Dink Laadoo with Jaggery (डिंकाचे खमंग स्वादिष्ट लाडू गूळ घालून) – Gond / Gundar / Edible Gum Laddu – With Jaggery
डिंकाचे खमंग स्वादिष्ट लाडू – गूळ घालून मराठी
Dink Laadoo is a winter specialty. Although per say there is no winter in Mumbai, winter season is good enough reason to relish these delicious laddus. There are different ways to make these laddus. I’ve made them in Maharashtrian style with my twist by adding Sunth (Saunth / Dry Ginger) Powder. Later I came to know that Sunth is added in the traditional recipe of these laddus in MP. Sunth makes the laddus more delicious. This recipe uses Jaggery for sweetness and the recipe is not a difficult one.
Ingredients (makes 30 laddus) (1 cup = 250 ml)
Dink (Edible Gum / Gond / Gunther) 100 gms
Kharik (Dry Dates) Powder 100 gms
Sunth (Dry Ginger / Saunth) Powder 50 gms
Crushed Jaggery 100 to 150 gms (Adjust as per taste) (about ½ cup)
Grated Dry Coconut 100 gms
Khaskhas (Poppy Seeds) 2 tablespoons
Badam (Almonds) chopped 20-22
Cashew Nuts chopped 20-22
Khishmish (Raisins) 20-22
Pure Ghee (Clarified Butter) 100 to 150 gms (½ to ¾ cup)
Instructions
1. Dry roast grated dry coconut till light brown and transfer to a big bowl.
2. Dry roast Poppy Seeds till light brown and transfer to the bowl.
3. Add 2 tablespoon of Ghee to a pan. Heat it on low flame. Add 2 spoons of Edible gum and fry it till it is puffed. Take it out in a plate. This way fry all the edible gum and take it out in a plate. Leave it to cool.
4. In the same plan in which you fried the edible gum, fry Almonds and Cashew pieces till light brown. Then add Raisins; fry till they puff up. Add little Ghee if required.
5. Take out all the fried dry fruits in the bowl that has roasted dry coconut.
6. Add little Ghee in the same pan and roast Dry Dates powder for 3-4 minutes. Keep stirring all the time. Take it out in the bowl that has other roasted ingredients. Do not add too much ghee while roasting Dry Dates powder.
7. In the same pan, add Dry Ginger powder. Roast for 2-3 minutes till you get nice aroma of dried Ginger. Take it out in the bowl that has other roasted ingredients.
8. Crush the puffed edible gum with hands and add it to the bowl. Mix all the ingredients.
9. If you have soft Jaggery, you can mix it in the bowl directly. If Jaggery if not soft, heat it in a pan till it melts and then add to the mixture and mix it.
10. Roll laddus while the mixture is warm.
11. Delicious, Crunchy, Healthy Dink Laddu are ready. Serve them along with breakfast or as mid morning or evening snack.
===================================================================================
डिंकाचे खमंग स्वादिष्ट लाडू – गूळ घालून – गम के लड्डू !! पर खाने से बहुत ख़ुशी मिलती है !!!!
डिंकाचे लाडू कधीही खायला छान लागतात. पण थंडीच्या दिवसात ते आणखी छान लागतात. ह्या रेसिपी त साखर न वापरता गूळ वापरला आहे.
हे लाडू बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे सगळा डिंक नीट फुलला आहे का ते बघायची. तळलेला डिंक हाताने चुरताना जर कडक तुकडे लागले तर ते काढून टाकायचे. नाहीतर लाडू खाताना हे कडक तुकडे तोंडात येऊन सगळा विचका होईल.
साहित्य (अंदाजे ३० लाडवांसाठी ) (१ कप = २५० मिली )
डिंक १०० ग्राम
खारीक पूड १०० ग्राम
सुंठ पूड ५० ग्राम
चिरलेला गूळ १०० – १५० ग्राम (अंदाजे अर्धा कप)
किसलेलं सुकं खोबरं १०० ग्राम
खसखस २ टेबलस्पून
काजू २०–२२ बारीक तुकडे करून
बदाम २०–२२ बारीक तुकडे करून
बेदाणे २०–२२
साजूक तूप १०० – १५० ग्राम (अर्धा ते पाऊण कप)
वेलची पूड अर्धा चमचा
कृती
१. एका कढईत सुकं खोबरं गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. एका मोठ्या वाडग्यात काढा.
२. त्याच कढईत खसखस गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. ताटलीत काढून गार करा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून खोबऱ्याच्या वाडग्यात घाला.
३. त्याच कढईत २ टेबलस्पून तूप घालून गरम करा. २ टेबलस्पून डिंक घालून मंद आचेवर डिंक फुलेपर्यंत तळून घ्या. एका ताटलीत काढा. अशा तऱ्हेने सगळा डिंक तळून घ्या.
४. त्याच कढईत १ चमचा तूप घालून काजू आणि बदामाचे तुकडे वेगवेगळे तळून घ्या. खोबऱ्याच्या वाडग्यात घाला.
५. त्याच कढईत १ चमचा तूप घालून बेदाणे फुलेपर्यंत तळून घ्या. खोबऱ्याच्या वाडग्यात घाला.
६. त्याच कढईत १ चमचा तूप घालून खारीक पूड ३–४ मिनिटं भाजून घ्या. खोबऱ्याच्या वाडग्यात घाला.
७. त्याच कढईत १ चमचा तूप घालून सुंठ पूड २–३ मिनिटं भाजून घ्या. खमंग सुगंध आला की पूड खोबऱ्याच्या वाडग्यात घाला.
८. तळलेला डिंक हाताने चुरून खोबऱ्याच्या वाडग्यात घाला.
९. गूळ नरम असेल तर तसाच बाउल मध्ये घाला. नरम नसेल तर गूळ गरम करून वितळला की वाडग्यात घाला.
१०. वेलची पूड घाला. मिश्रण मिक्स करा आणि कोमट असतानाच लाडू वळा. मिश्रण फार सुकं झालं असेल तर चमचाभर तूप घालून मिक्स करा आणि लाडू वळा.
११. डिंकाचे स्वादिष्ट, पौष्टिकलाडू तयार आहेत.
१२. हे लाडू फ्रिजमध्ये फ्रिजमध्ये न ठेवता ३ आठवडे टिकतात.
Your comments / feedback will help improve the recipes