Khatkhate (खटखटे) – Goan Coconut Candy – With Jaggery

Khatkhate
Khatkhate (खटखटे) - Goan Coconut Candy

Khatkhate (खटखटे) Goan Coconut Candy – With Jaggery

खटखटे गोव्याची स्पेशालिटी नारळाची बर्फी – मराठी

Coconut Burfi or Khoparapak is very common in different parts of India. However, In Goa, there is a different way to make Coconut Burfi. Jaggery is used instead of Sugar to make it more healthy and ginger is added to give a nice flavor. Ginger makes this sweet Jaggery coconut candy very delicious.

There is one more Goan Specialty with similar name Khadkhade / Khatkhate (खदखदे/ खतखते) – This is a type of mixed vegetables.

Consistency of Khatkhate can be crispy (one can easily bite into) or gooey – as per your choice. For making it Gooey you need to cook the mixture a bit longer. But if you want it to be crisp and by mistake it becomes gooey, spread Khatkhate in a plate and leave it for 7-8 hours. Khatkhate will be less Gooey.

Ingredients (1 cup = 250 ml)

Fresh scraped coconut 2 cups

Crushed Jaggery 2 cups

Crushed Ginger 1.5 teaspoon

Peanuts ¼ cup

Sesame Seeds 2 tablespoon

Cardamom Powder ¼ teaspoon

Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Instructions

1. Roast peanuts; remove peels and roughly pound it.

2. Dry roast sesame seeds.

3. In a heavy bottom pan, add ½ teaspoon ghee along with Jaggery and cook on low flame to melt Jaggery.

4. Add Coconut and Crushed Ginger. Keep cooking on low flame stirring all the time.

Khatkhate
Coconut and Jaggery Mixture (गूळ नारळाचं मिश्रण)

5. Keep a greased plate ready for transferring the mixture.

6. When mixture starts coming together, switch off the gas.

7. Add remaining Ghee, Peanuts, Sesame Seeds and Cardamom powder. Mix.

8. Transfer the mixture to the greased plate; don’t spread it.

Khatkhate
Cooked Mixture (शिजवलेलं मिश्रण )

9. When mixture is warm, quickly make small bite size balls and flatten them a bit. Grease your palms with ghee while making balls, if required.

Khatkhate
Khatkhate (खटखटे) – Goan Coconut Candy

10. Enjoy this Goan specialty Khatkhate. This can be an any time snack.

11. You can store this at room temperature for a week.

Note

1. Instead of peanuts you can use finely chopped Cashew Nuts.

Khatkhate
Khatkhate (खटखटे) – Goan Coconut Candy
Khatkhate
Khatkhate (खटखटे) – Goan Coconut Candy

 

==================================================================================

खटखटे गोव्याची स्पेशालिटी नारळाची बर्फी

गोव्यात वेगळ्या प्रकारची नारळाची बर्फी करतात. त्याला फार मजेशीर नाव आहे खटखटेसाधारण अशाच एका नावाचा तिथे आणि एक प्रकार असतो खदखदे/ खतखते. ही एक प्रकारची मिश्र भाजी असते. फक्त एका अक्षराचा फरक. सुरुवातीला मला दोन्ही एकच पदार्थ वाटायचे.

खटखटे करताना ओल्या नारळासोबत गूळ, शेंगदाणे, तीळ आणि आलं घालतात. आकार चपट्या लाडवांसारखा असतो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा प्रकार मधल्या वेळेला खायला खूप छान लागतो.

खटखटे तुम्हाला आवडेल तसं खुसखुशीत (सहज तुकडा मोडेल असं) किंवा जरा चिवट (चघळून खाता येईल असं)  – करू शकता. चिवट खटखटे करताना मिश्रण जरा जास्त शिजवावं लागतं. खुसखुशीत खटखटे करताना जर चुकून जास्त शिजवलं गेलं तर खटखटे ७८ तास ताटलीत पसरून ठेवा म्हणजे चिवटपणा जाईल.

साहित्य (१ कप = २५० मिली)

ताजा खवलेला नारळ २ कप

चिरलेला गूळ २ कप

ठेचलेलं आलं दीड टीस्पून

कच्चे शेंगदाणे पाव कप

तीळ २ टेबलस्पून

वेलची पूड पाव टीस्पून

साजूक तूप १ टीस्पून

कृती

. शेंगदाणे भाजून सोलून घ्या. जाडसर कुटून घ्या

. तीळ सुकेच खमंग भाजून घ्या.

. एका जाड बुडाच्या कढईत अर्धा टीस्पून तूप आणि गूळ घाला. गूळ वितळेपर्यंत मंद आचेवर गरम करा.

. कढईत नारळ आणि आलं घाला. आणि सतत ढवळत शिजवा

Khatkhate
Coconut and Jaggery Mixture (गूळ नारळाचं मिश्रण)

. एका ताटलीला तूप लावून ठेवा.

. कढईतलं मिश्रण कडा सोडायला लागलं की गॅस बंद करा.

. कढईत उरलेलं तूप, शेंगदाणे, तीळ आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा.

. मिश्रण तूप लावलेल्या ताटलीत काढा. तसाच गोळा राहू दे. मिश्रण पसरू नका.

Khatkhate
Cooked Mixture (शिजवलेलं मिश्रण )

. मिश्रण कोमट असताना छोटे छोटे गोळे करून हाताने जरा दाबून वड्या करा.

Khatkhate
Khatkhate (खटखटे) – Goan Coconut Candy

१०. स्वादिष्ट खटखटे तयार आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.

११. खटखटे फ्रिजबाहेर आठवडाभर टिकते

टीप

. शेंगदाण्याऐवजी तुम्ही काजूचे तुकडे घालू शकता.

Khatkhate
Khatkhate (खटखटे) – Goan Coconut Candy
Khatkhate
Khatkhate (खटखटे) – Goan Coconut Candy

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes