Aamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस) – Rice and Black Gram Pan Cake served with sweet coconut milk

Aamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)

Aamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस) – Rice and Black Gram Pan Cake served with sweet coconut milk

आंबोळी आणि नारळाचा रस मराठी

Aamboli with sweet coconut milk is a delicacy from Southern Konkan. Aamboli is like Uttapam. Served with Jaggery mixed coconut milk makes it a delicious combination.

If you don’t like coconut milk, you can have Aamboli with Chutney or your choice.

Ingredients (Serves 4 as a part of meal) (1 cup = 250 ml)

Split Black Gram (Urad Daal) 1 cup

Raw Rice 3 cups

Fenugreek (Methi) seeds 2 tablespoons

Poha (Flattened rice) 2 tablespoons

Oil for greasing

Fresh scraped Coconut 3 cup

Jaggery 2/3 cup crushed (adjust as per taste)

Cardamom Powder ¼ teaspoon

Salt to taste

Instructions

Prepare “Aamboli”

1. Wash split black gram (Urad Daal) and rice separately. Note that Urad Dal should not be old. Batter won’t ferment if Daal is old.

2. Add fenugreek (methi) seeds and poha to rice.

3. Soak Urad Daal separately and rice + fenugreek seeds + poha together in water for 8 hours.

4. Grind separately to form coarse batter – consistency of pan cake batter. While grinding Urad Daal add cold water.

5. Mix both the doughs and leave for 8 hours.

6. Add salt and mix well, the batter consistency should be like pancake batter.

7. Heat a non stick Griddle on low flame.

8. Sprinkle water on the heated Griddle, wipe with cotton cloth before spreading the batter.

9. Pour 1.5 ladleful of batter on Griddle; spread the batter (aamboli) like a pan cake (thinner than uttapam)

10. Cover the Aamboli with a lid.

11. Sprinkle a few drops of oil / ghee on Aamboli

12. Flip Aamboli and let it cook on the other side. Cooked Aamboli is light brown.

Prepare “Ras”

1. Grind the grated coconut in a grinder.

2. Squeeze the coconut milk out of the ground coconut.

3. Add jaggery, stir it till it dissolves in the coconut milk.

4. Add ½ teaspoon salt and cardamom powder.

5. Mix well.

Serve Aamboli with “Ras”. While eating soak pieces of Aamboli in Ras for 1-2minutes and then enjoy this delicious delicacy.

Note

“Ras” should be consumed within 3 to 4 hours.

Aamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)
Aamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)

====================================================================================

आंबोळी आणि नारळाचा रस

हा तळ कोकणातला खास पदार्थ आहे. आंबोळी ही उत्तप्पा सारखी असते पण जरा पातळ. ही आंबोळी नारळाच्या गोड रसात बुडवून खातात. लहानपणी आम्ही कोकणात जायचो तेव्हा एकदा तरी आंबोळी चा बेत असायचाच.

नारळाचा रस आवडत नसेल तर आंबोळी चटणी बरोबर ही खाऊ शकता.

साहित्य (४ जणांसाठी जेवण म्हणून) (१ कप = २५० मिली )

उडीद डाळ १ कप

तांदूळ ३ कप

मेथी दाणे २ मोठे चमचे

पोहे २ मोठे चमचे

तेल आंबोळ्या बनवताना तव्यावर लावण्यासाठी

मीठ चवीनुसार 

नारळाच्या रसासाठी

ताजा खवलेला नारळ ३ कप

चिरलेला गूळ २/३ कप (चवीनुसार कमी / जास्त करा)

वेलची पूड पाव चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. आंबोळीचं पीठ बनवण्यासाठी उडीद डाळ धुवून पाणी घालून भिजत ठेवा. दुसऱ्या पातेल्यात  तांदूळ धुवून त्यात पाणी घाला. तांदुळाच्या  पातेल्यात मेथी दाणे आणि पोहे घाला. डाळ व तांदूळ ८ तास भिजवा. उडीद डाळ जुनी नसावी. जुनी असेल तर पीठ आंबत नाही.

. ८ तासानंतर डाळ आणि तांदुळाचं पाणी उसपून घ्या.

. मिक्सर मध्ये डाळ वेगळी वाटा. डाळ वाटताना फ्रिज चं थंड पाणी घाला. डाळ वाटताना फार गरम झाली तर पीठ आंबत नाही.

. तांदूळ, मेथी, पोहे एकत्र वाटून घ्या. ह्यात साधं पाणी घालापीठ फार पातळ करू नका कारण आंबल्यावर पीठ थोडं पातळ होतं.

. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करून जड झाकण ठेवून झाकून ठेवा. थंड हवामानात बंद कपाटात / ओव्हन मध्ये ओव्हन चालू न करताना ठेवा. ८ तासात पीठ छान आंबेल.

. पीठ मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करा.

. रसासाठी मिक्सर मध्ये नारळाचा रस काढून घ्या. त्यात गूळ घालून विरघळवून घ्या. मीठ, वेलची पूड घाला. नारळाचा रस तयार आहे.

. आंबोळीसाठी तवा गरम करून घ्या. गॅस बारीक करून तव्यावर पाणी शिंपडून कपड्याने पुसून घ्या. दीड मोठा चमचा पीठ तव्यावर घालून नीट पसरा. उत्तप्प्यापेक्षा पातळ पसरा.

. झाकण ठेवून एक दीड मिनिटं भाजा. आता आंबोळी परतून घ्या. आंबोळीवर थोडं तेल सोडा. दोन्ही बाजू छान भाजल्या की गरमागरम सर्व्ह करा.

१०. आंबोळी खाताना आंबोळीचे तुकडे रसात १ मिनिट बुडवून ठेवायचे आणि नंतर रससकट तुकडा तोंडात टाकायचा. अतिशय स्वादिष्ट असा हा पदार्थ मन लावून खायचा.

टीप

नारळाचा रस ३४ तासात संपवावा लागतो

Aamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)
Aamboli with Ras (आंबोळी आणि नारळाचा रस)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes