broccoli Soup (ब्रोकोली सूप)

ब्रोकोली सूप मराठी

Broccoli is very nutritious and now it’s easily available in India. There are different recipes of Broccoli soup. But I wanted an easy one with ingredients available in kitchen. So made my own recipe. With this recipe the Soup is yummy and creamy. Since Broccoli has strong flavour, I add Spinach or Coriander to tone it down. Broccoli has a creamy texture, hence I don’t add corn flour to this soup.

I prefer cooking onion in Microwave while using it in a soup. It tastes better than adding it raw or sauteed. If you don’t have Microwave, you can pressure cook onion.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Broccoli Florets, Tender stems 1 cup

Chopped Spinach / Coriander Leaves and tender stem 1 cup

Onion 1 small

Garlic Cloves 3-4

Black Pepper powder as per taste

Salt to taste

Fresh Cream for serving (optional)

Instructions

1. Wash, clean and chop Spinach / Coriander. If you are using Spinach, Cook in microwave for 4 minutes on high power without lid. If you don’t have Microwave, steam Spinach in a pan with little water till it’s tender. If you are using Coriander, don’t cook it.

2. Blend cooked Spinach / Raw Coriander into a smooth puree.

3. Wash Broccoli florets, stems and steam them in microwave for 6-8 minutes on high power. Close the steamer with a lid while cooking. Cook for some more time if florets are not soft. Do not overcook Broccoli. Florets should just be soft. Leave it to cool. If you don’t have Microwave, steam Broccoli in a pan with little water till it’s tender. Do not overcook.

4. Give 2 perpendicular slits to onion. Cook Onion and Garlic Cloves with peel in microwave for 1 minutes. After cooling peel it. I you don’t have microwave, pressure cook onion.

5. Keep aside a few Broccoli florets for garnishing and blend the remaining along with Onion and Garlic into a smooth Puree. Add water if required while blending

6. In a Sauce Pan, add Spinach / Coriander Puree, Broccoli Puree and salt. Add water to get required consistency.

7. Boil for 7-8 minutes.

8. Add Black Pepper Powder.

9. Delicious and healthy Broccoli soup is ready. Garnish with Broccoli florets and fresh cream / Cheese and serve hot.

Note

1. There is another way you can add Garlic to this soup. Instead of cooking and blending it chop it into medium size pieces. In a ladle, Heat ½ teaspoon of butter / ghee on low flame. Add Garlic pieces and fry till light brown. Pour this in the soup.

Broccoli Soup (ब्रोकोली सूप)
Broccoli Soup (ब्रोकोली सूप)
     ==================================================================================

ब्रोकोली सूप

ब्रोकोली खूप पौष्टिक असते आणि आता भारतात सहज मिळतेही. ब्रोकोली सूप च्या बऱ्याच पाककृती आहेत पण मला अशी पाककृती हवी असते ज्यात आपल्याकडे नेहमी असणारे जिन्नस वापरले जातात. म्हणून मी ही पाककृती मी स्वतःच बनवली. अगदी सोपी कृती आहे. साहित्य ही कमी लागतं. सूप छान चविष्ट होतं. ब्रोकोलीला एक उग्र स्वाद असतो. तो कमी करण्यासाठी मी पालक किंवा कोथिंबीर घालते. ब्रोकोलीला क्रिमी टेक्सचर असतं त्यामुळे सूप मध्ये कॉर्न फ्लोअर घालत नाही.

नेहमीप्रमाणे माझी टीप

सूप मध्ये कांदा घालताना मी मायक्रोवेव्ह मध्ये मिनिटभर भाजून घेते. अशा कांद्याची चव कच्च्या / परतलेल्या कांद्यापेक्षा छान येते. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर कांदा प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेऊ शकता.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

ब्रोकोलीचे तुरे आणि कोवळी देठं १ कप

चिरलेला पालक / कोथिंबीर १ कप

कांदा १ मध्यम

लसूण ३४ पाकळ्या

मिरी पूड चवीनुसार

मीठ चवीनुसार

मलई / क्रिम / चीज  सजावटीसाठी

कृती

. चिरलेला पालक मायक्रोवेव्ह मध्ये ४ मिनिटं हाय पॉवर वर शिजवून घ्या. पाणी घालू नका आणि झाकण ठेवू नकामायक्रोवेव्ह नसेल तर पातेल्यात पालक व  थोडं पाणी घाला आणि गॅसवर शिजवून घ्या.   कोथींबीर वापरत असाल तर शिजवू नका.

. मिक्सर मध्ये शिजलेला पालक / कच्ची कोथींबीर बारीक वाटून घ्या.

. ब्रोकोलीचे तुरे आणि देठं मायक्रोवेव्ह मध्ये पाणी घालून हाय पॉवर वर ६८ मिनिटं वाफवून घ्या. वाफवताना झाकण ठेवा. ब्रोकोली जरा नरम झाली नसेल तर आणखी थोडा वेळ वाफवून घ्या. अति शिजवून पीठ करू नकामायक्रोवेव्ह नसेल तर गॅसवर शिजवून घ्या

. थोडे ब्रोकोलीचे तुरे सजावटीसाठी काढून ठेवा. बाकीची ब्रोकोली मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

. कांद्याला काटकोनात २ खाचा देऊन (भरली वांगी करताना देतो तशाकागदाच्या ताटलीत ठेवा. लसूण ही ताटलीत ठेवादोन्ही मायक्रोवेव्ह मध्ये १ मिनिट भाजून घ्या

. थंड झाल्यावर कांदा, लसूण सोलून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

. एका पातेल्यात वाटलेला पालक / कोथिंबीर, ब्रोकोली, कांदा, लसूण घाला. जरुरीप्रमाणे पाणी, मीठ घालून ७८ मिनिटं उकळवा.

. चवीप्रमाणे मिरपूड घाला.

. ब्रोकोलीचं चविष्ट सूप तयार आहे. ब्रोकोलीचे तुरे, मलई / चीज घालून गरम गरम सुपाचा आस्वाद घ्या.   

टीप

. सुपामध्ये लसूण घालायची आणखी एक पद्धत आहे. लसणीचे तुकडे करून ते साजूक तुपात गुलाबी रंगावर तळून घ्या आणि तयार सुपात घाला. असा लसणीचा स्वाद ही छान लागतो

Broccoli Soup (ब्रोकोली सूप)
Broccoli Soup (ब्रोकोली सूप)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes