Rava Idli (Instant) – रवा इडली (इन्स्टंट) – Semolina Steamed Cake – No fermentation required
This Instant Rava Idli recipe does not require any fermentation. It makes soft, fluffy and tasty Idlis. This can be a quick breakfast / snack option.
Ingredients (For 24-25 Idlis) (1 cup = 250 ml)
Fine Semolina 1.5 cups
Yogurt / Curd 3 tablespoons
Fresh Coriander chopped 1 teaspoon
Chili paste 1 teaspoon
Fruit Salt (Use Plain non flavored) 1.5 teaspoon
Salt to taste
For Tempering
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Asafoetida (Hing) a pinch
Ginger grated / Crushed 1 teaspoon
Curry leaves 7-8 chopped
Cashew nuts 8-10 chopped
Split Black Gram (Urad Daal) ½ teaspoon
Instructions
1. Mix Semolina and curd and keep it for 15 minutes; add water if required to make a thick batter.
2. Heat Oil in a ladle on medium flame
3. Add mustard seeds, wait till it splutters.
4. Add Split Black Gram; wait till it is light brown.
5. Add ginger and mix well.
6. Add curry leaves, Asafoetida and cashew pieces; switch off the flame. Leave it to cool a bit.
8. Meantime add Chopped coriander, salt and chili paste to Semolina batter and mix.
9. Add Tempering to Semolina batter and mix well; add water if required. Consistency should be of Idli batter / Pan Cake Batter
10. Fill required water in Idli steamer and start heating the water.
11. Grease idli stand with oil.
12. Add Fruit Salt to Idli batter, add a spoonful of water and mix well. Do no Overmix.
13. Pour big spoonful of batter in each idli mould and keep the stand in cooker when the water starts boiling .
14. Steam for 20-25 minutes till Idlis are cooked properly. Pierced knife should come out clean.
15. Serve hot idlis with Chutney / Sambar of your choice.
Note
1. Do not soak Semolina for long. Idlis won’t be fluffy
2. After adding Fruit Salt, immediately mix the batter, pour it in moulds and put it for steaming. If there is a delay in this process, Idlis won’t be soft and fluffy.
3. If you can’t steam all the idlis in one batch, then take out required batter in a bowl, mix Fruit Salt and steam idlis. Once this is done, mix Fruit Salt for second batch and steam idlis.
================================================================================================
रवा इडली (इन्स्टंट) – वाटणं नको; पीठ आंबवणं नको
ह्या रवा इडली रेसिपी ला पीठ आंबवायला लागत नाही. झटपट लुसलुशीत, चविष्ट इडल्या बनतात. न्याहरी / नाश्त्यासाठी बनवायला खूप छान पदार्थ आहे.
नेहमीप्रमाणे माझ्या टिप्स :
१. रवा फार वेळ भिजवून ठेवू नका. नाहीतर इडल्या नरम होतील पण हलक्या होणार नाहीत.
२. इडली पात्रातलं पाणी उकळू लागलं की रव्याच्या मिश्रणात इनो घाला. मिश्रण लगेच ढवळून इडलीच्या साच्यात घालून साचा इडली पात्रात ठेवा. ह्यात उशीर झाला तर इडल्या फुलणार नाहीत.
३. सगळं पीठ जर एका साच्यात जात नसेल तर साच्यात मावेल एवढं पीठ दुसऱ्या पातेल्यात काढून त्यात इनो घालून इडल्या करून घ्या. तो घाणा झाल्यावर उरलेल्या पिठात इनो घालून इडल्या वाफवा. इनो घातल्यावर पीठ लगेच वाफवलं नाही तर इडल्या फुलत नाहीत.
साहित्य (२०–२५ इडल्यांसाठी) (१ कप = २५० मिली )
बारीक रवा दीड कप
दही ३ टेबलस्पून
ठेचलेली मिरची १ टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून
फ्रुट सॉल्ट दीड टीस्पून (इनो – प्लेन वापरा / कुठच्याही फ्लेवर चं नको )
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
हिंग १ चिमूट
ठेचलेलं आलं १ टीस्पून
कढीपत्ता ७–८ पानं बारीक चिरून
काजू ८–१० बारीक चिरून
उडीद डाळ अर्धा टीस्पून
कृती
१. रवा आणि दही एकत्र करून जाडसर पीठ भिजवा. फार घट्ट असेल तर थोडं पाणी घाला. १५ मिनिटं झाकून ठेवा.
२. तेल गरम करून त्यात वर लिहिलेलं फोडणीचं साहित्य घालून खमंग फोडणी करा. गॅस बंद करून जरा थंड करा.
३. भिजवलेल्या रव्यात मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून ढवळून घ्या.
४. तयार फोडणी रव्याच्या मिश्रणात घालून ढवळून घ्या.
५. इडली पात्रात पाणी भरून गरम करायला ठेवा. आणि इडली च्या साच्याला तेल लावून घ्या.
६. रव्याच्या मिश्रणात फ्रुट सॉल्ट घालून मिक्स करा. जास्त वेळ ढवळू नका.
७. एक–एक मोठा चमचा मिश्रण इडलीच्या साच्यात घाला. साचा भरला की लगेच इडली पात्रात ठेवून झाकण लावून २०–२५ मिनिटं वाफवून घ्या.
८. इडली शिजली का ते सुरी / फोर्क घालून बघा. शिजली नसेल तर अजून थोडा वेळ वाफवा.
९. गरमागरम इडल्या चटणी / सांबार सोबत सर्व्ह करा.
टिप्स
१. रवा फार वेळ भिजवून ठेवू नका. नाहीतर इडल्या नरम होतील पण हलक्या होणार नाहीत.
२. इडली पात्रातलं पाणी उकळू लागलं की रव्याच्या मिश्रणात इनो घाला. मिश्रण लगेच ढवळून इडलीच्या साच्यात घालून साचा इडली पात्रात ठेवा. ह्यात उशीर झाला तर इडल्या फुलणार नाहीत.
३. सगळं पीठ जर एका साच्यात जात नसेल तर साच्यात मावेल एवढं पीठ दुसऱ्या पातेल्यात काढून त्यात इनो घालून इडल्या करून घ्या. तो घाणा झाल्यावर उरलेल्या पिठात इनो घालून इडल्या वाफवा. इनो घातल्यावर पीठ लगेच वाफवलं नाही तर इडल्या फुलत नाहीत.
Your comments / feedback will help improve the recipes