
Green Peas Pods Soup (मटर के छिलके का सूप / मटार च्या सालांचे सूप )
We throw away the Pods after taking out Green Peas. These Pods are Vitamin Rich. I tried making a soup of these Pods. It came out to be very creamy, thick and delicious. I did not add any Peas to it. It has only Pods.IngredientsGreen Peas Pods (after taking out Peas) 3 cupsOnions 1 mediumMilk ½ cupSalt to tasteBlack Pepper Powder ¼ to ½ teaspoonButter 1 teaspoonInstructions1. Wash and roughly chop Green Peas Pods.2. If you are using Microwave – Cook Green Peas Pods with little water on high for 8 minutes or till they are soft. Leave them to cool. Give 2 perpendicular slits to Onion. Cook in microwave on high for 2 minutes. Onion will become soft. Leave it to cool.3. If you are not using microwave – heat butter in a pan. Add roughly chopped onion. Sauté for 3 minutes on low flame. Add Green Peas Pods. Sauté for 4-5 minutes on low flame. Add water just enough to cover the pods and pressure cook the mixture for 2 whistles. Leave the mixture to cool.4. Blend the mixture into a smooth puree and strain it.5. If you have cooked Pods in microwave, heat butter in a pan.6. Transfer the strained mixture to a pan and bring it to boil.7. Add milk. Boil the mixture.8. Add Salt and Black Pepper powder. Add to water to adjust the consistency. Bring to boil.9. Rich, Creamy, Healthy and Delicious Green Peas Pods Soup is ready. Serve hot.NoteUse bright green coloured Pods for the soup that are tender. Do not use pale green / yellowish pods.
मटारच्या सालांचे सूप
थंडीच्या दिवसात छान कोवळा हिरवागार मटार मिळतो. मटारचे दाणे काढून आपण सालं फेकून देतो. पण ह्या कोवळ्या सालांचे चविष्ट सूप बनवता येतं. आणि ते खूप पौष्टिक ही असतं. मी ह्यात मटारचे दाणे घालत नाही. हे फक्त सालांचं सूप आहे.
साहित्य (४ जणांसाठी)
मटारची कोवळी सालं ३ कप
कांदा १ मध्यम
दूध अर्धा कप
मीठ चवीनुसार
मिरपूड चवीनुसार
बटर १ चमचा
कृती
१. मटारची कोवळी सालं स्वच्छ धुवून जाडसर कापून घ्या. मायक्रोवेव्ह च्या भांड्यात थोडंसं पाणी घालून सालं घाला. हाय पॉवर वर ८ मिनिटं शिजवा. सालं नरम झाली पाहिजेत. कांद्याला उभी आणि आडवी चीर देऊन मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर २ मिनिटं भाजा. कांदा नरम होईल. सालं आणि कांदा थंड होऊ द्या.
२. मायक्रोवेव्ह नसेल तर एका पॅन मध्ये बटर घालून जाडसर चिरलेला कांदा घालून २–३ मिनिटं परता. नंतर त्यातच चिरलेली मटार ची सालं घालून ४–५ मिनिटं परता. कांदा आणि सालं बुडतील एवढं पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये २ शिट्या होईपर्यंत वाफवून घ्या.
३. थंड झाल्यावर सालं आणि कांदा मिक्सर मध्ये बारीक वाटून गाळून घ्या.
४. मायक्रोवेव्ह मध्ये सालं शिजवली असतील तर एका पातेल्यात बटर घालून गरम करा.
५. त्यात वाटलेलं मिश्रण घाला. प्रेशर कुकर मध्ये शिजवलं असेल तर परत बटर घालायची गरज नाही.
६. मिश्रण उकळू द्या.
७. दूध घालून परत उकळी काढा.
८. मीठ आणि मिरपूड घाला. पाणी घालून हवं तेवढं पातळ करा. मिश्रण उकळा .
९. चविष्ट, क्रिमी आणि पौष्टिक सूप तयार आहे. गरमागरम सूप सर्व्ह करा.
Leave a Reply