Kadhipatta Chutney (कढीपत्त्याची चटणी) – Curry Leaves Chutney
Kadhipatta (Curry Leaves) are natural flavouring agents with a number of important health benefits. They contain various antioxidant properties and are rich source of minerals and vitamins. Most people throw away kadhipatta that are added to Dal / curries. One better option to add kadhipatta in any preparation is to chop it in small pieces / make a powder before adding. Other option is to have this tasty chutney daily in place of having pickle. This chutney is easy to make and lasts for 2-3 weeks without refrigeration. Try it out. I’m sure you will like it.
Ingredients (1 cup = 250 ml)
Curry Leaves (Kadhipatta) 1.5 cup
Grated Dried Coconut (Khobra) 1 cup
Sesame seeds (White / Black / Khurasni Til) ¾ cup
Garlic cloves ¼ cup
Red chilly powder 1.5 teaspoon
Jaggery crushed 1 teaspoon (optional)
Tamarind (Chinch) dry pulp 1 teaspoon or Mango Powder ½ teaspoon
Oil ½ teaspoon
Salt to taste
Instructions
1. Wash and pat dry the curry leaves (kadhipatta).
2. In a pan roast kadhipatta on low flame along with oil till they are crisp. Keep sautéing continuously.
3. On cooling grind into a powder.
4. Dry roast the grated Dried Coconut on low flame till it is light brown.
5. On cooling grind into a coarse powder.
6. Dry roast Sesame Seeds on low flame till they start sputtering.
7. On cooling grind Sesame seeds into a coarse power. Don’t over grind else it will become oily. You have to use pulse mode of the grinder while grinding sesame seeds.
8. Crush/ Pound garlic cloves separately into a smooth paste.
9. Add salt, red chilly powder, jaggery and Tamarind / Mango Powder and mix well.
10. Add sesame seed powder, kadhipatta powder, coconut powder to garlic mixture, pulse it in the grinder for 1-2 minutes to form a uniform mixture.
11. Tasty and healthy Kadhipatta Chutney is ready. Serve it with Roti / Chilla / Ghavan / Aamboli or Rice. Practically you can serve it with anything. Curd rice with this chutney is an awesome combination.
This chutney lasts for 2 to 3 weeks without refrigeration in an air-tight container.
Note
1. You can add flax seeds to this chutney. Reduce the measure of Sesame Seeds to half and add flax seeds. Roast flax seeds and grind them.
2. Texture of the Chutney depends on the type of Sesame Seeds you use. If you add Alsi / Javas / Flax Seeds, texture will be different.
===================================================================================
कढीपत्त्याची चटणी
आपल्या सगळ्यांना कढीपत्त्याचा वास आवडतो. पण भाजीत / आमटीत घातलेला कढीपत्ता किती जण खातात!! बहुतेक सगळे ती पानं टाकूनच देतात. कढीपत्त्यात पौष्टिक तत्वे असतात. मी भाजी / आमटीत कढीपत्ता घालताना त्याचे बारीक तुकडे करून घालते. मग ती पाने जरा तरी खाल्ली जातात. दुसरा एक पर्याय म्हणजे कढीपत्त्याची चटणी बनवणे. ही चटणी खूप चविष्ट लागते आणि २–३ आठवडे टिकते. अगदी सोपी रेसिपी आहे. सर्वांना आवडेल.
साहित्य (१ कप = २५० मिली )
कढीपत्त्याची पानं दीड कप
किसलेलं सुकं खोबरं १ कप
तीळ (पांढरे/ काळे / कारळे ) पाऊण कप
लसूण पाव कप
लाल तिखट दीड टीस्पून
चिरलेला गूळ १ टीस्पून (आवडत असेल तर )
चिंच १ चमचा / आमचूर अर्धा टीस्पून
तेल अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. कढीपत्त्याची पानं धुवून कोरडी करून घ्या. कढईत अर्धा टीस्पून तेल घालून ही पानं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. ताटलीत पसरून गार करा.
२. सुकं खोबरं आणि तीळ वेगवेगळे खमंग भाजून घ्या आणि गार करा.
३. कढीपत्ता, खोबरं आणि तीळ मिक्सर मध्ये वेगवेगळे वाटून घ्या. तीळ जरा जाडसर ठेवा.
४. लसूण कुटून / मिक्सर मध्ये बारीक घ्या. त्यात चिंच / आमचूर, तिखट, मीठ, गूळ घालून मिक्स करा.
५. कढीपत्त्याची पूड, खोबरं व तिळाची पूड घालून एकत्र करा. मिक्सर मध्ये अर्धा मिनिट पल्स मोड वर फिरवा.
६. खमंग, चविष्ट कढीपत्त्याची चटणी तयार आहे. कशाही सोबत छान लागते.
टीप
१. ह्या चटणीत अळशी / जवस / Flax Seeds ही घालू शकता. तिळाचं माप अर्ध करून अर्धे माप अळशी / जवस खमंग भाजून कुटून घाला.
२. चटणीचं टेक्सचर तुम्ही कोणते तीळ घालता त्यानुसार बदलतं. अळशी / जवस घातलं तर अजून वेगळं टेक्सचर येतं.
नमस्कार.मी ही चटणी करू पाहिली. खूप चविष्ट झाली. आपल्या सर्वच पाककृती सोप्या शब्दात आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थापासून करता येतात.मला नेहमीच आवडतात.धन्यवाद.
अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार.\nSudha