Beet Gajar Koshimbir (बीट गाजर कोशिंबीर) – Beet Root Carrot Raita / Salad

Beet Gajar Koshimbir (बीट गाजर कोशिंबीर)

Beet Gajar Koshimbir (बीट गाजर कोशिंबीर) – Beet Root Carrot Raita / Salad

बीट गाजर कोशिंबीर मराठी

This is a variation of Beet Root Koshimbir (Salad / Raita). I add grated carrots to it. It’s very easy to make this and requires very few ingredients. You can eat it as a side dish along with Roti or Rice. Or eat it by itself. It tastes awesome. If you like you can mix Curd in this Koshimbir. But it tastes nice without Curd also.

Ingredients (Serves 4)

Beet Root Bulbs 2 medium size

Carrots 2 medium size

Crushed Green Chilly ½ teaspoon

Sugar ½ teaspoon (or as per taste)

Fresh Scraped coconut 1 teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Salt to taste

Curd as required

For Tempering (Tadka)

Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Cumin Seeds (Jeera) ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Instructions

1. Wash Beet Root. Cook in microwave on high for 5-6 minutes till they are little soft. Do not overcook. You can also cook in pressure cooker. But the taste is better when cooked in microwave And it also retains its bright colour.

2. When cool, peel beet root and grate.

3. Wash, Peel and grate Carrots.

4. Mix grated beet root and carrots. Add Crushed Green chilly, salt, sugar, scraped coconut, coriander and salt. Mix together.

5. Heat ghee in a ladle. Add Cumin Seeds. When they sputter, add Asafoetida (Hing). Pour this Tempering on Beet mixture and mix well.

6. Koshimbir is ready. Serve it as it is or after mixing curd.

Note

If you want to give this Koshimbir in Tiffin, do not mix curd. Have it without curd or give curd in a separate container.

Beet Gajar Koshimbir (बीट गाजर कोशिंबीर)
Beet Gajar Koshimbir (बीट गाजर कोशिंबीर)

 

 

 

 

 

 

 

================================================================================

बीट गाजर कोशिंबीर

फक्त बीट किंवा फक्त गाजराची कोशिंबीर तुम्ही करतच असाल. मी बीट आणि गाजर एकत्र करून कोशिंबीर करते. छान चविष्ट लागते आणि टेक्सचर ही छान येते. ही कोशिंबीर तुम्ही दही घालून खाऊ शकता किंवा दही न घालता ही खाऊ शकता.

एकदा घरात  बीट आणि गाजर दोन्ही थोडं थोडं शिल्लक होतं आणि मला कोशिंबीर करायची होती. फक्त बीट किंवा फक्त गाजराची कोशिंबीर पुरली नसती. म्हणून दोन्ही एकत्र करून केली कोशिंबीर. आणि खूपच छान झाली. मग आता मुद्दाम अशी कोशिंबीर करते.

साहित्य (४ जणांसाठी )

बीट २ मध्यम आकाराचे कांदे

गाजर २ मध्यम

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

साखर अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा )

ताजा खवलेला नारळ १ टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

मीठ चवीनुसार 

दही आवडीनुसार

फोडणीसाठी

साजूक तूप १ टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग चिमूटभर 

कृती

. बीट धुवून शिजवून घ्या. मायक्रोवेव्ह मध्ये शिजवा किंवा प्रेशर कुकर मध्ये शिजवा.

. गार झाल्यावर सालं काढून किसून घ्या.

. गाजर धुवून सालं काढून किसून घ्या.

. एका वाडग्यात बीट, गाजर, मिरची, साखर, मीठ , नारळ, कोथिंबीर घालून मिक्स करा.

. छोट्या कढईत साजूक तूप घालून जिरं हिंगाची फोडणी करा आणि ती कोशिंबिरीवर घाला. मिक्स करा.

. बीट गाजराची कोशिंबीर तयार आहे.

. खायला देताना हवं असल्यास दही मिक्स करून द्या. किंवा दह्याशिवाय ही देऊ शकता. छान लागते.

टीप

. ही कोशिंबीर डब्यामध्ये द्यायची असेल तर दही मिक्स करू नका. हवं असेल तर दही वेगळं द्या.

 

Beet Gajar Koshimbir (बीट गाजर कोशिंबीर)
Beet Gajar Koshimbir (बीट गाजर कोशिंबीर)

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes