Shahi Gulkand Laadoo (शाही गुलकंद लाडू ) – Delicious Laddus using Rose Petals Preserves

Shahi Gulkand Laadoo (शाही गुलकंद लाडू )

Shahi Gulkand Laadoo (शाही गुलकंद लाडू) – Delicious Laddus using Rose Petals Preserves

शाही गुलकंद लाडू मराठी

This is an easy recipe using Sattu (Roasted split Chickpeas) flour and Gulkand (Rose Petals Preserves). These laddus can be stored without refrigeration. This can be a Delicious and uncommon option for Sweet Dish or for Prasad on Auspicious occasions.

Sattu flour is available in two types. 1. With only roasted split chickpeas and 2. With Roasted split chickpeas and wheat. The one I got was of the first type. Hence I’d to add wheat flour for gluten (binding). If you get Sattu flour of the second type, you need not add wheat flour. Take 2.25 cups of sattu flour and roast it along with ½ cup wheat flour.

Ingredients (makes about 25 Laddus) (1 cup = 250 ml)

For Cover

Sattu Flour (Roasted split Chickpeas Flour) 1.5 cup

Whole Wheat Flour ¾ cup

Powdered Sugar 6 tablespoon

Milk Powder 5 tablespoon

Ghee / Clarified Butter Approx ½ cup

Cardamom Powder ¼ teaspoon

Dry Fruit Powder for rolling Laddus

For Filling

Gulkand 5 tablespoon

Dry Fruits Powder 3 tablespoon (Optionally you can use roasted peanuts powder)

Instructions

1. Add ¼ cup of ghee in a pan. Add Sattu flour and roast on low flame for 3-4 minutes. Sattu is already roasted; hence not much roasting is required. Transfer it to a bowl.

2. Add ¼ cup of ghee in the same pan. Add wheat flour and roast on low flame till you get nice aroma of roasted flour. Transfer it to the same bowl.

3. When both flour come to room temperature, Add powdered sugar, milk powder, cardamom powder and mix.

4. We need to bind a medium consistency dough. Add little ghee if you are not able to bind a dough ball. But don’t add too much. If you add more ghee than required, you will not be able to roll laddus.

5. For filling mix Gulkand and Dry fruit powder. You can make dry fruit powder by grinding Almonds, Cashew nuts, Pistachios in a grinder. No need to roast dry fruits before grinding. Filling should not be very moist. If it is, add some more dry fruit powder.

Dough and the filling (पिठाचा गोळा आणि सारण)
Take a lemon size ball, make a bowl of the dough ball and place the filling (पिठाची पारी बनवा आणि त्यात सारण भरा)

6. Take a small lemon size dough ball. Using your fingers make a small bowl of dough ball, fill Gulkand filling in it and seal the dough to make a smooth ball.

7. Roll laddus in dry fruit powder and serve these delicious Shahi Gulkand Laddus.

8. Do not refrigerate these laddus. These laddus can be stored for 1 week without refrigeration.

Shahi Gulkand Laadoo (शाही गुलकंद लाडू )
Shahi Gulkand Laadoo (शाही गुलकंद लाडू )

 

==================================================================================

शाही गुलकंद लाडू

हा एक सोपा लाडूचा प्रकार सातूचं पीठ, कणिक आणि गुलकंद वापरून केला आहे . अतिशय स्वादिष्ट आणि वेगळे असे हे लाडू तुमची स्पेशल स्वीट डिश म्हणून करू शकता किंवा सणाच्या दिवशी प्रसाद म्हणून बनवू शकता. सगळ्यांना नक्की आवडेल.

सातूचं पीठ २ प्रकारचं असतं. . फक्त चण्याचं आणि २. चणा आणि गव्हाचं. आमच्या इथे मिळणारं सातूचं पीठ फक्त चण्याचं असतं. म्हणून चिकटपणासाठी कणिक घालावी लागते. तुम्हाला दुसऱ्या प्रकारचं पीठ मिळालं तर कणिक घालायची गरज नाही. फक्त सातूचं पीठच सव्वा दोन कप घ्या. आणि अर्धा कप तुपात भाजा.

साहित्य (२४२५ लाडू बनवण्यासाठी) (१ कप = २५० मिली )

आवरणासाठी

सातूचं पीठ दीड कप

कणिक अर्धा कप

साजूक तूप अर्धा कप (अंदाजे)

दुधाची पावडर ५ टेबलस्पून

पिठीसाखर ६ टेबलस्पून

वेलची पूड पाव टीस्पून

सुक्या मेव्याची पावडर लाडू घोळवायला (ऐच्छिक)

सारणासाठी

गुलकंद ५ टेबलस्पून

सुक्या मेव्याची पावडर ३ टेबलस्पून (किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं  कूट वापरू शकता )

कृती

. सुक्या मेव्याची पावडर करण्यासाठी बदाम, काजू, पिस्ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. मिक्सर पल्स मोड मध्ये चालवा. एकदम जास्त वेळ मिक्सर चालवला तर पावडर तेलकट होते. सुका मेवा भाजायची गरज नाही

. एका पातेल्यात पाव कप तूप घालून सातूचं पीठ मंद आचेवर मिनिटं भाजून घ्या. सातू भाजलेलंच असतं त्यामुळे जास्त भाजावं लागत नाही. पीठ एका वाडग्यात काढून घ्या.

. त्याच पातेल्यात पाव कप तूप घालून कणिक मंद आचेवर खमंग भाजून घ्या. सातूच्या पिठाच्या वाडग्यात काढा.

. पिठं थंड झाली की त्यात दुधाची पावडर, पिठीसाखर आणि वेलची पूड मिक्स करा. आणि मध्यम घट्ट गोळा बनवा. जरूर पडल्यास थोडं तूप घाला पण जास्त घालू नका. नाहीतर लाडू गोल रहाणार नाहीत.

. सारणासाठी गुलकंद आणि सुक्या मेव्याची पावडर मिक्स करा. मिश्रण फार ओलं नको. असेल तर आणखी थोडी सुक्या मेव्याची पावडर घाला.

Dough and the filling (पिठाचा गोळा आणि सारण)
Take a lemon size ball, make a bowl of the dough ball and place the filling (पिठाची पारी बनवा आणि त्यात सारण भरा)

६. पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पारी बनवा. त्यात सारण भरून लाडू सगळ्या बाजूनी बंद करून घ्या. आवडत असेल तर सुक्या मेव्याच्या पावडर मध्ये घोळवा.

७. स्वादिष्ट शाही गुलकंद लाडू तयार आहेत.

८. हे लाडू फ्रिज मध्ये ठेवू नका. फ्रिज बाहेर १ आठवडा चांगले राहतात.

Shahi Gulkand Laadoo (शाही गुलकंद लाडू )
Shahi Gulkand Laadoo (शाही गुलकंद लाडू )

 

1 Comment

Your comments / feedback will help improve the recipes