Crunchy Nachani Kanik Laadoo (खुसखुशीत नाचणी कणिक लाडू) – Crunchy Finger Millet and Wheat Flour Laddu
खुसखुशीत नाचणी कणिक लाडू मराठी
Nachani (Ragi / Finger Millet) is very nutritious but Nachani Laddus are not as popular as Besan Laddu. Since Nachani flour is not sticky, it needs more Ghee for binding When you make Laddus using only Nachani flour. Hence I add Wheat Flour along with Nachani flour. Laddus are delicious and require less Ghee than Nachani Laddus. I add fried Poha (Flattened Rice) also. That enhances the taste and it makes the laddus Crunchy.
Ingredients (Makes 20-25 laddus) (1 cup = 250 ml)
Nachani Flour (Ragi / Finger Millet Flour) 2 cups
Wheat Flour 1 cups
Grated Dry Coconut ½ cup
Thick Poha (Thick Flattened Rice) ½ cup
Desi Ghee (Clarified Butter) About 1 cup
Powdered Sugar 1.25 cup
Crushed Jaggery 1 cup
Cardamom Powder ½ teaspoon
Almonds /Cashews 20-25 cut into pieces
Milk 1 tablespoon
Instructions
1. Dry roast grated dry coconut till light brown. Keep it aside.
2. Add 1.5 tablespoon of Ghee to a Ladle and fry Poha till it puffs. It does not take long for Poha to fry. So be watchful and fry on low flame. A special type of strainer is available for frying Poha. It is called पोहे तळणी in Marathi. If you use that, Poha can be fried easily.
3. Fry dry fruit pieces in the same Ghee and keep it aside.
4. Transfer this Ghee to a thick bottom pan. Add ½ cup Ghee and Nachani flour. Roast it on low flame till you get nice aroma of roasted flour. Keep stirring all the time; else it will burn. Initially flour will be thick and difficult to roast; after about 8-10 minutes it will be soft and will become easy to roast. It takes 15-18 minutes to roast.
5. Now remove the pan from gas. Immediately add 1 tablespoon of milk. You will see lot of bubbles. Keep stirring. Now the mixture will be thick.
6. Transfer it to a bowl and Leave it to cool.
7. In the same pan, add remaining Ghee and Wheat Flour and roast on low flame till the colour of wheat flour changes and you get nice aroma of roasted flour. Transfer the flour to the same of bowl of Nachani Flour.
8. Melt Jaggery on low flame and add it to roasted flour. Mix.
9. When mixture is warm, add roasted dry coconut, fried Poha, sugar and mix well. (Do not crush Poha and Dry coconut). Add Cardamom powder, dry fruits of your choice and mix.
10. Roll Laadoos while mixture is warm.
11. Sometimes the mixture gets very dry and it is not possible to roll laadoos. If this happens, heat the mixture a bit and then roll laadoos. If you are still not able to roll laadoos, add some more ghee (1-2 tablespoon at a time) to the mixture and then roll laadoos.
Enjoy delicious Nachani Kanik laadoos. These laadoos last for 2 weeks without refrigeration.
==================================================================================
खुसखुशीत नाचणी कणिक लाडू – उन्हाळ्यासाठी खास
नाचणी खूप पौष्टिक असते. कारण माहित नाही पण नाचणीचे लाडू बेसनाच्या लाडवांसारखे लोकप्रिय नाहीत. नाचणीच्या पिठाला चिकटपणा नसतो. त्यामुळे फक्त नाचणीच्या पिठाचे लाडू करताना जरा जास्त तूप घालावं लागतं. म्हणून मी नाचणीबरोबर कणिकही घालते. कणिक घातल्यामुळे चिकटपणा येतो आणि तूप कमी लागतं. मी या लाडवांमध्ये सुकं खोबरं भाजून आणि जाड पोहे तळून घालते. त्यामुळे चव अप्रतिम लागते आणि मधे मधे तोंडात येणारे कुरकुरीत पोहे खायला छान लागतात.
साहित्य (२०–२५ लाडू होतील) (१ कप = २५० मिली )
नाचणी पीठ २ कप
कणिक १ कप
जाडे पोहे अर्धा कप
किसलेले खोबरं अर्धा कप
पिठीसाखर सव्वा कप
गूळ १ कप
तूप १ कप अंदाजे
दूध १ टेबलस्पून
बदामाचे काप आवडीनुसार
वेलची पूड अर्धा टीस्पून
कृती
१. खोबरं भाजून घ्या .
२. कढईत दीड मोठा चमचा तूप घालून पोहे तळणी वापरून पोहे तळून घ्या. पोहे तळणी नसेल तर झारा वापरून तळा.
३. त्याच तुपात बदामाचे काप ही तळून घ्या .
४. नंतर अर्धा कप तूप घालून त्यात नाचणी च पीठ खमंग भाजून घ्या .
५. भाजल्यावर गॅस बंद करून पिठात थोडेसे दूध शिंपडून लगेच ढवळून फुलवून घ्या. खूप बुडबुडे येतील. आणखी ढवळलं की बुडबुडे यायचे बंद होतील. तेव्हा पीठ दुसऱ्या पातेल्यात काढून घ्या.
६. कढईत उरलेलं तूप घालून कणिक खमंग भाजून घ्या. कणिक नाचणीच्या पिठाच्या पातेल्यात घाला.
७. पीठ भाजलेल्या कढईत गूळ वितळवून घ्या आणि पिठात घालून मिक्स करा.
८. पीठ कोमट झाल्यावर पिठीसाखर, पोहे, खोबरं, बदामाचे काप आणि वेलची पूड घालून मिक्स करा. (पोहे आणि खोबरं न कुस्करता घाला ) आणि कोमट असतानाच लाडू वळून घ्या. गार झाल्यावर मिश्रण सुकते आणि लाडू वळले जात नाहीत.
९. छान खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक नाचणी कणिक लाडू तयार.
१०. हे लाडू २ आठवडे टिकतात.
टीप
१. नाचणीचं पीठ जाड असेल तर तूप जास्त लागू शकते.
२. लाडू वळले जात नसतील तर मिश्रण जरा गरम करून लाडू वळून बघा. तरीही लाडू वळले जात नसतील तर थोडं थोडं ( १–१ चमचा) तूप घालून मिश्रण मिक्स करा आणि लाडू वळा. एका वेळी जास्त तूप घालू नका.
३. हे लाडू पूर्ण गुळाचे ही बनवू शकता. पण जर गूळ चिकट असेल तर लाडू कडक होतात. गूळ आणि साखर एकत्र घालून लाडू कडक होत नाहीत.
असे लाडू आज केले फक्त पूर्ण पिठी साखर घालून केले. अतिशय सुरेख झालेत. पोह्यांचा क्रिस्पिनेस सुरेखच. धन्यवाद छान छान रेसिपी शेअर करता तुम्ही
लाडू छान झाले हे वाचून आनंद झाला.
खूपच छान पद्धतीने तुम्ही नाचणीची रेसिपी सांगितली धन्यवाद
लाडू केलेत की अभिप्राय जरूर कळवा. \nSudha
Me karun pahile hey laddu, khup chan zale. Saglyana avdle\r\nThank you
Thank you for the feedback.\nSudha