Lal Bhopalyacha Halwa (लाल भोपळ्याचा हलवा) – Red Pumpkin(Kadu) Halwa – No White Sugar

Lal Bhopalyacha Halwa (लाल भोपळ्याचा हलवा)

Lal Bhopalyacha Halwa (लाल भोपळ्याचा हलवा)– Red Pumpkin (Kadu) Halwa –  No White Sugar

लाल भोपळ्याचा हलवा मराठी

We all use Red Pumpkin for Subji or Bharit. But you can also make Halwa using Pumpkin. So make a sugar free version – without using white sugar; I add Jaggery for sweetness. It is made without using Mava (Milk Solids). Halwa has a nice creamy taste. It’s very easy and quick recipe.

Ingredients (1 cup = 250 ml)

Grated Pumpkin 2.5 cups

Crushed Jaggery ½ cup (Adjust as per taste; I added only ½ cup)

Milk 1 cup

Milk Powder 1 tablespoon (or you can add Fresh cream 1 tablespoon)

Salt a pinch (optional)

Dry fruits as per choice

Cardamom powder ¼ teaspoon

Ghee / clarified butter 1 teaspoon

Instructions

1. Wash, Peel and grate Pumpkin. Do not use a fine grater.

2. In a Pan, heat ghee. Fry dry fruits and transfer to a plate.

3. In the same pan, add grated pumpkin and sauté. Cook covered for 4 minutes stirring in between after 2 minutes.

4. Add milk, mix and cook covered till Pumpkin is soft. Don’t overcook.

5. Add Jaggery. Keep cooking till Jaggery melts. Stir regularly. Keep cooking till you get required consistency.

6. Add salt and Milk Powder/ Fresh cream. Mix.

7. Add dry fruits of your choice and cardamom powder. Mix.

8. Delicious Pumpkin Halwa is ready. Serve Hot / chilled as per your choice. Luke warm Halwa with Vanilla ice cream tastes awesome.

Lal Bhopalyacha Halwa (लाल भोपळ्याचा हलवा)
Lal Bhopalyacha Halwa (लाल भोपळ्याचा हलवा)
        ==================================================================================

लाल भोपळ्याचा हलवा उपासासाठी स्वादिष्ट पदार्थ गूळ घालून

आपण लाल भोपळा नेहमी भाजी / भरतासाठी / सूप साठी वापरतो. पण भोपळ्याचा हलवा ही खूप छान होतो. मी  साखर न घालता गूळ घालून हा हलवा बनवते. मावा ही घालत नाही. त्यामुळे घरात असणाऱ्या साहित्यापासून च स्वादिष्ट हलवा बनू शकतो.

मधुमेही लोकांसाठी नाहीये ही रेसिपी. पण मुलांसाठी / मधुमेह नसलेल्या लोकांसाठी पांढरी साखर चांगली नसते. त्यांना गूळ/ मध घातलेले पदार्थ चांगले. त्यांच्या साठी उत्तम.

साहित्य (१ कप = २५० मिली )

लाल भोपळ्याचा कीस अडीच कप (जरा जाड किसणी वापरा )

चिरलेला गूळ अर्धा कप (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

दूध १ कप

दुधाची पावडर / मलई १ मोठा चमचा

वेलची पूड पाव चमचा

मीठ चिमूटभर (हवे असल्यास)

साजूक तूप १ चमचा

सुका मेवा आवडीप्रमाणे तुकडे  करून

कृती

. एका कढईत तूप घालून सुक्या मेव्याचे तुकडे तळून ताटलीत काढून घ्या.

. त्याच कढईत भोपळ्याचा कीस घालून २३ मिनिटं परतून झाकण ठेवून मंद आचेवर ४ मिनिटं वाफवून घ्या. मधे मधे ढवळा.  

. आता दूध घालून मिक्स करा. झाकण ठेवून शिजवा. फार जास्त शिजवू नका. भोपळा जरा मऊ झाला की पुरे.

. आता गूळ घालून मिक्स करा. गूळ वितळेपर्यंत शिजवा.

. दुधाची पावडर / मलई घाला. मिक्स करा. जसा घट्ट हवा असेल तसा आटवून घ्या. थंड झाल्यावर हलवा थोडा घट्ट होतो.

. मीठ, वेलची पूड आणि सुका मेवा घालून मिक्स करा.

. भोपळ्याचा स्वादिष्ट हलवा तयार आहे. गरम किंवा गार कसाही सर्व्ह करा.

. जरा कोमट हलव्यावर वॅनिला आईस क्रिम घालून खूप छान लागतं

Lal Bhopalyacha Halwa (लाल भोपळ्याचा हलवा)
Lal Bhopalyacha Halwa (लाल भोपळ्याचा हलवा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes