Kairicha Kayras / Methamba (कैरीचा कायरस – मेथांबा – कैरीचं गोड लोणचं) – Raw Mango Sweet n Sour Pickle

Raw Mango Sweet n Sour Pickle (कैरीचं गोड लोणचं)
Raw Mango Sweet n Sour Pickle (कैरीचं गोड लोणचं)

Kairicha Kayras / Methamba (कैरीचा कायरस – मेथांबा कैरीचं गोड लोणचं) – Raw Mango Sweet n Sour Pickle

कैरीचा कायरस – मेथांबा कैरीचं गोड लोणचं मराठी

Kayras (कायरस)/ Methamba (मेथांबा) is a Maharashtrian sweet and sour pickle. It is made using different ingredients like Kairi (Raw Mango), Guava, Cucumber etc. For sweetness, Jaggery is used and for sourness, tamarind. For Raw Mango Kayras, we don’t need tamarind. Raw Mango Kayras is very tasty. The recipe is very easy and needs very few ingredients.

In Goa, this is called Raw Mango Sweet Pickle. The only difference in the recipe is, Green Chilies are used instead of Red Chilies and Red Chili Powder.

Ingredients (1 cup = 250 ml)

Raw Mango pieces 1.5 cups

Crushed Jaggery 1.5 cups (more if required)

Red Chilies 2

Red chilly Powder ½ teaspoon

Oil 1 tablespoon

Mustard seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Fenugreek seeds ½ teaspoon

Asafoetida 2-3 pinch

Salt to taste

Instructions

1. Wash and peel Raw Mango. Chop into medium size pieces.

2. In a pan, heat oil. Add mustard seeds. Wait till splutter. Add turmeric powder, Asafoetida, Fenugreek seeds and slit red chilies.

3. Add Raw mango pieces. Mix.

4. Cook covered on low flame till mango pieces are little soft.

5. Add water just enough to cover mango pieces. Bring to boil.

6. Add Crushed Jaggery, Chili powder and Salt.

7. Cook till Mango is soft and Jaggery melts. If you want more juice, add more water. Kayras will thicken upon cooling, Adjust the taste by adding more Jaggery if required. Amount of Jaggery depends on the sourness of mangoes.

8. You can serve Kayras with Roti / Chapati / Thepla / Paratha.

9. Store Kayras in refrigerator.

Kairicha Kayras
Raw Mango Sweet n Sour Pickle (कैरीचं गोड लोणचं)
Raw Mango Sweet n Sour Pickle (कैरीचं गोड लोणचं)

 

 

===================================================================================

कैरीचा कायरस मेथांबा कैरीचं गोड लोणचं

कायरस / मेथांबा म्हणजे आंबट गोड लोणचं. हे कैरी, पेरू, आवळा, काकडी कशाचंही बनवू शकतो. ह्यात गोड चवीसाठी गूळ घालतात आणि आंबटपणासाठी चिंच. कैरी, आवळ्याच्या मेथांब्यामध्ये चिंच लागत नाही. चविष्ट तोंडीलावण्याची ही अगदी सोपी रेसिपी आहे.

गोव्यात कैरीच्या मेथांब्याला गोड लोणचं म्हणतात. फक्त लाल तिखट आणि लाल मिरच्यांऐवजी हिरव्या मिरच्या घालतात. बाकी कृती तीच आहे

साहित्य (१ कप = २५० मिली )

कैरीचे तुकडे दीड कप

चिरलेला गूळ दीड कप (कैरीच्या आंबटपणानुसार नुसार कमी / जास्त करा

लाल मिरच्या २

लाल तिखट अर्धा टीस्पून

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

हळद पाव टीस्पून

मेथीदाणे अर्धा टीस्पून

हिंग २३ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. कैरी धुवून सालं काढून टाका आणि कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे करा.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात मेथीदाणे

आणि लाल मिरच्या उभी चीर देऊन घाला.  

. कैरीचे तुकडे घाला. झाकण ठेवून पाणी न घालता मंद आचेवर वाफ काढा. कैरी जरा मऊ होऊ द्या.

. आता कैरीचे तुकडे बुडतील एवढं पाणी घाला आणि उकळी काढा.   

. गूळ, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.

. कैरी शिजेपर्यंत मिश्रण शिजवा. तुम्हाला रस जास्त हवा असेल तर आणखी पाणी घालून उकळा. कायरस / मेथांबा गार झाल्यावर दाट होतो. चव बघून हवा असेल तर गूळ घाला. कैरी जास्त आंबट असेल तर जास्त गूळ लागतो. मिश्रण छान उकळून गॅस बंद करा.

. चविष्ट कायरस / मेथांबा तयार आहे. ठेपला, पराठा, पोळीसोबत छान लागतो.

. कायरस / मेथांबा फ्रिज मध्ये ठेवा.

Raw Mango Sweet n Sour Pickle (कैरीचं गोड लोणचं)
Raw Mango Sweet n Sour Pickle (कैरीचं गोड लोणचं)
Kairicha Kayras / Methamba (कैरीचा कायरस – मेथांबा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes