Khavyachi Poli (खव्याची पोळी) – Sweet Roti with a Filling of Milk Solids
This is a Maharashtrian Specialty. It’s Delicious sweet roti with a filling of Khava / Khoya / Mava (Milk Solids) mixed with sugar. Process is little lengthy. But the taste is unbeatable.
Ingredients (Makes 15-16 Poli)
Khava / Khoya / Mava / Milk Solids 500 grams
Poppy Seeds (Khuskhus ) 3 tablespoons
Powdered Sugar 2 cups (Adjust as per taste)
Cardamom Powder ¼ teaspoon
Wheat Flour 2 cups + 4 tablespoons
Oil 1 teaspoon
Rice Flour for dusting
Salt ¼ teaspoon
Instructions
Prepare Dough
1. Mix 2 cups of wheat flour, salt, 1 teaspoon oil. Using water bind a medium stiff dough.
Prepare Filling
1. Roast poppy seeds till light brown.
2. Grind after cooling.
3. Loosen Khava / Mava and Roast it on low flame for 5 minutes. Transfer it to a plate and leave it to cool.
4. Upon cooling, add ground poppy seeds, powdered sugar and 2 tablespoons of wheat flour and knead the mixture together. If the mixture is very soft add 2 more tablespoon of wheat flour and knead a medium consistency mixture. It should be like a dough ball. Wheat flour is used for binding the mixture.
5. Add cardamom powder and mix it. Filling is ready.
Make Khavyachi Poli
1. Take two 1 inch diameter round balls of dough, roll them individually, into 3 inch diameter circles (like Puri).
2. Take 2 inch diameter round ball of filling, flatten it and place between the 2 dough circles above.
3. Seal the edges, gently roll into a 7 – 8 inch diameter circular roti. Use rice flour for dusting.
4. Trim the edges.
5. Dry roast roti on a griddle, till light brown on both sides.
6. Cool to room temperature.
Serve this yummy Khavyachi Poli with generous helping of home made ghee (clarified butter).
Khavyachi Poli lasts for 2-3 days at room temperature. Do not store it in refrigerator.
Note
Instead of wheat flour you can use Semolina and all purpose flour (half-half) for the cover.
=================================================================================
खव्याची पोळी
खवा / मावा आणि पिठीसाखरेचं सारण घालून बनवलेल्या ह्या पोळ्या अतिशय स्वादिष्ट लागतात. थोडं वेळखाऊ काम आहे पण पोळ्यांची चव फारच छान असते.
साहित्य (१५–१६ पोळ्यांसाठी)
खवा / मावा अर्धा किलो
पिठीसाखर २ कप (चवीप्रमाणे कमी/जास्त करा)
खसखस ३ मोठे चमचे
वेलची पूड पाव चमचा
कणिक २ कप + ४ मोठे चमचे
तेल १ चमचा
मीठ पाव चमचा
तांदुळाचं पीठ पोळ्या करताना लावायला
कृती
बाहेरील आवरणासाठी
१. २ कप कणिक, तेल, मीठ घालून पीठ भिजवून घ्या. फार सैल नको आणि फार घट्ट ही नको.
सारण बनवण्यासाठी
१. खसखस मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
२. खवा मोकळा करून मंद आचेवर ५ मिनिटं भाजून घ्या. परातीत काढून गार करा.
३. खव्यामध्ये खसखशीची पूड, पिठीसाखर आणि २ चमचे कणिक घालून मळून घ्या. मिश्रण फार सैल असेल तर आणखी २ चमचे कणिक घाला आणि मळून घ्या. सारणाचा गोळा झाला पाहिजे.
४. वेलची पूड घालून मिक्स करा. सारण तयार आहे.
खव्याची पोळी बनवण्यासाठी
१. पिठाचे २ छोटे गोळे घेऊन २ पुऱ्या लाटून घ्या.
२. पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट सारणाचा गोळा घेऊन तो एका पुरीवर पसरावा. त्यावर दुसरी पुरी ठेवा आणि कडा बंद करा.
३. हलक्या हाताने पोळी लाटून घ्या.
४. कडा सुरीने / कातण्याने कापून काढून टाका.
५. पोळी मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.
६. साजूक तुपाबरोबर खायला द्या.
खव्याच्या पोळ्या फ्रिजमध्ये ठेवू नका. २–३ दिवस टिकतात.
टीप
आवरणासाठी कणकेऐवजी बारीक रवा आणि मैदा अर्धा अर्धा घालू शकता.
Your comments / feedback will help improve the recipes