Gul Poli (गूळ पोळी/ गूळपोळी) – Sweet Roti with Jaggery, Gram Flour and Sesame Seeds Filling
This is Maharashtrian Specialty. It’s Delicious sweet roti with a filling of Jaggery, Gram Flour and Sesame Seeds. It’s made on Makar Sankranti (Kite Festival). This is my Mother’s recipe.
Ingredients (Makes 16-18 Poli) (1 cup = 250 ml)
Gram Flour 2 cups
Crushed Jaggery (Gul) 4 cups crushed (Regular Jaggery – not the sticky one)
White Seasame Seeds ¾ cup
Poppy Seeds (Khuskhus ) 3 tablespoons
Wheat Flour 1 to 1.25 cups + as required for dusting
Baking soda a pinch
Oil 1.5 teaspoons
Cardamom Powder ¼ teaspoon
Milk 2 tablespoons (approx)
Salt ¼ teaspoon
Instructions
Prepare Dough
1. Mix wheat flour, baking soda, salt, ½ teaspoon oil and Bind a medium stiff dough after adding water.
Prepare Filling
1. Roast white sesame seeds till light brown.
2. Grind after cooling.
3. Roast poppy seeds till light brown.
4. Grind after cooling.
5. Roast gram flour along with 1 teaspoon of oil till light brown.
6. While hot add crushed jaggery, ground sesame seeds and ground poppy seeds to roasted gram flour. Mix.
7. On cooling, add cardamom powder, dry grind the mixture to remove lumps – make a dry powder. It does not take long to grind this. Just pulse the grinder 2-3 times and it should be ready.
Make Gul Poli
1. Take a small portion of filling powder in a plate. Add ½ tablespoon of milk and bind it together a stiff consistency ball. Be careful while adding milk. If you add excess milk, filling will be very soft and can not be used. Bind all the filling and keep it ready.
2. Take two 1 inch round balls of dough, roll them individually, into 3 inch diameter circles (like Puri).
3. Take 2 inch diameter round ball of filling, flatten it and place between the 2 dough circles above.
4. Seal the edges, gently roll into a 7 – 8 inch roti. Use wheat flour for dusting,
5. Trim the edges.
6. Dry roast roti on a flat griddle, till light brown on both sides.
7. Cool to room temperature.
Serve these yummy Gul Poli with generous helping of home made ghee (clarified butter).
Gul Poli lasts for 5-6 days at room temperature.
==================================================================================
गूळ पोळी – मकर संक्रांत स्पेशल
गूळ पोळी न आवडणारी व्यक्ती मी तरी अजून पाहिली नाही. बाजारात चांगल्या पुरणपोळ्या मिळतात पण चांगल्या गूळ पोळ्या जवळजवळ नाहीच मिळत. म्हणून गूळ पोळ्या घरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. गूळ पोळ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ह्यात मी गुळाबरोबर बेसन, तीळ आणि खसखस घालते. त्यामुळे पोळ्या अतिशय खमंग आणि स्वादिष्ट होतात. गूळ पोळ्यांसाठी गूळ किसणे हे फार कटकटीचे काम असतं. ह्या रेसिपीत गूळ चिरून घालते. आणि सारणात सगळे जिन्नस घातल्यावर सारण मिक्सर मध्ये फिरवून घेते. त्यामुळे सगळ्या गुठळ्या मोडतात. मग थोडं दूध घालून सारण घट्ट भिजवून पोळ्या करते. ह्या पोळ्या करणं हे वेळकाढू काम आहे पण वर्षात एकदा तेवढा वेळ काढायला हवा, नाही का?
साहित्य (१६ – १८ पोळ्यांसाठी) (१ कप = २५० मिली )
बेसन २ कप
चिरलेला गूळ ४ कप ( साधा गूळ घ्या – चिकीचा गूळ नको )
तीळ पाऊण कप
खसखस ३ टेबलस्पून
वेलची पूड पाव टीस्पून
तेल दीड टीस्पून
कणिक एक- सव्वा कप + पोळ्या करताना लावायला
खायचा सोडा चिमूटभर
मीठ पाव टीस्पून
दूध २ टेबलस्पून (अंदाजे)
कृती
१. कणकेत सोडा, मीठ, अर्धा चमचा तेल घालून मध्यम घट्ट (पोळ्यांसारखी) कणिक भिजवून घ्या. २ तास झाकून ठेवा. सोड्यामुळे पोळ्या फुटत नाहीत.
२. मंद आचेवर तीळ आणि खसखस वेगवेगळी खमंग भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सर मध्ये किंचित जाडसर वाटून घ्या.
३. बेसनात १ चमचा तेल घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
४. चिरलेल्या गुळात गरम बेसन मिक्स करा. खसखस आणि तिळाची पूड घाला. मिक्स करा.
५. गार झाल्यावर मिक्सर मध्ये पल्स मोड वर बारीक करून घ्या. मिश्रण सुक्या पावडर सारखं दिसेल. मिश्रणात वेलची पूड घालून मिक्स करा. सारण तयार आहे.
६. पोळ्या करायच्या वेळी थोडं थोडं सारण घेऊन त्यात चमचाभर दूध घालून घट्ट गोळा करून घ्या. सारणाचा गोळा करायला खूपच कमी दूध लागतं म्हणून एका वेळी चमचाभर च दूध घाला.
७. पोळ्या करण्यासाठी भिजवलेली कणिक मळून घ्या.
८. कणकेचे पुरीच्या गोळ्यापेक्षा जरा मोठे गोळे करा.
९. दोन गोळे पुरीसारखे लाटून घ्या. कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट सारणाचा गोळा घेऊन हाताने थापून लाटलेल्या पुरीपेक्षा थोडा छोटा गोल बनवा. हा सारणाचा गोल दोन पुऱ्यांच्या मधे घालून कडा बंद करा. हलक्या हाताने ७–८ इंच व्यासाची पोळी लाटून घ्या.
१०. गरम तव्यावर पोळी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.
११. पोळी तव्यावरून काढून कागदावर ठेवा आणि गार झाल्यावर डब्यात भरा.
१२. स्वादिष्ट गूळ पोळ्या साजूक तुपाबरोबर खायला द्या.
१३. ह्या पोळ्या ५–६ दिवस टिकतात.
It’s awesome
Thank you