Shahi Apple Curry (शाही ॲपल करी) – Delicious Apple Curry
After sharing Apple Pulav, now it’s time for Apple Curry. Apple season has just started. So make it most fruitful by trying various recipes using Apple. I was little skeptical about using Apple in curry. But it turned out to be awesome. Although, the list of ingredients is little long as compared to my other recipes, all these ingredients are generally available in Indian kitchen and it’s very easy to make this curry. If you want to try something different, try this out. I’m sure you will like it.
Ingredients (Serves 2-3)
Apple 1 Big size
Onion 1 medium finely chopped
Tomatoes 3 medium
Cinnamon (Dalchini) ½ inch piece
Cashew nuts 8-10
Chili powder ½ teaspoon
Turmeric Powder ¼ teaspoon
Black pepper powder ¼ teaspoon
Garam Masala (Indian Spice Powder) ¼ teaspoon
Fennel Seeds (Saunf) ½ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Chopped coriander 1 teaspoon
Fresh cream 1 teaspoon
Sugar ½ teaspoon
Salt to taste
Butter 1 teaspoon
Lemon juice ¼ teaspoon
Instructions
1. Grind together cashew nuts and tomatoes in a smooth paste
2. In a pan, heat butter on low flame. Add Cumin Seeds, Fennel Seeds, Cinnamon and finely chopped onion.
3. Sauté on low flame till onion is translucent.
4. Add Turmeric Powder, Chili powder, Black Pepper Powder and Garam Masala and mix well.
5. Add Tomato puree and cook covered for 7-8 minutes. Add water if required
6. Peel, de-seed and chop Apple in medium size pieces
7. Add Apple pieces to the gravy.
8. Add salt, sugar and lemon juice. Mix and cook covered for a few minutes till apple pieces are little soft. Do not over cook.
9. Add chopped coriander and fresh cream. Mix. Switch off the gas.
10. Serve this tasty curry with Roti , Paratha (Indian Bread) or rice.
===================================================================================
शाही ॲपल करी – जरा वेगळी रुचकर भाजी
सफरचंदाच्या मोसमात एकदा तरी बनवावी अशी स्वादिष्ट करी. सफरचंदाची भाजी हे जरा ऐकायला विचित्रच वाटतं. पण खूप चविष्ट बनते ही भाजी. साहित्याची यादी माझ्या बाकीच्या रेसिपीज पेक्षा मोठी आहे. पण हे सगळे जिन्नस नेहमी असतात आपल्याकडे. नवीन काही आणावं लागत नाही. रेसिपी सोपी आहे. नक्की करून बघा.
साहित्य (२–३ जणांसाठी)
मोठं सफरचंद १
कांदा १ मध्यम बारीक चिरून
टोमॅटो ३ मध्यम
दालचिनी अर्धा इंच तुकडा
काजू ८–१०
लाल तिखट अर्धा टीस्पून
हळद पाव टीस्पून
मिरपूड पाव टीस्पून
गरम मसाला पाव टीस्पून
बडीशेप अर्धा टीस्पून
जिरं पाव टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून
मलई / फ्रेश क्रिम १ टीस्पून
साखर अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
बटर १ टीस्पून
लिंबाचा रस पाव टीस्पून
कृती
१. काजू आणि टोमॅटो एकत्र बारीक वाटून घ्या.
२. एका कढईत बटर गरम करून त्यात जिरं, बडीशेप, दालचिनी आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
३. मंद आचेवर कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या.
४. हळद, लाल तिखट, मिरपूड,गरम मसाला घालून नीट ढवळून घ्या.
५. वाटलेला टोमॅटो घालून झाकण ठेवून ७–८ मिनिटं शिजवा. जरूर असल्यास थोडं पाणी घाला.
६. सफरचंद सोलून बिया काढून टाका आणि मध्यम आकाराचे तुकडे करा.
७. सफरचंदाचे तुकडे कढईत घाला.
८. मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. मिक्स करून झाकण ठेवून सफरचंद थोडंसं नरम होईपर्यंत शिजवा. जास्त शिजवू नका नाहीतर त्याची चव जाईल.
९. चिरलेली कोथिंबीर आणि मलई घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.
१०. स्वादिष्ट शाही ॲपल करी पोळी, पराठा किंवा भातासोबत खायला द्या.
व्वा नक्की बनवेल
Thank you Jayshree