Instant Nachani/Ragi Dosa (इन्स्टंट नाचणी डोसा (घावन)) – Finger Millet Savory Pan Cake (NO Fermentation required)
इन्स्टंट नाचणी डोसा (घावन) मराठी
As we all know Nachani (Ragi / Finger Millet) is very nutritious; it has lots of minerals (Magnesium, Phosphorus, Potassium) that are required for good health.
This is a recipe of Nachani Dosa using Nachani flour that is easily available in the market. It requires NO Fermentation. You need to rest the batter for just 10 minutes. This can be an easy and healthy breakfast or snack dish.
Sometimes I use only Ragi Flour and sometimes I add half the amount of Rice flour. Both variations taste good.
Ingredients (1 cup = 250 ml) (makes 6-7 Dosa)
Nachani / Ragi / Finger Millet Flour 1 cup
Curd ¼ cup
Fresh scraped coconut / desiccated coconut 1/3 cup
Crushed Green Chilies ½ teaspoon
Cumin Seeds ½ teaspoon
Salt to taste
Oil/Butter/Ghee (Clarified Butter) while roasting Dosa
Instructions
1. In a bowl, mix coconut and Nachani flour. Add curd, Green Chilies, cumin seeds and salt. Mix well. Add water to prepare a watery batter like Rawa Dosa batter.
2. Keep this batter covered for 30 minutes.
3. Heat non stick flat Griddle. Pour the batter with a help of a ladle in a circular shape. Cook covered for 1-2 minutes on medium flame.
4. Sprinkle some oil/butter/ghee on top. Flip and cook the other side.
5. On the side of the top you will see nice mesh (jaali). Cook the other side. You will see light brown dots on this side.
6. Serve hot Nachani dosa with any chutney or sambar (south Indian curry) or white butter. It tastes nice as it is without any accompaniment.
Note
1. You can add chopped onions, crushed ginger to the batter if you want spicy dosas.
==================================================================================
इन्स्टंट नाचणी डोसा (घावन) – उन्हाळा स्पेशल
नाचणी खूपच पौष्टीक असते. आणि उन्हाळ्यात आवर्जून खावी. नाचणी चे छान छान पदार्थ बनवले की सगळे जण आवडीने खातात. ही रेसिपी नाचणीच्या डोश्याची / घावनाची आहे. अगदी सोपी, लवकर होणारी आणि कमी साहित्य लागणारी. हा ब्रेकफास्ट साठी उत्तम पदार्थ आहे.
मी कधी कधी फक्त नाचणीच्या पिठाचे घावन करते तर कधी अर्ध तांदुळाचं पीठ घालते. दोन्ही प्रकार छान लागतात.
साहित्य (७–८ डोश्यांसाठी) (१ कप = २५० मिली )
नाचणी पीठ १ कप
दही पाव कप किंवा ताक अर्धा कप
ताजा खवलेला नारळ १/३ कप
ठेचलेली मिरची अर्धा टीस्पून
जिरं अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल/ तूप डोसे भाजताना लावायला
कृती
१. तेल/ तूप वगळून सर्व साहित्य एका वाडग्यात एकत्र करा. लागेल तसं पाणी घालून घावनासारखं पातळ पीठ भिजवा. गुठळ्या होऊ देऊ नका. १० मिनिटं झाकून ठेवा.
२. सपाट तवा खूप गरम करून काठ असलेल्या भांड्याने जरा उंचावरून हे पीठ गरम तव्यावर ओता. पीठ ओतताना भांडे गोल फिरवायचं म्हणजे छान पातळ आणि जाळीदार घावन बनतात. ह्या कृतीत एक जरी त्रुटी राहिली तर परफेक्ट घावन बनणार नाहीत. नवशिक्या माणसाला जरा प्रॅक्टिस करावी लागेल. पीठ तव्यावर घातल्यावर गॅस मध्यम करा. झाकण ठेवून घावन भाजा. २ मिनिटांनी झाकण काढून चेक करा. जर घावनावर ओलं पीठ दिसत असेल तर अजून थोडा वेळ झाकण ठेवून भाजा. नाकीतर घावनावर २ थेम्ब तेल/तूप परसावा आणि घावन परता. आता झाकण न ठेवता भाजा.
३. चविष्ट, जाळीदार नाचणी डोसे / घावन तयार. चटणी / लोण्यासोबत खायला द्या.
टीप
१. ह्यात तुम्ही पीठ भिजवताना चिरलेला कांदा, ठेचलेलं आलंही घालू शकता.
Your comments / feedback will help improve the recipes