Lal Bhopalyachi Bhaaji (लाल भोपळ्याची भाजी) – Pumpkin Subji

Lal Bhopalyachi Bhaaji (लाल भोपळ्याची भाजी)

Lal Bhopalyachi Bhaaji (लाल भोपळ्याची भाजी) – Pumpkin Subji

लाल भोपळ्याची भाजी मराठी

This is one more Maharashtrian recipe with Goda Masala, Tamarind and Jaggery. It’s a very easy and quick recipe that makes very tasty Subji. This is a no Onion Garlic subji.

Ingredients (Serves 4)

Pumpkin 350 – 400 gms

Goda Masala 1 teaspoon

Tamarind (Imli) Pulp 1 tablespoon

Crushed Jaggery 1-2 tablespoon (adjust as per taste)

Chilly Powder ½ – 1 teaspoon (adjust as per taste)

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped coriander 1 tablespoon

Salt to taste

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida 2 pinch

Fenugreek seeds 4-5

Instructions

1. Wash and Peel Pumpkin. Chop into medium size pieces.

2. In a pan heat oil. Add Mustard seeds; wait for splutter; add Turmeric powder; add Asafoetida, fenugreek seeds.

3. Turn flame to low; Add Pumpkin pieces; mix and cook covered for 2 minutes – do not add water

4. Stir and cook covered for another 2 minutes – do not add water

5. Now add water to cover ½ the ingredients; let the water boil

6. Add Goda masala, Tamarind pulp, Jaggery, Salt, Chilly powder and Scraped fresh coconut.

7. Cook covered till Pumpkin is almost cooked; keep stirring after every 3-4 minutes; add more water if subji gets very dry. This subji has little gravy.

8. Add chopped coriander. Bring the subji to boil.

9. Tasty subji is ready.

Serve hot with Roti or Rice.

Note:

1. Do not overcook Pumpkin. It loses its taste. Pumpkin pieces should be intact.

Lal Bhopalyachi Bhaaji (लाल भोपळ्याची भाजी)
Lal Bhopalyachi Bhaaji (लाल भोपळ्याची भाजी)
       ================================================================================

लाल भोपळ्याची भाजी

ही कोकणातली भाजी गोडा मसाला आणि चिंच, गूळ घालून बनवतात. अतिशय सोपी, पटकन होणारी आणि चविष्ट अशी ही भाजी आहे.

साहित्य ( जणांसाठी )

लाल भोपळा ३५० ४०० ग्राम

गोडा मसाला १ चमचा

चिंचेचा कोळ १ चमचा

गूळ १२ मोठे चमचे (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

लाल तिखट अर्धा एक चमचा (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

खवलेला नारळ १ मोठा चमचा

चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा

तेल १ चमचा

मोहरी अर्धा  चमचा

हळद अर्धा  चमचा

हिंग २ चिमूट

मेथी दाणे ४-५

मीठ चवीनुसार

कृती

. लाल भोपळा धुवून, सालं काढून घ्या. भोपळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा.

. एका पातेल्यात तेल घालून मोहरी, हळद आणि हिंगाची फोडणी करा. मेथीचे दाणे घाला.

. फोडणीत भोपळ्याच्या फोडी घालून परतापाणी न घालता२ मिनिटं  झाकण ठेवून वाफवून घ्या

. एकदा ढळवून परत २ मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्या

. आता पातेल्यात भाजी अर्धी बुडेल एवढं पाणी घाला. त्यात गोड मसाला, चिंच, गूळ, लाल तिखट, नारळ आणि मीठ घालून मिक्स करा.  

. भाजी झाकण ठेवून शिजवा. मधे मधे ढवळत रहा. भाजी जास्त सुकी झाली असेल तर थोडं पाणी घाला. ह्या भाजीला थोडा रस असतो.

. भाजी शिजत आली की कोथिंबीर घाला. एक उकळी काढून गॅस बंद करा.

. चविष्ट भाजी तयार आहे. पोळी / भाकरी बरोबर गरमगरम भाजी खायला द्या.   

टीप

1. भोपळा जास्त शिजवू नका. त्याची चव जाते. फोडी तशाच राहिल्या पाहिजेत

Lal Bhopalyachi Bhaaji (लाल भोपळ्याची भाजी)
Lal Bhopalyachi Bhaaji (लाल भोपळ्याची भाजी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes