Dudhi Muthiya (दुधी मुठिया) – Steamed Savory Bottle Gourd Cake

Dudhi Muthiya (दुधी मुठिया)

Dudhi Muthiya (दुधी मुठिया) – Steamed Savory Bottle Gourd Cake

दुधी मुठिया मराठी

This is a popular Gujarati snack made using Bottle Gourd. It is steamed and tempered; hence uses less oil. There are different recipes of Dudhi Muthiya. I use this recipe. It’s an easy one and makes very tasty Muthiya. This can be a good option for Tiffin.

Ingredients (Serves 6)

Grated Bottle Gourd (Dudhi / Lauki) 2 cups

Wheat flour 1.5 cups ( or more if required)

Fine Semolina 3 tablespoon

Ginger Chilly Paste 1.5 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Cumin Powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Crushed Fennel seeds (Saunf) ½ teaspoon

Lemon juice 1 teaspoon or Mango Powder ¼ teaspoon

Sugar 2 teaspoon

Chopped coriander 4 teaspoon

Baking Soda 2 pinch

Sesame seeds 1 teaspoon

Salt to taste

Oil 2 teaspoon

For Tempering

Oil 2 teaspoon

Mustard Seeds ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Asafoetida ¼ teaspoon

Sesame seeds 1 teaspoon

Curry Leaves 8-10

Instructions

1. Wash and grate Bottle gourd. For Muthiya, you need not peel the Bottle gourd. Grate it along with the peel. Grated bottle gourd turns dark if not used immediately. Add other ingredients immediately.

2. Add all the ingredients (save 2 teaspoons of chopped coriander for later use) from the above list except for the ones mentioned for tempering. Mix together into a soft dough. If dough is too soft, add more wheat flour.

3. Add water to the steamer and start heating the water.

4. Grease a steaming plate with oil; apply some oil to your hands and make cylindrical rolls of the dough of about 1.5 inch diameter.

5. Place the rolls on the plate. Once the water in steamer starts boiling, place the filled plate in the steamer and steam for 20 – 25 minutes.

6. Remove the plate from steamer and leave it to cool.

7. Cut the rolls into bite size pieces.

8. In a Wok, heat oil. Add mustard seeds. Wait for splutter. Add cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida. Add Sesame seeds. Immediately cover the wok and let the seeds splutter. Add curry leaves.

9. Add Muthiya pieces and gently mix. Cover the wok and cook for 3-4 minutes. Add remaining coriander. Mix.

10. Healthy and tasty Dudhi Muthiya is ready. Serve hot with choice of chutney or tomato sauce. It tastes good without any accompaniment as well.

Dudhi Muthiya
Dudhi Muthiya
      ====================================================================================

दुधी मुठिया

दुधी भोपळ्याचे  मुठिया हा एक लोकप्रिय गुजराती पदार्थ आहे. स्टार्टर, साईड डिश किंवा नाश्ता म्हणून खाल्ला जातो. मुलांच्या टिफिन साठी सुद्धा हा चांगला पदार्थ आहे. मुठिया बनवायच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. मी ही रेसिपी वापरून मुठिया बनवते. खूप छान, टेस्टी मुठिया बनतात. गार झाल्यावर सुद्धा दडदडीत होत नाहीत. हे मुठिये वाफवून फोडणी दिलेले असतात. त्यामुळे अजिबात तेलकट नसतातमी ह्यात दुधी सालीसकट किसून घालते त्यामुळे मुठिया जास्त पौष्टिक होतात.

मुलांना डब्यात देताना तुम्ही मुठिया आदल्या दिवशी रात्री वाफवून ठेवू शकता. सकाळी फक्त तुकडे करून फोडणी दिली की टिफिन तयार

साहित्य (६ जणांसाठी)

सालीसकट किसलेला दुधी भोपळा २ कप

कणिक अंदाजे दीड कप (जरूर पडल्यास आणखी थोडी)

बारीक रवा ३ टेबलस्पून

आलं हिरव्या मिरचीची पेस्ट दीड चमचा

हळद अर्धा चमचा

जिरेपूड अर्धा चमचा

धने पूड अर्धा चमचा

बडिशेपीची पूड अर्धा चमचा

लिंबाचा रस १ चमचा / आमचूर पाव चमचा

साखर २ चमचे (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

चिरलेली कोथिंबीर ४ चमचे

बेकिंग सोडा २ चिमूट

मीठ चवीनुसार

तेल २ चमचे

तीळ १ चमचा

फोडणीसाठी

तेल २ चमचे

मोहरी अर्धा चमचा

जिरं अर्धा चमचा

हिंग पाव चमचा

तीळ १ चमचा

कढीपत्ता ८१० पानं

कृती

. २ चमचे कोथिंबीर वेगळी काढून ठेवाएका पातेल्यात वर दिलेलं सर्व साहित्य (फोडणीचं साहित्य वगळून) एकत्र करा.

. मध्य्म घट्ट पीठ भिजवा. पीठ सैल असेल तर अजून कणिक घाला. पिठाचे मुटके करता येतील असं पीठ भिजवा.

. इडली पात्रात / मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा.

. इडली पात्रात / पातेल्यात ठेवायच्या ताटलीला तेल लावून घ्या.

. हाताला थोडं तेल लावून पिठाचे मुटके करा आणि ताटलीत ठेवा.

. पातेल्यातील पाण्याला उकळी आली की मुटक्यांची ताटली पातेल्यात ठेवावर झाकण ठेवून मध्यम आचेवर २०२५ मिनिटं मुटके वाफवून घ्या. मुटके शिजलेत का ते सुरी घालून चेक करा.

. ताटली बाहेर काढून मुटके गार होऊ द्या.

. मुटक्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करा.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा. फोडणीत तीळ घालून लगेच झाकण ठेवा म्हणजे तीळ सगळीकडे उडणार नाहीत. तीळ तडतडले की कढईत कढीपत्ता घाला.

आता मुटक्यांचे तुकडे घालून हलकेच ढवळा.

१०. झाकण ठेवून ३४ मिनिटं मंद आचेवर वाफ काढा. उरलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करा.

११. पौष्टिक आणि चविष्ट मुठिया  तयार आहे. चटणी / सॉस बरोबर खायला द्या. मुठिया असेच खायला ही छान लागतात

Dudhi Muthiya (दुधी मुठिया)
Dudhi Muthiya (दुधी मुठिया)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes