Crunchy Kanik Poha Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू )– Crunchy Wheat Flour Flattened Rice Laddus

Crunchy Kanik Poha Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू )– Crunchy Wheat Flour Flattened Rice Laddus

Crunchy Kanik Poha Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू )Crunchy Wheat Flour Flattened Rice Laddus

खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू मराठी

These are simple Wheat Flour (Kanik) Laddus. But addition of Fried Poha (Flattened Rice) and roasted dry coconut makes Laddus crunchy and super delicious. Instead of Fried Poha, you can add Fried Edible Gum. That also tastes good.

I’ve added Jaggery and Powdered Sugar half-half. If you want you can add only Jaggery but that would require more Ghee and if Jaggery is sticky, Laddus may turn out to be hard.

Ingredients (Makes 20-22 Laddus) (1 cup = 250ml)

Wheat Flour 2 cups

Grated Dried Coconut (Khobra) ½ cup

Thick Poha (Flattened Rice) ½ cup

Jaggery crushed ¾ cup

Ground sugar ¾ cup

Cardamom Powder ½ teaspoon

Pure Ghee (Clarified Butter) About ¾ cup + 1 tablespoon

Cashew / other dry fruits of your choice

Instructions

1. Dry roast the grated dry coconut, on medium flame, till light brown.

2. On cooling, crush coconut by hand.

3. Add 1.5 tablespoon of Ghee to a Ladle and fry Poha till it puffs. It does not take long for Poha to fry. So be watchful and fry on low flame. A special type of strainer is available for frying Poha. It is called पोहे तळणी in Marathi. If you use that, Poha can be fried easily.

4. Transfer the leftover Ghee to a thick bottom pan. Add remaining Ghee from the measure to it and add Wheat Flour.

5. Roast the wheat flour on medium flame, till light brown and you get nice aroma of roasted flour. Transfer the mixture to a big bowl.

6. In a pan, add 1 tablespoon of Ghee, crushed jaggery and melt it on low flame. Do not overcook.

7. Add melted jaggery, coconut, flattened rice to wheat flour and mix.

8. While the mixture is warm, add sugar, cardamom powder and mix well.

9. Add dry fruits as per your choice. Make small lemon size round balls while mixture is warm.

10. These laddus last for 2 weeks without refrigeration.

Note

  1. If you are using Jaggery Powder, you can add it as it is without melting.
  2. If mixture is dry, add 1-2 teaspoons of Ghee, mix and then roll laddus. Coarse / Fine wheat flour may change the amount of Ghee required.

  3. If mixture gets dry and you are not able to roll laddus, heat the mixture on low flame till it’s warm and then roll laddus.

Crunchy Kanik Poha Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू )– Crunchy Wheat Flour Flattened Rice Laddus
Crunchy Kanik Poha Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू )– Crunchy Wheat Flour Flattened Rice Laddus
        =================================================================================

खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू

आणखी एक सोपा  आणि छान स्वादिष्ट पदार्थ. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून होणारी आणि पाकाचं झंझट नसणारी रेसिपी. कणकेबरोबर ह्यात तळलेले पोहे आणि सुकं खोबरं घातलंय. पोहे चुरा न करता घालायचे म्हणजे लाडू खाताना मधे मधे येणारे कुरकुरीत पोहे मस्त लागतात. पोह्यांऐवजी डिंक तळून घालू शकता. तसे लाडूही छान लागतात

मी ह्यात गूळ आणि पिठीसाखर अर्धी अर्धी घातलीय. तुम्ही पूर्ण गूळ घालू शकता पण तूप जास्त लागतं आणि गूळ चिकट असेल तर लाडू कडक होऊ शकतात.

साहित्य (२०२२ लाडवांसाठी) (१ कप = २५० मिली )

कणिक २ कप

किसलेलं सुकं खोबरं अर्धा कप

जाडे पोहे अर्धा कप

चिरलेला गूळ  पाऊण कप

पिठी साखर पाऊण कप

साजूक तूप अंदाजे पाऊण कप + १ चमचा

वेलची पावडर अर्धा चमचा

सुके मेवे आवडीनुसार

कृती

. सुकं खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या आणि ताटलीत काढून गार करा. गार झाल्यावर हाताने जरा चुरा करून घ्या.

. मोठा दीड चमचा तूप कढईत घालून त्यात पोहे तळून घ्या. पाहे तळणी असेल तर त्यात छान तळले जातात पोहे. तळलेले पोहे दुसऱ्या ताटलीत काढून घ्या.

. पोहे तळून उरलेले तूप आणि पाऊण कपातलं उरलेलं तूप एका पातेल्यात घालून त्यात कणिक घाला. मंद आचेवर कणिक खरपूस भाजून घ्या. छान खमंग सुगंध आला पाहिजे.

. कणिक एका मोठ्या बाउल मध्ये काढून घ्या

. पातेल्यात १ चमचा तूप घालून त्यात गूळ घालून वितळवून घ्या. वितळलेला गूळ कणकेच्या बाउल मध्ये घाला. खोबरं आणि तळलेले पोहे घाला. पोहे तसेच घाला चुरा करू नका. नीट मिक्स करा.

. मिश्रण कोमट झालं की साखर, वेलची पूड आणि सुके मेवे घालून एकजीव करा.

. लगेच लाडू वळून घ्या.

. हे लाडू २ आठवडे टिकतात. फ्रिज मध्ये ठेवू नका.

टीप

. गुळाची पावडर वापरली तर ती वितळवण्याची गरज नाही. पावडर अशीच कणकेत घालू शकता.

. मिश्रण सुकं वाटत असेल तर १२ चमचे तूप घालून मिक्स करा. कणिक जाड / बारीक असेल तसे तुपाचं प्रमाण थोडं बदलू शकतं.

. मिश्रण थंड झालं आणि लाडू वळता येत नसतील तर मिश्रण मंद आचेवर पुन्हा थोडं कोमट करून घ्या

Crunchy Kanik Poha Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू )– Crunchy Wheat Flour Flattened Rice Laddus
Crunchy Kanik Poha Laadoo (खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू )– Crunchy Wheat Flour Flattened Rice Laddus

5 Comments

Your comments / feedback will help improve the recipes