Mirchi Vada (मिरची वडा) – Fried Stuffed Chilies

Mirchi Vada (मिरची वडा)
Mirchi Vada (मिरची वडा)

Mirchi Vada (मिरची वडा) – Fried Stuffed Chilies

मिरची वडा मराठी

Mirchi Vada is a famous Rajastani snack. Thick chillies (Bhavnagari Chilies) that are less hot than normal chilies are used for this. Spicy potato filling is stuffed in chilies and they are deep fried after dipping them in gram flour batter. It’s a very tasty snack.

Ingredients

Thick (Bhavnagari) Chilies 8-10

Boiled Potatoes 6 medium size

Turmeric Powder ½ teaspoon

Red chilly powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Cumin Powder ½ teaspoon

Dry Mango Powder ½ teaspoon

Chopped coriander 1 teaspoon

Oil 2 teaspoon + for deep frying

Salt to taste

For Cover

Gram flour 6 tablespoon

Rice flour 2 tablespoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Chili Powder ¼ teaspoon

Asafoetida 2 pinch

Carom seeds ¼ teaspoon

Salt to taste

Instructions

1. Wash and dry chilies. Do not remove the stem. Give a lengthwise slit to each chili only on one side. Gently remove the seeds and strings. Use hand gloves if possible; else your palms will burn for some time.

2. Peel boiled potatoes and mash them.

3. In a pan heat 2 teaspoon of oil. Add turmeric powder.

4. Add Mashed potatoes, chili powder, coriander powder, cumin powder, mango powder, salt and mix.

5. Add chopped coriander. Mix and transfer to a plate. Leave it to cool.

6. Stuff potato mixtures in each chilly and press it gently to fill the chili completely.

7. Prepare all chilies this way.

Potato filling and stuffed chilies ready for frying

8. For cover, mix all ingredients in a bowl. Add water and make a thick batter of dropping consistency.

9. Heat oil in a wok.

10. Add 2 teaspoon of hot oil in the batter prepared for cover and mix.

11. Dip each stuffed chili in the batter and gently slide it in the oil.

12. Deep fry on medium heat till chilies are light brown.

13. Mirchi Vada is ready. Serve hot with sauce.

Note

I never add baking soda in Pakoda batter. 1-2 teaspoons of hot oil added to batter is enough to make crispy Pakoda.

Mirchi Vada (मिरची वडा)
Mirchi Vada (मिरची वडा)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मिरची वडा पावसाळा स्पेशल

ह्या राजस्थानी पदार्थामध्ये भावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे दिवस आहेतच . बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात.

साहित्य

भावनगरी मिरच्या ८१०

उकडलेले बटाटे ६७ मध्यम

लाल तिखट अर्धा टीस्पून

जिरे पूड अर्धा टीस्पून

धने पूड अर्धा टीस्पून

हळद  अर्धा टीस्पून

आमचूर  अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

मीठ चवीनुसार

तेल २ टीस्पून आणि तळण्याकरता

बाहेरील आवरणासाठी

बेसन ६ टेबलस्पून

तांदूळ पीठ २ टेबलस्पून
लाल तिखट पाव  टीस्पून

हळद  पाव  टीस्पून

ओवा पाव  टीस्पून

हिंग २ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. मिरच्या धुवून पुसून घ्या. देठं काढू नका. प्रत्येक मिरचीला एका बाजूने उभी चीर द्या. पूर्ण कापू नका.

. हलक्या हाताने मिरचीच्या शीरा आणि बिया काढून टाका. हे करताना शक्यतो हातात ग्लोव्हज किंवा प्लास्टिक पिशवी घाला. नाहीतर नंतर हाताची आग होईल.

. बटाटे साले काढून कुस्करून घ्या

. एका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात हळद घाला.

. बटाट्याचा कुस्करा, लाल तिखट, धने, जिरे पूड, आमचूर, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा. चांगले मिक्स झाले की मिश्रण एका ताटलीत काढून गार करायला ठेवा.

. हे मिश्रण प्रत्येक मिरचीमध्ये भरा. मिरची तुटू देऊ नका

Mirchi Vada (मिरची वडा)
Potato filling and stuffed chilies ready for frying (बटाट्याचं सारण आणि भरलेल्या मिरच्या)

. बाहेरील आवरणासाठी वाडग्यात बेसन आणि बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. पाणी घालून सरबरीत (दाटसर) पीठ भिजवून घ्या. नेहमीच्या भज्यांच्या पिठापेक्षा दाट हवे.

. एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. २ चमचे कडकडीत तेल बेसनाच्या पिठात घालून मिक्स करा.

. आता मिरची ह्या बेसनाच्या पिठात बुडवून तेलात सोडा. आणि खमंग तळून घ्या.

१०. गरमागरम मिरची वडा वर चाट मसाला भुरभुरवून खायला द्या.

Mirchi Vada (मिरची वडा)
Mirchi Vada (मिरची वडा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes