Drumsticks Kadhi (शेवग्याच्या शेंगांची कढी)

Drumsticks Kadhi
Drumsticks Kadhi (शेवग्याच्या शेंगांची कढी)

Drumsticks Kadhi (शेवग्याच्या शेंगांची कढी)

शेवग्याच्या शेंगांची कढी मराठी

Kadhi is made in many regions in India wherever people have curd / buttermilk. Also the taste and texture of Kadhi differs from region to region. Maharashtrian Kadhi is not very thick and has a right balance of sourness and sweetness. We do add green chilies to it but don’t make it hot (Pungent). Curd or Buttermilk is the main ingredient of Kadhi. Taking inspiration from my Drumsticks Soup, I made a variation to Kadhi by adding drumsticks along with drumsticks pulp. It gave a nice delicious aroma and taste to the Kadhi. Try this variation. You will like it.IngredientsButtermilk 2.5 cupsDrumsticks 3Besan (Gram Flour) or Rice Flour 1 teaspoonGreen Chili Paste ½ teaspoonCurry Leaves 7-8Turmeric Powder ½ teaspoonGhee (Clarified Butter) 1 teaspoonCumin Seeds ½ teaspoonAsafoetida (Hing) a pinchFenugreek (Methi) seeds 5-6Sugar 1 teaspoon (Adjust as per taste)Salt to tasteInstructions1. Wash and cut Drumsticks into 2-3 inch long pieces. Add them to a pan; add about a cup of water and ¼ teaspoon salt and cook on low flame without lid till Drumstick are soft. Add water if required. You should be able to press them with fingers. Do not overcook. Leave them to cool. Do not throw away the water that you used for cooking drumsticks.2. In a pan, add buttermilk, chili paste, salt, sugar, chopped curry leaves and turmeric powder.3. Take out pieces of 1 drumstick; break it open and with a spoon scoop out the pulp. Collect it in a grinder. We’ll use remaining drumstick pieces as it is.

Scoop out the pulp from Drumsticks ( शेंगांचा गर काढून घ्या)
Drumsticks Pulp ( शेंगांचा गर)
  4. Add Besan / Rice flour to the grinder. Grind the mixture together into a smooth paste.5. Add this paste to buttermilk mixture and mix.6. Heat buttermilk mixture on medium heat stirring all the time till mixture starts boiling. You need to stir the mixture now.7. Add cooked drumsticks pieces to it.8. Continue to cook for 5-7 minutes. Adjust consistency of the mixture by adding water if required.9. In a small ladle, heat Ghee. Add cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida and fenugreek seeds. Pour this tempering into buttermilk mixture. Mix well.10. Delicious Drumsticks Kadhi is ready. Serve hot with Roti (Indian Bread) or Rice or Pulav with a spoonful of home made ghee. It tastes awesome.
Drumsticks Kadhi
      ==================================================================================

शेवग्याच्या शेंगांची कढी

ताकाची कढी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. कढी भात, कढी खिचडी हे प्रकार सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मी शेवग्याच्या शेंगा घालून कढी करते. फक्त शिजवलेल्या शेंगा नाही तर थोड्या शेंगांचा गर काढून कढीत घालते. त्यामुळे कढीला शेंगांचा छान स्वाद येतो. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे.

साहित्य (१ कप = २५० मिली) (३ जणांसाठी)

ताक अडीच कप (कढीसाठी थोडं आंबट ताक घ्यावं)

शेवग्याच्या शेंगा ३

बेसन किंवा तांदुळाचं पीठ १ टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

कढीपत्ता ७८ पानं

हळद अर्धा टीस्पून

साजूक तूप १ टीस्पून

जिरं अर्धा टीस्पून

हिंग १ चिमूट

मेथीदाणे ५

साखर १ टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. शेवग्याच्या शेंगा धुवून २३ इंचाचे तुकडे करा. एका पातेल्यात १ कप पाणी घालून शेंगांचे तुकडे आणि पाव चमचा मीठ घाला. मंद आचेवर शेंगा नरम होईपर्यंत शिजवा. गार करत ठेवा. शिजवलेलं शेंगांचं पाणी टाकू नका. आपण ते कढीत वापरणार आहोत.

. एका पातेल्यात ताक, हिरवी मिरची, मीठ, साखर, हळद आणि कढीपत्ता घालून एकजीव करा.

. शिजवलेल्या शेंगांपैकी एका शेंगेचे तुकडे वेगळे काढा. एका ताटलीत शेंगेचे तुकडे हाताने मोडून घ्या. आणि चमच्याने शेंगेचा गर काढून घ्या.   

Scoop out the pulp from Drumsticks ( शेंगांचा गर काढून घ्या)
Drumsticks Pulp ( शेंगांचा गर)

. शेंगांचा गर आणि बेसन / तांदुळाचं पीठ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

. ताकाच्या मिश्रणाची पातेली गॅसवर ठेवा आणि मंद आचेवर गरम करा. मिश्रण एकसारखं ढवळत रहा.

. मिश्रणाला उकळी आली की त्यात बारीक केलेला शेंगांचा गर आणि शिजवलेल्या शेंगा घाला. शेंगांचं पाणी पण घाला

. मिश्रण ५६ मिनिटं उकळू द्या. कढी जेवढी दाट हवी असेल त्यानुसार पाणी घाला / पाणी आटवा.

. एका कढल्यात साजूक तूप घालून जिरं, हिंग आणि मेथीदाणे घालून खमंग फोडणी करा. फोडणी कढीच्या पातेल्यात घाला.

. गरम गरम कढी भात / पुलाव / खिचडी सोबत खायला द्या

Drumsticks Kadhi (शेवग्याच्या शेंगांची कढी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes