Naralachya Rasatalya Shevaya (नारळाच्या रसातल्या शेवया) – Rice Shevai with Sweet Coconut Milk
नारळाच्या रसातल्या शेवया मराठी
This is a traditional recipe from Southern Konkan. These are Rice Flour Vermicelli served with Sweet coconut milk (It’s called Ras) . This is served as a part of main course. It’s a bit lengthy process but the results are awesome. It’s very delicious – worth all the hard work that you put in to cook this.
Ingredients (Serves 3 as a part of Meal) (1 cup = 250 ml)
Rice Flour (Fine) 1+ ¼ cups
White Butter / Ghee / Clarified butter 2 teaspoons
Oil 1 teaspoon
Fresh scraped Coconut 1 cup
Jaggery Crushed 1/3 cup
Cardamom Powder ¼ teaspoon
Salt 1 teaspoon
Instructions
To Prepare Shevai
1. Heat 1 cup of water in a pan on medium flame.
2. Add butter (preferable home made ; if not available use any butter) and half teaspoon salt.
3. On boiling, turn to low flame and add rice flour, mix well.
4. Turn off the flame and cover and let it stand for 15 minutes.
5. Knead the dough into medium consistency after adding a few drops of oil (use water if needed).
6. Make 4 inch by 1½ inch oblong balls.
7. Boil 4 liters water in a large pan on medium flame.
8. Drop the dough balls into the water, keep boiling. Rice balls will sink in the water.
9. Turn the flame to low when the dough balls start floating. Now rice balls are cooked.
10. Put each dough ball in vermicelli maker and press out the “shevai”; dough balls are hot so use a napkin to hold the vermicelli maker if you are using a metal vermicelli maker.
11. You need to make shevai while the dough balls are hot. Keep boiling water on low flame and keep making shevai after taking out a dough ball at a time.
To Prepare Sweet Coconut Milk
1. Grind scraped fresh coconut in a grinder with little water.
2. Squeeze the coconut milk.
3. Add jaggery, stir it till it dissolves in the coconut milk.
4. Add ½ teaspoon salt and Cardamom powder. Mix well. Sweet coconut milk is ready.
Serve Shevai with Sweet Coconut Milk. While eating, soak shevai in coconut Milk for a few minutes and eat them together. Enjoy this delicacy from Kokan.
Note
In hot and humid weather like Mumbai, Coconut Milk should be consumed within 3 to 4 hours of making.
==================================================================================
नारळाच्या रसातल्या शेवया
हा पदार्थ तळकोकणाची स्पेशालिटी आहे. अगदी कमी साहित्य लागणारा पण अतिशय स्वादिष्ट अशा ह्या तांदुळाच्या पिठाच्या शेवया आहेत. लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात जायचो तेव्हा हमखास एकदा तरी शेवयांचा बेत असायचा. शेवया बनवणं जरा वेळकाढू काम आहे. पण खायला एवढ्या छान लागतात की केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. मऊसूत शेवया नारळाच्या गोड रसात बुडवून खाणं म्हणजे ब्रम्हानंदी टाळी लागण्यासारखं असतं.
दक्षिणेचा इडिअप्पम हा पदार्थ ह्या शेवयांसारखा आहे पण इडिअप्पम ची कृती थोडी वेगळी आहे.
साहित्य (३ जणांसाठी जेवण म्हणून) (१ कप = २५० मिली)
तांदुळाचं पीठ सव्वा कप (सुवासिक तांदुळाचं पीठ / मोदकाचे पीठ असेल तर उत्तम)
लोणी / साजूक तूप २ चमचे
तेल १ चमचा
पाणी १ कप
ताजा खवलेला नारळ १ कप
चिरलेला गूळ १/३ ते अर्धा कप
वेलची पूड पाव चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. एका पातेल्यात १ कप पाणी गरम करा. त्यात लोणी / साजूक तूप आणि अर्धा चमचा मीठ घाला.
२. पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करून त्यात तांदुळाचं पीठ घाला. एकदा ढवळून घ्या.
३. गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवून १५ मिनिटं पीठ मुरू द्या.
४. पीठ एका परातीत घेऊन छान मळून घ्या. हवं असल्यास हाताला थोडं तेल लावा. पीठ मध्यम घट्ट मळा. जरूर पडल्यास थोडं पाणी लावा.
५. पिठाचे ४ इंच लांबीचे आणि दीड इंच रुंदीचे मुटके बनवा.
६. एका मोठ्या पातेल्यात ४ लिटर पाणी घेऊन ते उकळा. पाणी उकळलं की पिठाचे मुटके त्यात सोडा. सुरुवातीला मुटके पातेल्याच्या तळाशी जातील.
७. पाणी उकळत ठेवा. मुटके शिजले की पाण्यात वर तरंगतील. आता गॅस बारीक करा.
८. गरम मुटके पाण्यातून काढून शेवेच्या सोऱ्यात घाला आणि शेवया पाडून घ्या. प्रत्येक मुटक्याच्या शेवया ताटात बाजूबाजूला पाडा म्हणजे वाढायला सोपं पडतं.
९. पितळेचा / स्टील चा सोऱ्या वापरत असाल तर सोऱ्याला नॅपकिन गुंडाळा म्हणजे हात भाजणार नाही.
१०. नारळाच्या रसासाठी खवलेला नारळ मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. वाटलेला नारळ मलमलच्या कपड्यावर घालून नारळाचं दूध गाळून घ्या. वाटलेला नारळाचा चव परत एकदा पाणी घालून मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि दूध गाळून घ्या.
११. नारळाच्या दुधात चिरलेला गूळ, चिमूटभर मीठ आणि वेलची पूड घालून गूळ विरघळेपर्यंत मिक्स करा.
१२. शेवया आणि नारळाचा रस तयार आहे. खाताना शेवया नारळाच्या रसात २ मिनिटं बुडवून ठेवा आणि नंतर स्वादिष्ट शेवयांचा आस्वाद घ्या.
टीप
१. मुंबईच्या हवेत नारळाचा रस लवकर खराब होतो. त्यामुळे रस काढल्यानंतर ३–४ तासात संपवा.
Your comments / feedback will help improve the recipes